१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी मराठी पाठ 9:नात्याबाहेरचं नातं स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी पाठ: नात्याबाहेरचं नातं स्वाध्याय

इयत्ता सातवी मराठी पाठ: नात्याबाहेरचं नातं स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील पाठ "नात्याबाहेरचं नातं" ही डांग्या नावाच्या कुत्र्याच्या पिल्लाशी लेखकांचे भावनिक नाते आणि त्याच्या विलक्षण कर्तबगारीचे वर्णन करते. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, वाक्प्रचार, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लावण्यास आणि भाषिक कौशल्य वाढवण्यास मदत करते.

नात्याबाहेरचं नातं - प्रश्न १: कारणे लिहा

प्रश्न १: खालील विधानांमागील कारणे लिहा

अ) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
आ) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव ‘डांग्या’ ठेवले.
कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते, म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या ठेवले.
इ) लेखक डांग्याला ‘पक्क्या हिमतीचा राखण्या’ म्हणतात.
डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती की, अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची. डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीनं भल्याभल्यांची बोबडी वळायची. म्हणून लेखक डांग्याला ‘पक्क्या हिमतीचा राखण्या’ म्हणतात.

नात्याबाहेरचं नातं - प्रश्न २: आकृत्या पूर्ण करा

प्रश्न २: खालील आकृत्या पूर्ण करा

अ) थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये.
१) हळवा
२) सर्वांगाला वेढून टाकणारा
३) नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा
४) रान, पानाफुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा
इ) खालील बाबतींत डांग्याचे वर्णन करा: दिसणे, शरीरयष्टी, चाल, नजर.
जसजसे डांग्याचे वय वाढत चालले होते तसे त्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता. डोळ्यांखाली असणारे पिवळसर पत्ते व मागच्या पायाच्या बोटांवर असलेले लाल सोनेरी पत्ते सगळ्यांचे लक्ष आकर्षित करणारे होते. डांग्याची शरीरयष्टी दणकट होती. त्याचे शरीर सगळ्यांच्याच नजरेला भुरळ घालणारे होते. डांग्याची दुडूदुडू चाल सर्वांना भावणारी होती. डांग्याचे तेजस्वी डोळे बोलके होते.
आ) कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असह्य झाली, हे वर्णन करणारी पाठातील वाक्ये.
१) अंगाचं गाठोडं करून पडलेलं.
२) समोरच्या दोन्ही पायांत मान खुपसलेली.
३) हुडहुडी रोखण्याचा त्याचा चालेला प्रयत्न आम्हांला सुन्न करून गेला.
४) थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जणू कुणी पाणी शिंपडलंय की काय असा भास झालेला.
५) इवल्याश्या जीवाला तशी थंडी असह्यच.

नात्याबाहेरचं नातं - प्रश्न ३: परिणाम लिहा

प्रश्न ३: खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा

घटनापरिणाम
लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला.पिल्लाला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला.
कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं.पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले.
लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श.डांग्याच्या डोळ्यांत लख्ख प्रकाश जाणवला. त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं.
लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली.डांग्या मागच्या दोन्ही पायांवर उभे राहून लेखकांच्या येण्याची चाहूल घ्यायचा.

नात्याबाहेरचं नातं - प्रश्न ४: जोड्या लावा

प्रश्न ४: योग्य जोड्या लावा

‘अ’ गट‘ब’ गट
पिल्लाची धडपड पाहूनपावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली
रात्र आगेकूच करू लागलीथंडीची लाट वाढली
वाऱ्याने हलणारी डहाळीमन आकर्षित करत होती
इवल्याशा जिवालाथंडी असह्य होत होती

खेळूया शब्दांशी

खेळूया शब्दांशी

अ) खालील शब्दांचे तुम्हांला समजलेले अर्थ लिहा.
शब्दअर्थ
हुडहुडीथंडीने अंग थरथर कापणे
रुखरुखमनात हळहळ वाटत राहणे
फुलोरफुलांच्या आधी येणारा परागांचा गुच्छ
अष्टपैलू व्यक्तिमत्त्वअनेक गोष्टींत कुशल असणारी व्यक्ती
विश्वस्तविश्वासार्ह व्यक्ती
सोहळासमारंभ
आ) खालील शब्दांचा सहसंबंध लावा.
शब्दसहसंबंध
शुभ्रचांदणे
प्रसन्नसकाळ
लालसोनेरीपट्टे
निळसरप्रकाश
हळदुलीकिरणे
इ) खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दांतून दोन-दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा.
शब्दविरुद्धार्थी शब्द
थंडगरम, उष्ण
शांतबडबड्या, बोलका
मानअवमान, अपमान
स्वदेशपरदेश, विदेश
आरंभशेवट, अखेर
ई) खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट‘ब’ गट
कणव निर्माण होणेदया निर्माण होणे
काळजात धस्स होणेभीतीने धक्का बसणे
उत्साह द्विगुणित होणेउत्साह वाढणे
भुरळ घालणेआकर्षित करणे

आपण समजून घेऊया

आपण समजून घेऊया

खालील शब्दांचा ‘क्रियाविशेषण’ व ‘शब्दयोगी अव्यये’ असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा: पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर.
शब्दक्रियाविशेषण अव्ययशब्दयोगी अव्यय
पुढेसूरज सार्थकच्या पुढे आहे.घरापुढे मोठे अंगण आहे.
मागेती मागे थांबली.घरामागे माडाची झाडे आहेत.
बाहेरबाहेर खूप थंडी आहे.घराबाहेर पडू नका.
जवळसमुद्र जवळ आहे.घराजवळ खेळाचे मैदान आहे.
नंतरतू नंतर ये.मी शाळा सुटल्यानंतर खेळायला जाईन.
खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा.
वाक्यअव्ययसंबंध
मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे.नंतरपरीक्षा
तुझ्यादेखील हे लक्षात कसे आले नाही?देखीलतुझ्या
रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते.वरीलरस्ता
देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?कडेदेण्या

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी मराठी पाठ: नात्याबाहेरचं नातं स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी विषयाचा पाठ: नात्याबाहेरचं नातं यामध्ये डांग्या नावाच्या कुत्र्याच्या पिल्लाशी लेखकांचे भावनिक नाते आणि त्याच्या कर्तबगारीचे वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, वाक्प्रचार, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, नात्याबाहेरचं नातं, पाठ नववा स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, नात्याबाहेरचं नातं प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF, डांग्या, भावनिक नाते

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال