इयत्ता पाचवी मराठी - पाठ: छत्रपती राजर्षी शाहूमहाराज स्वाध्याय
छत्रपती राजर्षी शाहूमहाराज - प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा
प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या?
पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या.
आ) लोक शाहूमहाराजांविषयी काय बोलू लागले?
इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आली, असे लोक शाहूमहाराजांबद्दल बोलू लागले.
इ) पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला?
महाराजांनी विहिरीतला गाळ काढा, नदीकाठी विहिरी खण, दरबारातून लागेल तेवढा खर्च करा, असा आदेश पाण्याच्या प्रश्नासंबंधी दिला.
ई) रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली?
रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी शिशु संगोपन गृह ही योजना सुरू केली.
छत्रपती राजर्षी शाहूमहाराज - प्रश्न २: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा
प्रश्न २: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा
अ) शाहूमहाराजांचा जीव वरखाली का होऊ लागला?
दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने जनतेची स्थिती हलाखीची झाली. माणसे जगण्यासाठी गाव सोडून दूर जायला लागली, गावेच्या गावे ओस पडू लागली, जनावरे उपाशी पडली, हे सर्व हाल पाहून शाहूमहाराजांचा जीव वरखाली होऊ लागला.
आ) नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्याठिकाणची परिस्थिती कशी होती?
नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी भुदगड, पन्हाळा, शाहुवाडी या तालुक्यांचा दौरा सुरू केला. या ठिकाणी हिरवीगार रानं करपून गेली होती.
इ) महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले?
महाराजांनी व्यापाऱ्यांना विनंती केली की धान्याचे दर कमी करा, जेणेकरून गोरगरीब माणसाला दोन घास अन्न मिळेल. खरेदीच्या किंमतीत धान्य प्रजेला मिळालं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल.
ई) जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोई केल्या?
जित्राबांसाठी छावण्या उभ्या करून त्यांना त्या छावण्यांपर्यंत आणण्याची सोय केली. त्यांना वैरण, दाणागोटा देऊ लागले.
उ) महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले?
दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये प्रजेला धान्य आणि जनावरांना चारापाणी आणून दिलं तरी तेवढ्यावर भागत नाही, इतर गोष्टी घेण्यासाठी जनतेकडे पैसा नाही. त्यांना पैसा देण्यासाठी काम काढायचं, जेणेकरून त्यांना काम मिळेल आणि पैसा मिळेल.
ऊ) महाराजांनी शिशु संगोपनगृहं चालू करण्याचा हुकूम का दिला?
रोजगार हमी योजनेच्या कामावर ज्या बायका काम करत होत्या, त्या कामात असताना त्यांची चिल्लीपिल्ली झाडाखाली इकडेतिकडं फिरत, उपाशी राहत, रडत, त्यांच्याकडे कोण बघत नाही. म्हणून महाराजांनी पोराबाळांची व्यवस्था करण्यासाठी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम दिला.
छत्रपती राजर्षी शाहूमहाराज - प्रश्न ४: नावे लिहा
प्रश्न ४: नावे लिहा
या पाठामध्ये 'बिनव्याजी' हा शब्द आला आहे. तुम्हाला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा.
गैरहजर, गैरफायदा, बेपर्वा, बेफिकीर
छत्रपती राजर्षी शाहूमहाराज - प्रश्न ५: विरुद्ध अर्थ शब्द
प्रश्न ५: विरुद्ध अर्थ शब्द
अ) दुष्काळ
सुकाळ
आ) सुपीक
नापीक
इ) लक्ष
दुर्लक्ष
ई) तोटा
नफा
उ) स्वस्त
महाग
छत्रपती राजर्षी शाहूमहाराज - प्रश्न ६: पुढील वाक्यातील क्रियापदे ओळख.
प्रश्न ६: पुढील वाक्यातील क्रियापदे ओळख.
अ) समीरने पुरणपोळी खाल्ली.
खाल्ली
आ) शाळा सुरू झाली.
झाली
इ) मुलींनी टाळ्या वाजवल्या.
वाजवल्या
ई) शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.
विचारले
उ) रमेशने अभ्यास केला.
केला
ऊ) वैष्णवी सुंदर गाते.
गाते
छत्रपती राजर्षी शाहूमहाराज - प्रश्न ७: वाक्य पूर्ण करा
प्रश्न ७: वाक्य पूर्ण करा
अ) तिचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात (लागला, गेले, सोडले, करतात).
तिचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले.
आ) एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध (लागला, गेले, सोडले, करतात).
एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात.
इ) त्याने घर (लागला, गेले, सोडले, करतात) व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला.
त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला.
छत्रपती राजर्षी शाहूमहाराज स्वाध्याय - pahavi marathi
इयत्ता पाचवी मराठी पाठ: छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यामध्ये शाहूमहाराजांचे दुष्काळातील सामाजिक कार्य आणि प्रजेची काळजी यांचे वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, रोजगार हमी योजना, आणि शिशु संगोपन गृह यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि सामाजिक नेतृत्व शिकण्याची संधी येथे उपलब्ध आहे. हा पाठ नेतृत्व आणि कर्तव्याची प्रेरणा देतो.
कीवर्ड्स: छत्रपती राजर्षी शाहूमहाराज, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, दुष्काळ, सामाजिक कार्य, रोजगार हमी
संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: