१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी मराठी धडा 2: स्वप्नं विकणारा माणूस स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी धडा दुसरा: स्वप्नं विकणारा माणूस स्वाध्याय

इयत्ता सातवी मराठी धडा दुसरा: स्वप्नं विकणारा माणूस स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील धडा दुसरा "स्वप्नं विकणारा माणूस" हा पाठ स्वप्नं विकणारा माणूस, त्याचे अनुभव, आणि गावकऱ्यांवरील प्रभाव यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, शब्दांचे अर्थ, आणि वाक्प्रचार यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची जाणीव करून देण्यास मदत करते.

स्वप्नं विकणारा माणूस - प्रश्न १: तुमचे मत स्पष्ट करा

प्रश्न १: तुमचे मत स्पष्ट करा

अ) गावात येणाऱ्या माणसाला गावकरी ‘सपनविक्या’ म्हणत.
घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून, गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असते. त्याच्या किश्यांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुखः विसरत असते. गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यांत उतरवून जात असे म्हणून गावकरी त्याला ‘सपनविक्या’ असे म्हणत.
आ) स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश.
आपले अनुभव सांगावेत, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे दुसऱ्यांना आनंद द्यावा. लोकांची सेवा करावी. हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश होता.

स्वप्नं विकणारा माणूस - प्रश्न २: वर्णन करा

प्रश्न २: स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा

१) त्याचा पेहराव: तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल-पंधरा फेटा, डोळ्यांवर चष्मा व पायांत चामडी बूट.
२) त्याचे बोलणे: त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेळ्या किश्श्यांनी रंगवून फुलवून सांगत असे. त्याचे बडबडणे दिलखेचक होते.
३) त्याचे स्वप्न: आपले अनुभव इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी.

स्वप्नं विकणारा माणूस - प्रश्न ३: आकृत्या पूर्ण करा

प्रश्न ३: खालील आकृत्या पूर्ण करा

अ)
१. माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत.
२. स्वप्न आपल्याला समृद्ध करते.
३. ज्याला स्वप्ने बघता येत नाहीत, तो माणूसच नाही.
४. स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते.
आ)
१. काही लोक स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखतात.
२. भलतीसलती स्वप्ने पाहू नयेत असे म्हणतात.
३. स्वतः आदर्श बनून वावरावे.
४. काहींच्या मते स्वप्नाळू वृत्ती घातक असते.
इ)
१. बदाम
२. काजू
३. किसमिस
४. वेलदोडे
५. सुपारी
६. खारीक
७. खोबरे
ई)
स्वप्न विकणाऱ्याचे किस्से: अनुभवाने समृद्ध व स्वप्नात गुंगवनारे
ऐकणाऱ्याचे फायदे:
१) निरनिरळ्या प्रांतांची, रितीरिवाजांची माहिती मिळायची.
२) स्वप्नात आहोत, असे वाटायचे.

स्वप्नं विकणारा माणूस - प्रश्न ४: ओघतक्ता

प्रश्न ४: स्वप्नं विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघतक्ता तयार करा

१) पिंपळाच्या पारावर थांबणे.
२) पाराला असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधणे.
३) चामडी पिशवीतील पाणी पिणे व ऐटीत पारावर बसणे.
४) जमेला लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगवून सांगणे.

स्वप्नं विकणारा माणूस - प्रश्न ५: कल्पना करा व लिहा

प्रश्न ५: कल्पना करा व लिहा. स्वप्नं विकणारा माणूस तुम्हांला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे

मी: नमस्कार साहेब कसे आहात?
स्वप्नविकणारा माणूस: नमस्कार! मी एकदम मस्त.
मी: आज बऱ्याच दिवसांनी आमच्याकडे येण केलत.
स्वप्न विकणारा माणूस: हो, खर आहे थोड कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. त्यामुळे इकडे येणे शक्य झालं नाही.
मी: मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही एवढ मोठ गाठोड घेवून का फिरता.
स्वप्न विकणारा माणूस: मी खूप दूरवर प्रवास करतो, वेगवेळ्या प्रदेशांतून भ्रमण करतो या गाठोड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सापडणाऱ्या वैशिष्ट्य पूर्ण गोष्टी एकत्र करतो. तसेच या गाठोड्यातून मी लोकांना उपयोगी येतील अशा वस्तू सोबत घेऊन जातो.
मी: तुम्हांला सर्वत्र स्वप्नविक्या या नावाने ओळ्खल जात हे तुम्हांला माहिती आहे का?
स्वप्न विकणारा माणूस: हो माहित आहे मला. परंतु मी स्वप्न विकत नाही, मी माझे अनुभव आणी ज्ञान सर्वांना देत असतो. सर्वांना आनंदाचे क्षण देत असतो. मला लोकांची सेवा करायला मिळतो.
मी: तुम्ही खूपच मोलाचे कार्य करत आहात तुम्हाला भेटून खूप बरे वाटले तुम्हांला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

खेळूया शब्दांशी

खेळूया शब्दांशी

अ) पार-झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, पार-पलीकडे. असे ‘पार’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. लक्षात ठेवा-संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा.
अ) हार
पराभव, फुलांची माळ
आ) कर
हात, करणे
इ) वात
वारा, दिव्याची वात
आ) खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
(१) मती कुंठित होणे - (आ) विचारप्रक्रिया थांबणे.
(२) तरतरी पेरणे - (इ) उत्साह निर्माण करणे.
(३) गहिवरून येणे - (अ) कंठ दाटून येणे.
इ) खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.
अ) कुतूहल
पूर्वी लोकांना मोबाईल विषयी कुतूहल वाटायचे.
आ) संभ्रम
कधी कधी मित्र कोण व शत्रू कोण याबद्दल संभ्रम निर्माण होतो.
इ) ढब
दामूची ढोलकी वाजवण्याची ढब वेगळीच आहे.
ई) आतुरतेन
सार्वजण गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.

वाक्यांचा तक्ता

आता तुम्ही या उदाहरणाप्रमाणे खालील तक्ता पूर्ण करा

वाक्ये सरळरूप सामान्यरूप प्रत्यय
रमेशचा भाऊ शाळेत गेला. १.रमेश २.शाळा रमेश शाळे चा त
बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. १.बँक २.शेतकरी बँके शेतकऱ्या ने ला
सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. १.सुट्टी २.मित्र सुट्टी मित्रां त शी
मंडईत फळांच्या गाड्या आहेत. १.मंडई २.फळ मंडई फळां त च्या

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी मराठी धडा दुसरा: स्वप्नं विकणारा माणूस स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी विषयाचा धडा दुसरा: स्वप्नं विकणारा माणूस यामध्ये स्वप्नं विकणारा माणूस, त्याचे अनुभव, आणि गावकऱ्यांवरील प्रभाव यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, शब्दांचे अर्थ, आणि वाक्प्रचार यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, स्वप्नं विकणारा माणूस, धडा दुसरा स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, स्वप्नं विकणारा माणूस प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال