१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26)

इयत्ता पाचवी मराठी पाठ 21: प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा चे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा स्वाध्याय

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा स्वाध्याय

प्रश्न १: कवितेच्या ओळी पूर्ण करा

अ) शिकणे कधी ................. चुका
शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका
आ) क्रिकेटची .............?
क्रिकेटची बॅट लाकडी का?
इ) खोकल्याची ......................?
खोकल्याची उबळ येते का?
ई) सर्दीत .................?
सर्दीत नाक गळते का?
उ) मेंदूला ...............?
मेंदूला वास कळतो का?
ऊ) रंगीत तारे .............?
रंगीत तारे असतात का?
ए) दिवसा तारे ............?
दिवसा तारे दिसतात का?
ऐ) माणसासारखा ...............?
माणसासारखा माणूस होईल का?

प्रश्न २: जोड्या जुळवा

कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या जोड्या जुळवा:
(१) कुत्रा - वाकडी शेपूट
(२) पेंग्विन - तोकडी मान
(३) साप - वाकडी चाल
(४) वटवाघूळ - रात्रीचे फिरणे
(५) मासे - पाण्यात तरणे
(६) पतंग - दिव्यावर मरणे
(७) काजवा - चमचम करणे

प्रश्न ३: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा

अ) तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो. तुम्ही काय कराल?
माझा मित्र लिहिताना अनेक चुका करत असेल तर मी त्याला त्याच्या चुका वेळोवेळी समजावून सांगेन आणि त्या चुका दुरुस्त करायला सांगेन. त्याच्या लिहिताना चुका होऊन नयेत म्हणून त्याला मी नियमितपणे रोज शुध्द लेखन करण्याचा सल्ला देईन.
आ) वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुनःपुन्हा होतात? त्या टाळण्यासाठी काय कराल?
वाचन करताना मला जोडशब्द आल्यावर मध्ये मध्ये अडकायला होते, जोडशब्द पटकन वाचायला जमत नाही. या चुका माझ्या पुन्हा पुन्हा होतात, त्या टाळण्यासाठी मी माझा वाचनाचा सराव वाढवेन.

प्रश्न ४: नावे लिहा

या कवितेतील प्रश्नांसारखे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का? याशिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हाला पडतात?
१) सूर्य दिवसा का उगवतो? २) चंद्र दिवसा कुठे जातो? ३) चांदण्या दिवसा दिसत का नाहीत? ४) पक्षी आकाशात उंच कसे उडतात? ५) वर्षाचे दिवस ३६५ का असतात? ६) दिवस २४ तासांचा का असतो? ७) पाऊस कसा पडतो? ८) आकाशगंगेत अजून किती ग्रह असतील? ९) समुद्राचे पाणी खारट का असते? १०) तेल पाण्यावर तरंगते का?

प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा स्वाध्याय - pahavi marathi

इयत्ता पाचवी मराठी पाठ: प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा यामध्ये जिज्ञासा आणि शिकण्याची प्रेरणा देणारी कविता आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, कवितेच्या ओळी पूर्ण करणे, आणि जोड्या जुळवणे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि जिज्ञासू वृत्ती वाढवण्याची संधी येथे उपलब्ध आहे. ही कविता शिकण्याची प्रक्रिया सतत चालू ठेवण्याची प्रेरणा देते.

कीवर्ड्स: प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, कविता, जिज्ञासा, शिकणे

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال