इयत्ता पाचवी मराठी - पाठ: अति तिथं माती स्वाध्याय
अति तिथं माती - प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा
प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली?
संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने आत्ताच्या आत्ता राज्यात दवंडी पिटवून आजपासून राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं, अशी आज्ञा केली.
आ) जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही?
जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही कारण राजाने सगळं गाण्यात सांगायचं म्हणून आज्ञा केली होती.
इ) ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे. त्यासाठी किती मुले लागतील?
ही नाटिका वर्गात सादर करायची असल्यास त्यासाठी नाटिकेतील मुख्य दहा पात्रे आणि राज्याची प्रजा आणि इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्वच मुले लागतील.
अति तिथं माती - प्रश्न २: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा
प्रश्न २: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा
अ) चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते, हे पाठातील कोणकोणत्या वाक्यांवरून कळते?
चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते, हे पाठातील प्रधानजींच्या पुढील वाक्यांवरून कळते: १) गोरगरीब खूप कष्ट करत आहेत. २) फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. ३) चान्र दोन साथीचे रोग आले, त्यांत शे-पाचशे माणसं गेली.
आ) या पाठातील कोणती वाक्ये वाचून तुम्हाला हसू येते?
‘गवईबुवा, तुम्हाला काय येत? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा.’ हे वाक्य वाचून मला हसू येते.
इ) चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते, हे कोणत्या वाक्यांवरून कळते?
‘गवईबुवा, तुम्हाला काय येत? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा.’ या वाक्यावरून चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते, हे कळते.
ई) महाराजांची कोणती आज्ञा अमलात आणणे शक्य नाही, असे तुम्हाला वाटते? असे का वाटते?
राज्यातील सगळ्यांनी गाण्यातच बोलायचं ही आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही. कारण, काही अतिमहत्त्वाच्या गोष्टी गाण्याच्या माध्यमातून सांगताना खूप उशीर होतो.
उ) या पाठाला ‘अति तिथं माती’ हे नाव का दिले असावे?
या नाटिकेतील राजा चक्रमादित्य यांनी कोणताही विचार न करता राज्यात सर्वांनी गाण्यातच बोलण्याची दवंडी पिटवून आज्ञा दिली. त्यामुळे प्रत्येक जण गाण्यातच बोलू लागला, इतकेच नाही तर ज्या वेळी राजवाड्याला आग लागली, ही बातमी सुद्धा सेवक राजाला गाण्याच्या माध्यमातून सांगू लागला.
अति तिथं माती - प्रश्न ४: वाक्यात उपयोग करा
प्रश्न ४: वाक्यात उपयोग करा
अ) साखरेसारखा गोड
सार्थकचा स्वभाव साखरेसारखा गोड आहे.
आ) उत्तेजन देणे
स्पर्धेत भाग घेण्यासाठी राजूची बहीण त्याला उत्तेजन देते.
इ) हसून हसून पोट दुखणे
राजूने वर्गात सांगितलेला विनोद ऐकून सगळ्यांचे हसून हसून पोट दुखले.
अति तिथं माती - प्रश्न ५: थोडक्यात उत्तरे लिहा
प्रश्न ५: थोडक्यात उत्तरे लिहा
अ) तुम्हाला करमत नाही, हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात.
काय करावं, किती करावं, सुचत नाही मजला, अरे माझ्या मित्रा, करमत नाही मजला.
आ) शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना गृहपाठ करायला सांगत आहेत.
संपला शिकवूनी आज पाठ हो... आता करा गृहपाठ हो...
इ) रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे.
अहो दादा ताई माई... घरी जाण्याची तुम्हाला फार घाई... घरी जाताना घेऊन जा तुम्ही एक चटई...
अति तिथं माती - प्रश्न ६: नावे लिहा
प्रश्न ६: नावे लिहा
वांग्यांसाठी, कांद्यांसाठी कोणकोणती विशेषणे या पाठात आलेली आहेत? वांगी, कांदे यांसाठी तुम्ही आणखी कोणती विशेषणे वापराल?
वांगी: पाठातील विशेषणे: छान, सुरेख, शेर-दोन शेर. आणखी विशेषणे: चवदार, ताजी, उत्कृष्ट. कांदे: पाठातील विशेषणे: पांढरे फेक, स्वच्छ, सुरेख. आणखी विशेषणे: मोठे, गोल.
अति तिथं माती - प्रश्न ७: नावे लिहा
प्रश्न ७: नावे लिहा
तुमच्या आवडीच्या कोणत्याही पाच वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा.
१) भाजी: ताजी, हिरवीगार, स्वस्त. २) सायकल: वेगवान, मजबूत, आकर्षक. ३) दप्तर: मजबूत, सुंदर, मोठे. ४) कपडे: सुंदर, सुरेख, छान. ५) गुलाब: छान, सुंदर, सुवासिक, गुलाबी.
अति तिथं माती - प्रश्न ८: जोडशब्द पूर्ण करा
प्रश्न ८: जोडशब्द पूर्ण करा
चोरीमारी, गोरगरीब यांसारखे पाठातील व इतर जोडशब्द शोधा. लिहा.
रोगराई, सटासट, नवराबायको, आरडाओरड
अति तिथं माती - प्रश्न ९: नावे लिहा
प्रश्न ९: नावे लिहा
खालील शब्द असेच लिहा: उत्कृष्ट, उत्तम, कार्यक्रम, स्वतःला, उत्तेजन, पुन्हा, प्रिय.
उत्कृष्ट, उत्तम, कार्यक्रम, स्वतःला, उत्तेजन, पुन्हा, प्रिय
अति तिथं माती - प्रश्न १०: विरुद्ध अर्थ शब्द
प्रश्न १०: विरुद्ध अर्थ शब्द
अ) रुंद X अरुंद
रुंद X अरुंद. शाळेजवळ असणारा पूल रुंद आहे आणि आमच्या घराजवळील पूल अरुंद आहे.
आ) गोरगरीब X श्रीमंत
गोरगरीब X श्रीमंत. गोरगरीब लोक खूप कष्ट करतात, श्रीमंत लोक कमी कष्ट करतात.
इ) रोख X उधार
रोख X उधार. कोणत्याही वस्तूचे रोख पैसे देणे कधीही चांगले, कोणाचे उधार ठेऊ नये.
ई) सुंदर X कुरूप
सुंदर X कुरूप. मोर किती सुंदर दिसतो आणि कावळा किती कुरूप दिसतो.
उ) हजर X गैरहजर
हजर X गैरहजर. आज वर्गात राजू गैरहजर होता, राजू सोडून बाकीचे विद्यार्थी हजर होते.
ऊ) मान X अपमान
मान X अपमान. सर्वांना मान राखावा, कधीही कोणाचा अपमान करू नये.
ए) भरभर X सावकाश
भरभर X सावकाश. ससा भरभर चालतो, तर कासव अगदी सावकाश चालतो.
ऐ) उद्योगी X आळशी
उद्योगी X आळशी. शामराव उद्योगी माणूस आहे म्हणून तो चांगले जीवन जगतो, तर पोपटराव आळशी माणूस आहे म्हणून तो कसेबसे घर चालवतो.
अति तिथं माती स्वाध्याय - pahavi marathi
इयत्ता पाचवी मराठी पाठ: अति तिथं माती यामध्ये संगीताच्या अतिरेकाचे विनोदी नाटिकेतून चित्रण आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, शब्दसमूहांचा उपयोग, विशेषणे, आणि विरुद्धार्थी शब्द यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि संयमाचे महत्त्व शिकण्याची संधी येथे उपलब्ध आहे. ही नाटिका अतिरेकाचे परिणाम शिकवते.
कीवर्ड्स: अति तिथं माती, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, नाटिका, संगीत, विनोद, विशेषणे
संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: