१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता पाचवी मराठी पाठ 19: वासरू चे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: वासरू स्वाध्याय

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: वासरू स्वाध्याय

प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते?
रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळप सोडून जाते.
आ) तहान, भूक विसरून वासरू काय करते?
तहान, भूक विसरून वासरू रानभर फिरते, सगळे रान पायांखाली घालते, मनसोक्त फिरते.
इ) वासराला कळपाची आठवण केव्हा होते?
जेव्हा वासरू फिरून थकते आणि त्याचा फिरण्याचा उत्साह संपतो तेव्हा त्या वासराला कळपाची आठवण होते.

प्रश्न २: कवितेच्या ओळी पूर्ण करा

अ) भूक, तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते.
विसरुनी भान, भूक नि तहान, पायांखाली रान घाली सारे.
आ) वासरू रानात फिरून फिरून थकले, की त्याचा उत्साह कमी होतो. मग त्याला आपला कळप आठवू लागतो.
थाकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तयालागी.
इ) ते वासरू कळपाकडे परत यायला निघते, पण त्याला रस्ता सापडत नाही. ते दूर जाऊ लागते. असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते.
फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत.

प्रश्न ३: थोडक्यात उत्तरे लिहा

कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले, याचे वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
कळपातून निघालेल्या वासराला मनसोक्तपणे रान फिरायचे असते. त्यामुळे वासरू कळपातून बाहेर पडते. आपण जणू काही बंधनातूनच मुक्त झालो असे त्याला वाटते आणि ते रानोमाळ फेर धरते.

प्रश्न ४: अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

अ) कानांमध्ये वारे भरणे
अर्थ: हुरळून जाणे. वाक्य: आईला पाहताच बाळाने कानामध्ये वारे भरल्यासारखे झेप घेतली.
आ) हुरळून जाणे
अर्थ: मनातून खूप आनंदी होणे. वाक्य: चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने राजूचे सर्वांनी खूप कौतुक केले त्यामुळे तो हुरळून गेला.
इ) रान पायांखाली घालणे
अर्थ: दिशा फुटेल तिकडे फिरणे. वाक्य: हरवलेल्या वासराला शोधण्यासाठी शेतकऱ्याने सारे रान पायांखाली घातले.
ई) तहानभूक विसरणे
अर्थ: एखाद्या कामात मग्न होऊन जाणे. वाक्य: काम करताना राजू तहानभूक विसरून जातो.
उ) मग्न होणे
अर्थ: गुंग होणे. वाक्य: रामू आपल्या ऑफिसच्या कामात मग्न होता.
ऊ) हुरूप येणे
अर्थ: उत्साह येणे. वाक्य: कामाचा मोबदला मिळालेला पाहून राजूला अधिक काम करण्याचा हुरूप आला.
ए) मोकाट सुटणे
अर्थ: स्वैरपणे फिरणे. वाक्य: कळप सोडून आलेले वासरू जंगलात मोकाट फिरत होते.

प्रश्न ५: थोडक्यात उत्तरे लिहा

अ) शाळेची मधली सुट्टी झाली, की तुम्ही काय काय करता?
शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्वजण वर्गाबाहेर पडून शाळेसमोर असणाऱ्या झाडाखाली एकत्र जमतो. एकमेकांशी गप्पा मारतो.
आ) खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाहीत तर तुमची आई काय करते?
खेळायला गेल्यानंतर मी लवकर घरी परतलो नाही तर माझी आई मी खेळत असलेल्या ठिकाणी जाऊन मला घरी घेऊन येते. कधी कधी ती मी ज्या मित्रांच्या घरी खेळायला गेलो आहे त्या मित्रांच्या घरी फोन करून माझी चौकशी करते.
इ) तुम्ही तहानभूक केव्हा विसरता?
जेव्हा आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा असतात तेव्हा आम्ही तहानभूक विसरतो.

प्रश्न ६: नावे लिहा

‘मोकाट-अफाट-वाट’ याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा.
फिरू-घेरू-वासरू, वारे-न्यारे-फिरे, मोकाट-अफाट-वाट, भान-रान-तहान, हुरूप-खूप-कळप, मागे-भागे-लागे, लेकरू-अंधारू-हंबरू

प्रश्न ७: जोडशब्द पूर्ण करा

‘रानोमाळ’ सारखे पाच जोडशब्द लिहा.
कपडालत्ता, भांडीकुंडी, पानेफुले, डोंगरदऱ्या, नदीनाले

प्रश्न ८: दिलेल्या शब्दावरून गोष्ट तयार करा

‘एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले,’ असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का?
आमच्या गावात भरणाऱ्या जत्रेमध्ये मी असा प्रसंग पाहिला आहे. गेल्या ३-ते ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही सर्वजण गावातल्या जत्रेमध्ये फिरायला गेलो होतो. जत्रेत माणसांची प्रचंड गर्दी होती. त्यातच आम्हाला एक लहान मुलगी हुंदके देत रडताना दिसली, ती एकसारखी तिच्या आईला हाक मारत होती. परंतु तिची आई तिच्याजवळ नव्हती, ती मुलगी गर्दीत हरवली होती. आम्ही सर्वजण तिच्याजवळ गेलो, तिला आधी पाणी पिऊ दिले आणि तिला धीर दिला.

प्रश्न ९: नावे लिहा

अ) बत्तीस भाऊ, एकच बहिण, सर्वात तीच आयुष्यमान.
दात-जीभ
आ) चार बोटांचे अंतर दोघांत असे, एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे.
डोळे-कान
इ) बारा घरावर तिघे पहारा करती, सदैव फिरती, न थकती, न थांबती.
घड्याळातील काटे

वासरू स्वाध्याय - pahavi marathi

इयत्ता पाचवी मराठी पाठ: वासरू यामध्ये वासरूच्या स्वैर जीवनाचे कवितेतून रंजक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, कवितेच्या ओळी पूर्ण करणे, शब्दसमूहांचा उपयोग, आणि जोडशब्द यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि कवितेची गोडी शिकण्याची संधी येथे उपलब्ध आहे. ही कविता स्वातंत्र्य आणि जबाबदारी शिकवते.

कीवर्ड्स: वासरू, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, कविता, स्वैर जीवन, शब्दसमूह

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال