इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

4.आपत्ती व्यवस्थापन


सर्व टेस्ट सोडवण्या अगोदर सराव करावा व घटक समजून घेण्याचा प्रयत्न करावा.ऑनलाईन टेस्ट मुळे घटकांचा खुप सराव होणार आहे.याचा फायदा करून घेण्यसाठी टेस्ट सोडवण्यापूर्वी घटक जरूर पाहावा.जास्तीत जास्त ऑनलाईन टेस्ट आपणापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न राहील.आपल्या प्रतिक्रिया जरुर कमेंट बॉक्स मध्ये लिहा.
असे का घडते? 
(१) महापूर. उत्तर : एकाच ठिकाणी खुूप वृष्टी झाली की, नदया-नाले तुडुंब भरून वाहतात. हे पाणी सखल जमिनीवर आणि सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण होते. शहरामध्येही पाणी निचरा करण्याची व्यवस्था अपुरी पडल्याने गर्य तुंबतात. पाणी रस्त्यावर पसरून घराघरांत घुसते.

 (२) जंगलांना आग.
 उत्तर : कोणीतरी निष्काळजीपणे टाकलेली ठिणगी जंगलात वणवा भडकवू शकते. कधी कधी सुक्या फांदच एकमेकांवर घासूनही वणवा भडकू शकतो. जंगलांना अशा रितीने आग लागते. 

(३) इमारत कोसळणे/दरडी कोसळणे.  उत्तर : भूकंप झाल्याने जमीन कंप पावते. या कंपनांमुळे इमारती कोसळू शकतात, बांधकामाचे साहित्य निकृष्

 (४) वादळ, उत्तर : नैसर्गिकरीत्या हवेमध्ये कमी-अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात. असे झाल्यास हवामानात तत्काळ बदल होतो. यामुळे वेगाने वारे वाहतात आणि वादळाची निर्मिती होते. 

(५) भूकंप. 
उत्तर : भूगर्भात नेहमी हालचाली होत असतात. यामुळे कधी कधी प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. यामुळे भूगर्भात भूकंप लाटा निर्माण होतात. त्याचा परिणाम म्हणजे भूकवच कंप पावते. यालाच 'भूकंप' असे म्हणतात. भूकंपामुळे जमीन धरधरते, हलते आणि जमिनीला भेगाही पडतात. 

प्रश्न ५. तात्काळ काय उपाय कराल? 
(१) कुत्रा चावला. 
उत्तर : कुत्र्याने केलेली जखम स्वच्छ व निर्जतुक पाण्याने धुवावी. पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यानेही धुवून घ्यावी. जखमेवर कोरडे कापड ठेवावे. ड्रेसिंगसाठी डॉक्टरकडे न्यावे. अँटीरेबीजचे इंजेक्शन देण्यास सांगावे.

 (२) खरचटले/रक्तस्राव. 
उत्तर : रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करावा. जखमी व्यक्तीला आराम पडेल अशा स्थितीत बसवांवे. जखम स्वच्छ धुवावी. जखम झालेला भाग हृदयाच्या स्तरापेक्षा उंचावर ठेवावा जंतुनाशक मलम लावावे. जखम खोल असल्यास डॉक्टरकडे नेऊन टाके घालावेत.

 (३) भाजले/पोळले. 
उत्तर : सर्वप्रथम किती प्रमाणात भाजले आहे. ते पाहावे. किरकोळ भाजले असल्यास भाजलेला भाग थंड पाण्यात बुडवून ठेवावा, व्यक्तीला पिण्यास पाणी दयावे. निजतुक पाण्याने जखम साफ करावी किंवा जंतुनाशक मलम लावावे. जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकून ठेवावी गंभीररीत्या भाजले असल्यास मानसिक आधार दयावा आणि शक्यतो लगेच डॉक्टरी इलाज करावा.


(४) सर्पदंश. 
उत्तर : जखम पाण्याने धुवून लगेच दंशाच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे. सापाचे विष हृदयाकडे अथवा मेंदूकडे पोचणार नाही यासाठी असे कापड बांधणे आवश्यक आहे. दंश झालेल्या व्यक्तीस धीर देऊन शक्य तितक्या लगेच डॉक्टरकडे नेऊन विषावरच्या उताऱ्याचे इंजेक्शन दयावे.

 (५) उष्माघात. 
उत्तर : रुग्णास थंड जागी किंवा सावलीत न्यावे. शरीर थंड पाण्याने पुसावे आणि मानेवर व डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या घालाव्यात. पिण्यास भरपूर पाणी किंवा सरबत दयावे. शरीर शुष्क होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. उलटी किंवा अशक्तपणा आला असेल; तर पोटावर उताणे झोपवून मान एका बाजूस करून ठेवावी.

पुढील प्रश्नांची तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा : 
(१) 'आपत्ती' म्हणजे काय? 
उत्तर : अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आणि समस्यांना 'आपत्ती' असे म्हणतात.

 (२) आपत्तीचे प्रकार कोणते?
 उत्तर : मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती-असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. 

(३) 'आपत्ती व्यवस्थापन' म्हणजे काय? उत्तर : आपत्ती येण्याअगोदर आपण आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे, आपत्ती टाळणे आणि त्यासाठी क्षमता तयार करणे-याला 'आपत्ती व्यवस्थापन' असे म्हणतात. 

(४) आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते? 
उत्तर : आपत्कालीन नियोजन आणि व्यवस्थापन-असे आपत्ती व्यवस्थापनाचे दोन घटक आहेत. यात आपत्ती येण्यापूर्वी आणि आपत्ती आल्यास कोणती दक्षता घ्यावयाची, हे लक्षात घेतले जाते.

(५) सर्पमित्र कसे काम करतात? 
उत्तर : सर्पमित्र सापांचे रक्षण करतात. जर चुकून साप मानवी वस्तीत शिरला, तर लोक भीतीपोटी त्याला ठार मारू पाहतात. अशा ठिकाणी सर्पमित्र जाऊन साप पकडतात. प्रत्यक्षात थोड्याच सापांच्या जाती विषारी आहेत. सर्पमित्रांना सापांची आणि सर्पदंशावरील प्रथमोपचारांची सखोल माहिती असते ते सापांना पकडून पुन्हा जंगलात किंव त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. सर्व लोकांना सापांबाबतची माहितीही देतात. नागपंचमीसारख्या सणात त सापांवर अत्याचार होत असतील, तर तेव्हाही सर्पमित्र सापांची गारुड्यांपासून सुटका करतात.


बोधकथा त्यागाचे महत्व फार वर्षापूर्वी एक स्वाभिमानी राजा होऊन गेला. त्याचे राज्य मोठे होते आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता. त्याचे महाल सोन्यापासून बनलेले होते. नोकरचाकरांची रेलचेल होती. मात्र त्याचे सल्लागार त्याच्या अहंकाराला प्रोत्साहन देत होते. एकदा त्याच्या दरबारात एक तेज:पुंज साधू आला. राजाला पाहूनच त्याने ओळखले की राजाला फार गर्व चढला आहे. राजाने मोठ्या तो- यात विचारले,"तुला काय पाहिजे?" साधू म्हणाला," राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काहीतरी देण्यास आलो आहे." राजाचा अहंकार दुखावला व राजा मोठ्याने ओरडला,"लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही अन तू मला काय देणार?" साधू मंद स्मित करत म्हणाला,"राजन, त्यागाशिवाय भोगाला चव येत नाही. वैभवात जेव्हा त्याग समाविष्ट होते तेव्हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्याग येताच अहंकार दूर होतो. आसक्ती दूर होते आणि मन परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी तयार होते." फकीराच्या राजा खजील आला आणि त्याचे डोळे उघडले. त्याने गर्वाचा त्याग केला. तात्पर्य :- त्यागाने अहंकाराचा नाश होतो. अहंकार हा मनुष्याचे नुकसान करतो.

1 Comments

Previous Post Next Post

نموذج الاتصال