१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी मराठी पाठ 7:माझी मराठी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी पाठ: माझी मराठी स्वाध्याय

इयत्ता सातवी मराठी पाठ: माझी मराठी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील कविता "माझी मराठी" ही मराठी भाषेची थोरवी, तिचे सांस्कृतिक महत्त्व, आणि भावनिक नाते यांचे काव्यात्मक वर्णन करते. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, यमक शब्द, आणि शुभेच्छा संदेश यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लावण्यास मदत करते.

माझी मराठी - प्रश्न १: आकृती पूर्ण करा

प्रश्न १: खालील आकृत्या पूर्ण करा

अ) कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते.
आई व मुलीचे
आ) खरा भाग्यवंत.
मराठी भाषेचे अमृत ज्याने प्राशन केले आहे तो.
इ) मराठी भाषेची वैशिष्ट्ये.
रत्न कांचनच्या मोलाची
उष्ण लोखंडासारखी
शीतल चांदण्यासारखी
ई) मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द.
आई
अमृत
ओवी

माझी मराठी - प्रश्न २: काव्यपंक्ती शोधा

प्रश्न २: खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा

अ) विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे.
लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली.
आ) माझ्या मराठीची ओवी दूर देशांतही ऐकायला मिळते.
दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी.

माझी मराठी - प्रश्न ३: भाव व्यक्त करा

प्रश्न ३: खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा

माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई.
माझी भाषा हीच माझी आई आहे. तिच्यामुळेच माझ्या भावनांना अर्थ येतो. तिच्या ऋणात राहावे, तिला कधीच विसरू नये.

माझी मराठी - प्रश्न ४: वाक्ये तयार करा

प्रश्न ४: खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्ये तयार करा

१) ऋण
वनस्पतींचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही.
२) थोरवी
माझ्या मराठी भाषेची थोरवी महान आहे.
३) उतराई
आईच्या उपकारातून कोणीही उतराई होऊ शकत नाही.
४) भाषा
माझी मराठी भाषा हीच माझी आई आहे.

माझी मराठी - यमक जुळणारे शब्द

कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा

शब्दयमक जुळणारा शब्द
आईदेई
भिजलीसजली
थोरवीओवी

माझी मराठी - शुभेच्छा संदेश

खालील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्या निमित्ताने तुमच्या मित्र/मैत्रिणीसाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा

सणसंदेश
गणेश चतुर्थीबाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या येवो हीच गणरायाकडे प्रार्थना! गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गुढीपाडवास्वागत नववर्षाचे, आशा-आकांक्षांचे, सुखसमृद्धीचे, पडता दारी पाऊल गुढीचे!
दिवाळीनवा दिवस नवा ध्यास, सर्वत्र सुरु झाली दिव्यांची आरास दीपावली निमित्त तुमच्या परिवाराला शुभेच्छा खास.
दसरालाखो किरणी उजळल्या दिशा, घेऊनी नवी उमेद, नवी आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
रमजान ईदअल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा.
नाताळआनंद घेऊन नातल आला, निसर्ग हर्ष उल्हासि बहरला सुख-समृद्धी लाभो तुम्हांला, हीच विनंती येशूला.
रंगपंचमीरले सुरले क्षण जेवढे, आनंदाने जगत जाऊ.. रंगात रंगून होळीच्या, हर्ष उधळत राहू.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी मराठी पाठ: माझी मराठी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी विषयाची कविता: माझी मराठी यामध्ये मराठी भाषेची थोरवी, तिचे सांस्कृतिक महत्त्व, आणि भावनिक नाते यांचे काव्यात्मक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, यमक शब्द, आणि शुभेच्छा संदेश यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, माझी मराठी, पाठ सातवा स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, माझी मराठी प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF, मराठी कविता

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال