इयत्ता पाचवी मराठी - पाठ: माझं शाळेचं नक्की झालं! स्वाध्याय
प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) लेखिका कोठे राहत होती?
लेखिका कोल्हापूरमधल्या कालबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या पंधरा वीस झोपड्यांमधील एका झोपडीत राहत होत्या.
आ) झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा?
झोपडीच्या भिंती कच्च्या विटांनी बांधलेल्या होत्या, त्यातच कौलेही गळायची, त्यामुळे झोपडीच्या आतली जमीन सतत ओलसर असायची, त्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा.
इ) लेखिकेचे आईबाबा कुठे जायची तयारी करत होते?
लेखिकेचे आईबाबा बोरगावला जायची तयारी करत होते.
ई) दादा इमीला आईबाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता?
दादा इमीला शाळेत घालणार असल्याने तो इमीला आईबाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता.
उ) वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले?
इमीच्या शाळेत नाव दाखल केल्यावर शाळेत सव्वा रुपया द्यायचा होता, म्हणून वहिनीने लताक्काकडे पैसे मागितले.
प्रश्न २: कोण कोणाला म्हणाले
अ) ‘किती दस हितं बसून खायाचं?’
आई अशोकदादाला म्हणाली.
आ) ‘चांगलं शिकलं तर कुठंतरी नोकरी करील.’
अशोकदादा बाबांना म्हणाला.
इ) ‘पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव.’
अशोकदादा सुमाला म्हणाला.
ई) ‘मुलीचं पूर्ण नाव काय?’
शाळेतल्या बाई सुमावाहिनीला म्हणाल्या.
उ) ‘तुमच्याजवळ सव्वा रुपया आहे का?’
सुमा वाहिनी लताक्काला म्हणाली.
प्रश्न ३: खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा.
अ) आजकाल
आज, काल
आ) घालताना
घाल, लता, ताल, नाल
इ) माझ्याजवळ
माझ्या, जवळ, माज, माळ, माव, जमा, मावळ
ई) आठवण
आठ, आव, आण, आठव
प्रश्न ४: जोडशब्द पूर्ण करा
‘फुटकीतुटकी’ यासारखे पाठात आलेले जोडशब्द लिहा.
डोस्कबिस्क, बारीकसारीक, आजकाल, मायलेकर
प्रश्न ५: नावे लिहा
‘धाड्कन’ यांसारखे आणखी शब्द लिहा.
काड्कन, खाड्कन, फाड्कन, ताड्कन
माझं शाळेचं नक्की झालं! स्वाध्याय - pahavi marathi
इयत्ता पाचवी मराठी पाठ: माझं शाळेचं नक्की झालं! यामध्ये शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक परिस्थिती यांचे हृदयस्पर्शी चित्रण आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, जोडशब्द, आणि संवाद यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि शिक्षणाची प्रेरणा येथे उपलब्ध आहे. हा पाठ शिक्षणाच्या मूल्याची जाणीव करून देतो.
कीवर्ड्स: माझं शाळेचं नक्की झालं, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, शिक्षण, सामाजिक परिस्थिती, जोडशब्द
संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: