इयत्ता सातवी मराठी पाठ: गचकअंधारी स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील पाठ "गचकअंधारी" ही एक विनोदी कथा आहे, जी सदा आणि त्याचा मुलगा गजानन यांच्या गैरसमजांमुळे निर्माण झालेल्या मजेदार प्रसंगांचे वर्णन करते. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, वाक्प्रचार, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लावण्यास आणि भाषिक कौशल्य वाढवण्यास मदत करते.
गचकअंधारी - प्रश्न १: कारणे लिहा
प्रश्न १: खालील वाक्ये वाचा. प्रत्येक घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा
अ) सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.
सदा मडकी विकायला जात असताना ती गाढवाच्या पाठीवर लादून नेत असे. जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत असे. त्यामुळे गाढवाची पाठ रिकामी असे. म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.
आ) गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
सदाने वाघासिंहाला खाणाऱ्या गचकअंधारीची भीती गज्याला दाखवल्यामुळे गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
इ) वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.
सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता. परंतु, वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचकअंधारी बसली आहे. जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले. तो धाडधाड उडू लागला. ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.
ई) सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.
वाघाच्या पाठीवर आपण बसलो आहे हे जेव्हा सदाच्या लक्षात आले, तेव्हा तो खूपच घाबरला. यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.
गचकअंधारी - प्रश्न २: माहिती लिहा
प्रश्न २: खालील मुद्द्यांवर दोन-तीन वाक्यांत माहिती लिहा
सदाचा व्यवसाय
सदाचा गाडगी, मडकी तयार करून विकण्याचा धंदा होता.
सदाचा मुलगा गजानन
सदाला गजानन नावाचा मुलगा होता. एकदा त्याने सदबरोबर शेजारच्या गावी बाजाराला जाण्याचा हट्ट धरला.
सदाची झालेली फजिती
गाढवाला शोधताना सदा काळोखात खिंदरात आला. वाघाला गाढव समजून सदा त्याच्या पाठीवर बसला. सदाच्या व मुलाच्या संवादातून वाघाला गचकअंधारीबाबत समजले होते. तिची भीती वाघाच्या मनात होती. सदा पाठीवर बसलेला बघून वाघाला वाटले की गचकअंधारी बसली आहे, म्हणून वाघ प्रचंड घाबरला.
सदाने स्वतःची केलेली सोडवणूक
सदाला जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले, तेव्हा तो खूप घाबरला. अशा परिस्थितीतून सदा स्वतःची सुटका कशी करून घ्यावी या विचारात होता. तेव्हा वाघ वडाच्या झाडाखालून जाऊ लागताच सदाने लोंबकळणारी पारंबी पकडली व सरसर झाडावर चढून गेला. पाठीवरून गचकअंधारी गायब झाल्यामुळे वाघानेही पळ काढला.
गचकअंधारी - प्रश्न ३: कोण म्हणाले
प्रश्न ३: कोण, कोणास व का म्हणाले?
अ) ‘‘कै भेव नोका दाखू मले वाघाफाघाचा.’’
असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला. सदाला आपला मुलगा गजानन याला बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गजाननला वाघाची भीती दाखवत होता. हे नाकारण्यासाठी गजानन आपल्या वडिलांना म्हणाला.
आ) ‘‘या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली त म्हनू नोको मले.’’
असे सदा गजाननला म्हणाला. गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता म्हणून सदाने त्याला गचकअंधारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले.
इ) ‘गचकअंधारी झटके देऊन रायली.’
असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला. सदाला आपण वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळल्यावर सदा घाबरून धाडधाड उडू लागला. वाघाला वाटले की हे गचकअंधारीचे कृत्य आहे, म्हणून वाघ स्वतःशीच हे वाक्य म्हणाला.
ई) ‘गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती.’
असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला. पारंबीला लोंबकळून सदाने वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली. तेव्हा वाघाला वाटले की गचकअंधारी आपोआप गेली. म्हणून घाबरलेला वाघ स्वतःशीच असे म्हणाला.
गचकअंधारी - प्रश्न ४: एक शब्द लिहा
प्रश्न ४: आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून ‘पंचक्रोशी’ म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा
अ) ज्यास कोणी शत्रूनाही, असा.
अजातशत्रू
आ) मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण.
पाणपोई
इ) धान्य साठवण्याची जागा.
कोठार
ई) दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा.
मनकवडा
उ) डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता.
बोगदा
गचकअंधारी - प्रश्न ५: जोड्या लावा
प्रश्न ५: खालील चौकोनात विशेष्य व विशेषणे एकत्रित दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा
| विशेष्य | विशेषण |
| काळोख | किट्ट |
| चपळाई | विलक्षण |
| पारंबी | लोंबणारी |
| पाऊस | वादळी |
गचकअंधारी - प्रश्न ६: वाक्प्रचार पूर्ण करा
प्रश्न ६: कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पूर्ण करा (मेटाकुटीला येणे, गिल्ला करणे, घाबरगुंडी उडणे, शंकेची पाल चुकचुकणे)
अ) पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच ..................... .
पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला.
आ) उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात ..................... .
उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
इ) लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव ..................... .
लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला.
ई) पोलिसांना बघून चोरांची ..................... .
पोलिसांना बघून चोरांची घाबरगुंडी उडाली.
गचकअंधारी - प्रश्न ७: विनोदी प्रसंग
प्रश्न ७: हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात, असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा
१) वाघाला गाढव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसला.
२) सदाच्या अंगाला घाम फुटला. तो वाघाच्या पाठीवर बसला. पण त्यामुळे वाघ घाबरला. त्याला वाटले की गचकअंधारी आता आपल्याला पाण्यात भिजवून भिजवून खाणार.
३) आपला जीव वाचण्यासाठी सदा वडाच्या झाडावर चढला. पण वाघाला मात्र आपणच गचकअंधारीपासून सुटलो याचा आनंद झाला आणि तो पळत सुटला.
गचकअंधारी - प्रश्न ८: मत लिहा
प्रश्न ८: ‘गचकअंधारी’ हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे, याबाबत तुमचे मत लिहा
गचकअंधारी हे पात्र पूर्णतः काल्पनिक आहे. कारण गचकअंधारी या नावाचा कोणताही प्राणी अस्तित्वात नाही. ही लेखकाची एक कल्पना आहे.
गचकअंधारी - प्रश्न ९: महत्त्व स्पष्ट करा
प्रश्न ९: पाठाच्या दृष्टीने ‘गचकअंधारी’ या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा
गचकअंधारी हे पात्र काल्पनिक असले तरीही ते या कथेचे नायक आहे. या कथेतील सर्व कथानक या पात्राभोवती फिरत राहते. गचकअंधारीचे नाव व वर्णन ऐकून गजानन बाजारात जाण्याचा हट्ट सोडून देतो. वाघाने गचकअंधारीला पाहिले नसले तरीही वाघ त्याला घाबरतो. शेवटी गचकअंधारीपासून आपली सुटका झाली या आनंदात वाघ पळून जातो. एकूणच संपूर्ण कथानक गचकअंधारीने व्यापलेले आहे. हे या पात्राचे पाठातील महत्त्व आहे.
गचकअंधारी - प्रश्न १०: शब्दयोगी अव्यये
प्रश्न १०: खालील परिच्छेद वाचा. त्यातील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते.
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारवर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते.
FAQ आणि शेअरिंग
FAQ आणि शेअरिंग
मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!
इयत्ता सातवी मराठी पाठ: गचकअंधारी स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवी मराठी विषयाचा पाठ: गचकअंधारी यामध्ये सदा आणि गजानन यांच्या गैरसमजांमुळे निर्माण झालेल्या विनोदी प्रसंगांचे वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, वाक्प्रचार, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.
कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, गचकअंधारी, पाठ आठवा स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, गचकअंधारी प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF, विनोदी कथा
संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: