१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता आठवी मराठी पाठ १३: पाड्यावरचा चहा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवी मराठी पाठ १३: पाड्यावरचा चहा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवी मराठी पाठ १३: पाड्यावरचा चहा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवीच्या मराठी विषयातील पाठ १३ "पाड्यावरचा चहा" हा पाठ वारली लोकांच्या साध्या जीवनशैलीचे, त्यांच्या खोपट्यांचे आणि कष्टमय जीवनाचे वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, कृती, आणि त्यांच्या जीवनाचे विश्लेषण यांचा समावेश आहे. (Iyatta 8vi Marathi Padyavarcha Chaha Swadhyay)

प्रश्न १: पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्‌द्यांना अनुसरून वर्णन करा

अ) खोपटे वसण्याचे ठिकाण
बहुतांश खोपटी ही साधारण उंचावट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीत वसवलेली असतात.
आ) खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य
कारव्या किंवा कामट्याच्या काठ्या, खोपट्यांना मेढी, चौकटीची लाकडे व इतर चार-सहा वासे वापरलेले असतात. पावसापासून संरक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने इत्यादी साहित्य वापरले जाते.
इ) दारे, खिडक्या व छप्पर
खोपटाला एकच दार असते, खिडक्या नसतातच, भिंतीच्या कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात तीच खिडकी. कामट्यांचे छप्पर असते. त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाने पसरतात.
ई) दालन
खोपटाला एकच दालन असते. त्यातच स्वयंपाक होतो, बसण्या-उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठीसुद्धा तेच दालन, सर्व व्यवहार एकाच दालनात केले जातात.

प्रश्न २: पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा

अ) माची
बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी वस्तू जिचा वापर पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवण्यासाठी केला जातो.
आ) लहान लहान खड्डे
वारल्यांची कोंबडी हीच खरी संपत्ती असते. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात.
इ) सारवलेला ओटा
वारल्यांच्या घराभोवती घराला लागून सहा ते नऊ इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो. ते तो सारवतात. बसण्या-उठण्यासाठी याचाच उपयोग करतात.

प्रश्न ३: आकृत्या पूर्ण करा

अ) निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द
खाई
आ) वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत
डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायाचा.

प्रश्न ४: कारणे लिहा

अ) लेखिका निराश झाली तरी तिने स्वत:ला सावरले, कारण...
त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ अविचल होती.
आ) लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण...
ज्यांच्यासाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या, त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हता, त्यांची विचारपूस करीत नव्हता, कोणी त्यांची दखल घेत नव्हता, इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला, कोणी येण्याचे चिन्हच दिसत नव्हते.

प्रश्न ५: लेखिका आणि कॉ. दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघतक्ता करा

  1. पाहुण्यांना झोपडीत नेलं.
  2. एकानं खोली झाडली.
  3. दुसऱ्याने हातरी अंथरली.
  4. इतक्यात काहींनी बाज आणली.
  5. जे दहापंधराजण जमले होते, ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले.

प्रश्न ६: पाठाच्या आधारे लिहा

अ) चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा.
वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा? आणि मग चहा करणार तरी कसा? वारली खरेदी करू शकत नाहीत; तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान थाटील? एक कप चहा प्यायचा असेल, तर तीन मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती. गावात कोणाकडेही गाय किंवा म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंबसुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. याउलट, दररोजच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ, भाकरीचे पीठ, आंबील हे पदार्थ तरी घरी मिळू शकतात, त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते. पण चहा करणे शक्यच नव्हते.
आ) तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धततील फरक स्पष्ट करा.
वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते. त्यांच्या घरात साखर, चहापूड या गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या. त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडण्यासारख्या नव्हत्या. क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर तीन मैलांवर अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागे. कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाई. आमच्या घरी दरमहिन्याला सामान एकदम भरून ठेवले जाते. घरात महिन्याभरासाठी लागणारी साखर, चहापूड आणून ठेवलेली असते. दूधवाला दररोज दूध आणून देतो. यामुळे दररोज सकाळ, संध्याकाळ चहा पिण्याचा कार्यक्रमच घरात चालतो. हे वारल्यांना शक्य नव्हते.

खेळूया शब्दांशी

अ) जोड्या लावा
‘अ’ गट‘ब’ गटउत्तरे
ब्रह्मांड आठवणेकायमची गरिबी असणेअसाहाय्यतेतून भीती वाटणे
अठरा विश्वे दारिद्र्य असणेअनिश्चिततेतून येणारी अस्वस्थताकायमची गरिबी असणे
निपचित पडणेशांत पडून राहणेशांत पडून राहणे
हुरहुर वाटणेअसाहाय्यतेतून भीती वाटणेअनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता
आ) खालील नादानुकारी शब्द लिहा
  1. कोंबड्यांचा - फडफडाट
  2. पाखरांचा - चिवचिवाट
  3. पाण्याचा - खळखळाट
इ) खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा
  1. गैरहजर × हजर
  2. उंच × ठेंगणी
  3. भरभर × हळूहळू
  4. अदृश्य × दृश्य
  5. उशिरा × लवकर
ई) खालील वाक्ये वाचा व तक्ता पूर्ण करा
वाक्यउपमेयउपमानसाम्यवाचक
आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.आईचे प्रेमसागरजणू
आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे.मायाआभाळगत
त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.त्याचे अक्षरमोतीसारखे
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.गुलाबी उषापरमेश्वराचे प्रेमजणू

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
हा स्वाध्याय WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. आवडल्यास खाली कमेंट करा! (Share Iyatta 8vi Marathi Padyavarcha Chaha Swadhyay)
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास कमेंट करा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता आठवी मराठी पाठ १३: पाड्यावरचा चहा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवी मराठी पाठ १३: पाड्यावरचा चहा यामध्ये वारली लोकांचे कष्टमय जीवन, खोपट्यांचे वर्णन आहे. Vidyarthyansathi upyukt Marathi abhyas sahitya ani prernadayi katha. (Iyatta 8vi Marathi Padyavarcha Chaha)

कीवर्ड्स: इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय, पाड्यावरचा चहा, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, Iyatta 8vi Marathi, Padyavarcha Chaha, warli lok, Marathi abhyas, 8vi swadhyay

संबंधित स्वाध्याय: इयत्ता आठवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

FAQ: इयत्ता आठवी मराठी पाठ १३ पाड्यावरचा चहा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

१. पाड्यावरचा चहा स्वाध्याय कोणत्या विषयाचा आहे?

हा स्वाध्याय इयत्ता आठवीच्या मराठी विषयाचा आहे, ज्यामध्ये वारली लोकांच्या खोपट्यांचे वर्णन आणि त्यांच्या जीवनातील कष्टांचा समावेश आहे.

२. वारली लोकांच्या खोपट्यांचे वैशिष्ट्य काय आहे?

खोपटी साधारण उंचावट्यावर, झाडांच्या सावलीत वसवलेली असते, एकच दार आणि दालन असते, आणि कारव्या, कामट्या, पेंढा किंवा पळसाची पाने यांचा वापर केला जातो.

३. वारली लोकांसाठी चहा बनवणे का कठीण आहे?

चहा बनवण्यासाठी साखर, चहापूड आणि दूध तीन मैलांवरील दुकानातून आणावे लागते, तर जेवणासाठी लागणारे पदार्थ घरी उपलब्ध असतात.

४. लेखिकेची निराशा आणि प्रेरणा यांचे कारण काय?

लेखिका निराश झाली कारण कोणीही तिची दखल घेत नव्हते, पण तिची ध्येयावरील निष्ठा आणि गरिबांविषयीची तळमळ यामुळे तिने स्वत:ला सावरले.

Previous Post Next Post

نموذج الاتصال