इयत्ता सातवी मराठी पाठ: सलाम-नमस्ते स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील पाठ "सलाम-नमस्ते" हे लेखिका, शेख महंमद, आणि झुबेदा यांच्या प्रामाणिकपणा, सहानुभूती, आणि समाजसेवेच्या भावनांवर आधारित आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, स्वभाववैशिष्ट्ये, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लावण्यास आणि भाषिक कौशल्य वाढवण्यास मदत करते.
सलाम-नमस्ते - प्रश्न १: गुण लिहा
प्रश्न १: खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा
परोपकार
मायाळू
सहानुभूती
कृतज्ञता
सहसंवेदना
सलाम-नमस्ते - प्रश्न २: स्वभाववैशिष्ट्ये लिहा
प्रश्न २: झुभेदाराचा भाऊ – शेख महंमद यांची स्वभाववैशिष्ट्ये
१) प्रामाणिकपणा
२) माणुसकी
३) कष्टाळू वृत्ती
४) दुःखाविषयी तळमळ
सलाम-नमस्ते - प्रश्न ३: शिकवण लिहा
प्रश्न ३: शेख महंमदमार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हांला काय शिकवते?
खर्च भागवल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत. तसेच ज्या हेतूसाठी पैसे कर्जावू घेतले, तो हेतू सफल व्हायला हवा. उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण झुबेदाराच्या कृत्यातून मिळते.
सलाम-नमस्ते - प्रश्न ४: भावना लिहा
प्रश्न ४: लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दांत सांगा
लेखिकेच्या मते तबस्सुम ही गोड मुलगी होती. तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती. ऑफिसमध्ये ती बावरली होती. लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल, याची तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या.
खेळूया शब्दांशी
खेळूया शब्दांशी
| इंग्रजी शब्द | मराठी शब्द |
|---|---|
| ऑफिस | कार्यालय |
| चेक | धनादेश |
| हॉस्पिटल | दवाखाना |
| ॲडव्हान्स | आगाऊ रक्कम |
| ऑपरेशन | शस्त्रक्रिया |
| कॅन्सर | कर्करोग |
विचार करा, सांगा
विचार करा, सांगा
या पाठातील शेख महंमद ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली; कारण शेख महंमद हा खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. या पाठातील दुसरी व्यक्तिरेखा मला लेखिकेची आवडली कारण; त्या सेवाभावी संस्थेमध्ये काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्या मदत करतात.
या पाठातून पुढील संदेश मिळतो, नेहमी सत्याच्या मार्गाने चालावे, लोकांचे दुखः कमी करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावा. गरजू लोकांना यथाशक्ती मदत करावी. सहानुभूती व सहसंवेदना मनामध्ये जागृत असावी. आपल्याला जमेल तशी समाजसेवा करावी.
माहिती मिळवूया
माहिती मिळवूया
मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याचा पिसारा किती सुंदर आहे! मला मोराचा नाच पाहायचा आहे.
फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे. मोकळ्या मैदानात हा खेळ खेळताना छान व्यायाम होतो.
केवलप्रयोगी अव्यये
खालील वाक्यांत योग्य केवलप्रयोगी अव्यये लिहा
अहाहा! काय सुंदर आहे ताजमहाल!
आई ग! किती जोरात ठेच लागली!
अबब! किती उंच आहे ही इमारत!
FAQ आणि शेअरिंग
FAQ आणि शेअरिंग
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!
इयत्ता सातवी मराठी पाठ: सलाम-नमस्ते स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवी मराठी विषयाचा पाठ: सलाम-नमस्ते यामध्ये लेखिका, शेख महंमद, आणि झुबेदा यांचे प्रामाणिकपणा, सहानुभूती, आणि समाजसेवेचे वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, स्वभाववैशिष्ट्ये, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.
कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, सलाम-नमस्ते, पाठ बारावा स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, सलाम-नमस्ते प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF, प्रामाणिकपणा, सहानुभूती
संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: