१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी मराठी पाठ 15:असे जगावे स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी पाठ: असे जगावे स्वाध्याय

इयत्ता सातवी मराठी पाठ: असे जगावे स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील पाठ "असे जगावे" ही निर्भयपणे संकटांचा सामना करत हसतमुख जगण्याची प्रेरणा देणारी कविता आहे। या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, काव्यविश्लेषण, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लावण्यास आणि भाषिक कौशल्य वाढवण्यास मदत करते।

असे जगावे - प्रश्न १: जोड्या लावा

प्रश्न १: जोड्या लावा

‘अ’ गट‘ब’ गट
१) कवेत अंबर घेतानापाय जमिनीवर असावेत
२) काळीज काढून देतानाओठांवर हसू असावे
३) शेवटचा निरोप देतानाजगाला गहिवर यावा
४) इच्छा दांडगी असेल तरअनेक मार्ग मिळतात

असे जगावे - प्रश्न २: अर्थ लिहा

प्रश्न २: खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा

करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना

या जगाचा शेवटचा निरोप घेताना, म्हणजेच दुनियेतून निघून जाताना, मृत्यू येताना असे काहीतरी भव्य-दिव्य कर्तृत्व करून जावे, की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे. तुमची आठवण यावी, अशी काहीतरी कामगिरी करून जा.

असे जगावे - प्रश्न ३: संकटात कसे वागावे

प्रश्न ३: संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा

संकटांना निर्भयपणे सामोरे जावे. त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे. डोळ्याला डोळा भिडवून निडरपणे संकटाचा सामना करावा. संकटांना जशास तसे उत्तर द्यावे.

असे जगावे - प्रश्न ४: प्रसंग वर्णन

प्रश्न ४: ‘संकटांना न घाबरता तोंड द्यावे’, याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा

सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार वि.स.खांडेकर यांची हरिणी व पारधी ही एक रूपक कथा आहे. हरिणी जीवाच्या आकांताने धावत होती. तिच्यामागे एक पारधी बाण रोखून तिचा पाठलाग करीत होता. धावत धावत ती एक पहाडाच्या टोकावर आली. पुढे दरी होती आणि मागे पारधी, पुढे जावे तर दरीत कोसळून मरण येणार आणि थांबावे तर पारधी बाण रोखून उभा होता. हरिणी क्षणभर विचार करून थांबली आणि पारध्यासमोर डोळे रोखून उभी राहिली. तिचे ते धैर्य पाहून पारध्याच्या हातातील बाण गळून पडला.

असे जगावे - प्रश्न ५: कवितेचा संदेश

प्रश्न ५: कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा

निर्भयपणे संकटांचा सामना करत हसतमुख जगावे. दिव्य कामगिरी करताना देखील वास्तवाचे भान ठेवावे, परोपकार करताना ओठी हास्य ठेवावे. जगातून निघून जात असताना सगळ्यांच्या स्मरणात राहील, अशी मोठी कामगिरी करावी. हा संदेश कवींनी या कवितेच्या माध्यमातून दिला आहे.

खेळूया शब्दांशी

खेळूया शब्दांशी

अ) खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा
‘अ’ गट‘ब’ गट
१) नजर रोखणेनिर्भयपणे पाहणे
२) पाय जमिनीवर असणेवास्तवाचे भान ठेवणे
३) गगन ठेंगणे होणेखूप आनंद होणे
४) कवेत अंबर घेणेअशक्य गोष्ट शक्य करणे
५) काळीज काढून देणेप्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे
आ) कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा

१) अत्तर : सत्तर/बेहत्तर
२) ताऱ्यांची : स्वप्नांची
३) जाताना : देताना

इ) खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा

१) पाय असावे जमिनीवरती, कवेत आकाश घेताना.
२) असे जगावे, छाताडावर संकटांचे लावून अत्तर.
३) असे दांडगी इच्छा ज्याची, वाटा तयाला मिळती सत्तर.
४) नजर रोखुनी नजरेमध्ये, जीवनाला द्यावे उत्तर.
५) स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कापरा कापरा.

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल।

हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा। स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!

स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा।

आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल। खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी मराठी पाठ: असे जगावे स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी विषयाचा पाठ: असे जगावे यामध्ये निर्भयपणे संकटांचा सामना करत हसतमुख जगण्याचा संदेश आहे। या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, कविता विश्लेषण, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे। विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे। Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा।

कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, असे जगावे, पाठ स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, असे जगावे प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF, काव्यप्रतिभा, कविता

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال