१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी मराठी पाठ 19:धोंडा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी पाठ: धोंडा स्वाध्याय

इयत्ता सातवी मराठी पाठ: धोंडा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील पाठ "धोंडा" ही राजूच्या जिज्ञासूवृत्तीमुळे सापडलेल्या परग्रहावरील धोंड्याची वैज्ञानिक कथा आहे। या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लावण्यास आणि भाषिक कौशल्य वाढवण्यास मदत करते।

धोंडा - प्रश्न १: आकृत्या पूर्ण करा

प्रश्न १: खालील आकृत्या पूर्ण करा

अ) राजूचे गुणविशेष

१) अतिशय चलाख
२) चाणाक्ष
३) जिज्ञासू
४) हुशार
५) चौकस बुद्धीचा

आ) राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये

१) गुळगुळीत, खरखरीत, फुगीर व जड
२) अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा
३) प्रखर प्रकाशकिरण बाहेर फेकणारा
४) फेकल्यावर उड्या मारत जाणारा
५) हिऱ्यासारखा चमकणारा

इ) शास्त्रज्ञ डॉ. पंडितांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती

१) धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे।
२) मानवापेक्षा कित्येक पटींनी तो बुद्धिमान असतो।
३) सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तू देखील गिळू शकतो।
४) प्रजननक्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करू शकतो।
५) अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत।

धोंडा - प्रश्न २: केव्हा घडले

प्रश्न २: हे केव्हा घडले ते लिहा

अ) राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली।

गुळगुळीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला, हे जेव्हा घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली।

आ) प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते।

मध्यरात्र झाली होती। राजूने जिथे तो धोंडा ठेवला होता तो ड्रॉवर उघडला। ड्रॉवर उघडताच ती खोली प्रकाशाने झळकून गेली। धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता। त्याच्यापासून विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या। त्यावेळी त्या प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते।

इ) राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला।

धोंड्यापासून एका लहान धोंड्यची निर्मिती झाली, हे राजूने पाहिले। दोन प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते। नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला, असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला।

धोंडा - प्रश्न ३: मन:स्थिती

प्रश्न ३: चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मन:स्थिती, याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा

राजूला चकाकणारा दगड सापडल्यानंतर त्याचं कुतूहल जागृत झालं होत। मध्यरात्री तो गडबडून उठला। प्रखर प्रकाशातही आईबाबा झोपलेले पाहून तो गांगरला होता। प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला होता। त्या धोंड्यापासून दुसऱ्या धोंड्याची निर्मिती झालेली पाहून तो घाबरला होता। लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीतीमिश्रित गंमत वाटली। सकाळी हे दोन धोंडे पाहून त्याचं हृदय धडधडलं। अशी राजूची मनःस्थिती झाली होती।

धोंडा - प्रश्न ४: क्रमाने लिहा

प्रश्न ४: राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा

१) राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला।
२) राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला।
३) रात्री दोन्ही धोंडे चमकत होते।
४) राजू शाळेत गेला। त्याने डॉ. घोटे यांचे व्याख्यान ऐकले।
५) राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठींबा मिळाला।
६) राजूने धोंडे शास्त्रज्ञ डॉ. अनिल घोटे यांना दिले।

धोंडा - प्रश्न ५: गुणांचे महत्त्व

प्रश्न ५: चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे गुण तुम्हांला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा

चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे गुण मला महत्त्वाचे वाटतात कारण हेच गुण वैज्ञानिक शोधांची जननी आहेत।

खेळूया शब्दांशी

खेळूया शब्दांशी

कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा (करडा, विचारशृंखला, अस्वस्थता, घालमेल)

अ) लेखकांची विचारशृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला।
आ) शिक्षकांचा करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले।
इ) वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत होती।
ई) रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले।

खेळ खेळूया

खेळ खेळूया

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा

१) अति शहाणा त्याचा बैल रिकामा।
२) एक ना धड भराभर चिंध्या।
३) ऐकावे जनाचे करावे मनाचे।

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल।

हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा। स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!

स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा।

आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल। खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी मराठी पाठ: धोंडा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी विषयाचा पाठ: धोंडा यामध्ये राजूच्या जिज्ञासूवृत्तीमुळे सापडलेल्या परग्रहावरील धोंड्याची वैज्ञानिक कथा आहे। या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे। विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे। Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा।

कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, धोंडा, पाठ स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, धोंडा प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF, वैज्ञानिक जिज्ञासा, परग्रह

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال