१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता आठवी मराठी पाठ १२: गोधडी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवी मराठी पाठ १२: गोधडी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवी मराठी पाठ १२: गोधडी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवीच्या मराठी विषयातील पाठ १२ "गोधडी" ही कविता आई-वडिलांच्या मायेच्या आठवणी आणि कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, कृती, आणि कवितेचे विश्लेषण यांचा समावेश आहे. (Iyatta 8vi Marathi Godhadi Swadhyay)

प्रश्न १: आकृत्या पूर्ण करा

अ) गोधडीची वैशिष्ट्ये
वैशिष्ट्य
फक्त चिंध्यांचा बोचका नसते.
मायेलाही ऊब देणारी.
बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर.
आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर.
आ) गोधडीत चिंधीच्या रूपाने आठवणीत दडलेल्या व्यक्ती
व्यक्ती
आई
वडील
मामा
भाचा

प्रश्न २: कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा

  1. आयुष्यभर कष्ट
  2. संसारात खाल्लेल्या खस्ता
  3. मायेची ऊब
  4. स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी

प्रश्न ३: तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दांत व्यक्त करा

मी चौथीत असताना निबंध लेखन स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. त्यावेळी मला बक्षीस म्हणून "श्यामची आई" हे पुस्तक मिळाले होते. माझ्या आयुष्यातील ते पहिलेच बक्षीस असल्यामुळे मला त्या पुस्तकाविषयी खूप प्रेम आहे. ते पुस्तक मिळाल्यावर काही दिवसांतच वाचून पूर्ण केले आणि माझ्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या कपाटात जपून ठेवले आहे. माझा जीव त्या पुस्तकामध्ये अजूनही गुंतलेला आहे.

प्रश्न ४: आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द/शब्दसमूह लिहा

  • मायेलाही मिळणारी ऊब
  • गोधडीत दटावून बसवलेल्या चिंध्या
  • लुगड्याचे पटकुर
  • बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे
  • आईची स्मृतींची सुई

प्रश्न ५: खालील ओळींतील भाव स्पष्ट करा

अ) ‘गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते.’
गोधडी हे आई-वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आई-वडिलांनी खूप कष्ट सोसले. त्यांच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसतात. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय. कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई-वडिलांचे आहे, असे कवींना सुचवायचे आहे.
आ) ‘गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब.’
गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते. त्यात आईच्या लुगड्यांचे आणि बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले आहे. जणू आई-वडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते. म्हणून कवी म्हणतात, गोधडी केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे.

लिहिते होऊया

‘गोधडीचे आत्मकथन’ या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा
मी गोधडी बोलत आहे. मला काही जण वाकळ या नावाने देखील ओळखतात. माझा जन्म एका गरीब शेतमजुराच्या घरी झाला. श्रीमंत लोकांच्या घरी मी जन्म घेत नाही. माझ्या झोपडीच्या अवतीभवती अशाच शेतमजूरांची घरे आहेत. आमच्या घरी एक लहानगे बाळ होते. एकदा गंमतच झाली. ते बाळ अचानक खूप रडायला लागले. आईने त्याला कोणतेतरी खेळणे दिले तरी त्याने ते घेतले नाही. मग तिने त्याला आपल्या पोटाशी घट्ट धरले. तेव्हा त्याने रडणे थांबवले. आईच्या लक्षात आले की त्याला थंडी वाजत असावी. तिने मला त्याच्यावर पांघरले आणि तो चक्क हसला. रात्रभर तो माझ्याच कुशीत दडून होता. माझ्या जन्माचीही एक कहाणी आहे. आईने खूप साऱ्या चिंध्या गोळा केल्या. त्यात तिच्या कधीकाळी आवडीचे पण आता जीर्ण होऊन चिंध्या-चिंध्या झालेले तिचे लुगडे होते. बाबांच्या सदऱ्याचे तुकडे होते. मामाने तिला घेऊन दिलेल्या लुगड्याच्या चिंध्या होत्या. त्या चिंध्या तिने एकत्र गोळा केल्या. त्यातून माझा जन्म झाला. मला झोपडीतच राहणे आवडते.

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
हा स्वाध्याय WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. आवडल्यास खाली कमेंट करा! (Share Iyatta 8vi Marathi Godhadi Swadhyay)
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास कमेंट करा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता आठवी मराठी पाठ ११: गोधडी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवी मराठी पाठ ११: गोधडी यामध्ये कविता, मायेच्या आठवणी, आणि कष्टमय जीवनाचे वर्णन आहे. Vidyarthyansathi upyukt Marathi abhyas sahitya ani prernadayi katha. (Iyatta 8vi Marathi Godhadi)

कीवर्ड्स: इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय, गोधडी, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, Iyatta 8vi Marathi, Godhadi, kavita, aathvani, Marathi abhyas, 8vi swadhyay

संबंधित स्वाध्याय: इयत्ता आठवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

FAQ: इयत्ता आठवी मराठी पाठ १२ गोधडी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

१. गोधडी स्वाध्याय कोणत्या विषयाचा आहे?

हा स्वाध्याय इयत्ता आठवीच्या मराठी विषयाचा आहे, ज्यामध्ये गोधडी कवितेच्या आधारे आई-वडिलांच्या मायेच्या आठवणी आणि कष्टांचे वर्णन आहे.

२. गोधडी कवितेत आईच्या वैशिष्ट्यांचे कसे वर्णन आहे?

आईच्या वैशिष्ट्यांमध्ये आयुष्यभर कष्ट, संसारात खाल्लेल्या खस्ता, मायेची ऊब आणि स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी यांचा समावेश आहे.

३. गोधडी म्हणजे काय?

गोधडी ही चिंध्यांपासून बनवलेली रजई आहे, जी केवळ उब देणारी नसून आई-वडिलांच्या मायेच्या आठवणींनी भरलेली आहे.

४. गोधडी कवितेतून कोणता संदेश मिळतो?

गोधडी कवितेतून मायेची ऊब, कष्टमय जीवनातील प्रेम आणि आठवणींचे महत्त्व यांचा संदेश मिळतो.

Previous Post Next Post

نموذج الاتصال