१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी मराठी पाठ 11:बाली बेट स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी पाठ: बाली बेट स्वाध्याय

इयत्ता सातवी मराठी पाठ: बाली बेट स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील पाठ "बाली बेट" हे इंडोनेशियातील बाली बेटाचे निसर्गरम्य वर्णन, त्याच्या ललितकला, आणि पर्यटन वैशिष्ट्यांवर आधारित आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, आकृती पूर्ण करणे, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लावण्यास आणि भाषिक कौशल्य वाढवण्यास मदत करते.

बाली बेट - प्रश्न १: आकृती पूर्ण करा

प्रश्न १: खालील आकृती पूर्ण करा

अ) बाली बेटावरील विविध ललितकला

१) गायन
२) चित्र
३) शिल्प
४) नृत्य

आ) बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द आणि बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द

बेटाचे वर्णन: रत्नजडित कंठ्यातील कंठमणी
बाली बेटावरील कला: ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ

बाली बेट - प्रश्न २: कल्पना स्पष्ट करा

प्रश्न २: खालील कल्पना स्पष्ट करा

अ) बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे.

एखादा रत्नजडीत कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार पसरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमाण्यातील महत्वाचा मुख्य कंठमणी असतो, तसे बाली बेट आहे म्हणून बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे, असे लेखक म्हणतात.

आ) बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे.

बालीचे पर्यटन खाते हे अतिशय तत्पर आहे. या ठिकाणी असणारे अधिकारी बाली मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात.

इ) ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.

लेखक जेव्हा बाली मधील हॉटेल सागर बीच मध्ये अपरात्री दाखल झाले. तेव्हा त्या हॉटेलमधील स्वागत विभागामध्ये काम करणारे चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. त्यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.

ई) बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती.

‘सागर बीच’ हॉटेलातील बगिच्यामध्ये माडा फोफळीच्या राया होत्या. या बगीच्यामधून फिरताना जणू काही ती झाडेच कोणी मंडळी आली आहेत म्हणून लेखकांकडे पाहत आहेत असे लेखकांना वाटत होते. फुलांनी बहरलेली रोपटी होती. तेथील फुलबागा भल्या पहाटेही टवटवीत होत्या. वेलींचेही अंगधुणे झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होता काही जागी, काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुलांमाणसांनी, लेकीसुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती.

बाली बेट - प्रश्न ३: माहिती लिहा

प्रश्न ३: खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा

§ इंडोनेशियातील बेटांच्या समूहामध्ये बाली हे बेट स्थित आहे.
§ या ठिकाणी असणारी घरे व हॉटेल्स ही निसर्गरम्य परिसरात स्थित आहेत. झापांची छपरे असलेली घरे या ठिकाणी पाहायला मिळतात.
§ या ठिकाणी पर्यटनखात्यामध्ये असणारे अधिकारी पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत करतात.
§ समुद्रकिनारी हॉटेलमध्ये गर्द बगिचा आहे. या बगीच्यात माड आणि पोफळींखेरीज इतर इतकी झाडे आहेत.
§ डोक्यावर विमाने घरघरू लागली आहेत. रेडीओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे.

बाली बेट - प्रश्न ४: अर्थ लिहा

प्रश्न ४: खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा

अ) पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात.

झोपेत रात्री स्वप्ने पडतात. या स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नानाची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते.

आ) पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली.

लेखक हॉटेल वर पोहचल्यावर हॉटेल मधील खोलीत प्रवेश करताच ते थकलेले असल्याने ते पाचच मिनिटांत गाढ झोपी गेले म्हणून पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली असे लेखक म्हणतात.

इ) वेलींचेही अंगधुणे झाले होते.

सागर बीच हॉटेलच्या बगिच्यामध्ये असणाऱ्या वेली या सकाळी पडणाऱ्या दवामुळे ओल्या झाल्या होत्या जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. म्हणून लेखक म्हणतात की, वेलींचेही अंगधुणे झाले होते.

ई) त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो.

पूर्वी राजदरबारी गायक असत, त्यांना भाट असे म्हटले जात आसे. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट आहेत. पाहते पक्षांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही, म्हणून तेच गाऊ लागते. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. असा अर्थबोध वरील ओळीतून होतो.

खेळूया शब्दांशी

खेळूया शब्दांशी

अ) खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या
शब्दअर्थ
टुरिस्टांचा स्वर्गपर्यटक लोकांसाठी बाली हे बेट अत्यंत सुखकारी असल्याने त्याला ‘टुरिस्टांचा स्वर्ग’ असे म्हटले आहे.
किर्र जंगलघनदाट जंगल
अश्राप माणसेमनाने निर्मळ, अतिशय भोळीभाबडी माणसे
गाणारे भाटराजदरबारी असणारे गायक
तंबूतला सिनेमागावोगावी तंबू ठोकून त्यामध्ये सिनेमा दाखवणे
आ) खालील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा
शब्दअर्थ
अभंग१) ओव्या मध्ये असलेला एक मराठी छंद प्रकार
२) काहीही न भंगणारे
बोट१) होडी
२) हाताचे बोट
इ) खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा

१) उभयता - काका व काकू उभयता मुंबईला गेले.
२) यत्किंचितही - सरांनी विचारलेल्या प्रश्नाचे राजूने यत्किंचितही विचार न करता उत्तर दिले.
३) चौघडा - लग्नसमारंभात सनई-चौघडा वाजवला जातो.
४) चित्रविचित्र - जंगलामध्ये चित्रविचित्र प्राणी होते.

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.

हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!

स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.

आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी मराठी पाठ: बाली बेट स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी विषयाचा पाठ: बाली बेट यामध्ये इंडोनेशियातील बाली बेटाचे निसर्गरम्य वर्णन, ललितकला, आणि पर्यटन वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, आकृती पूर्ण करणे, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, बाली बेट, पाठ अकरावा स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, बाली बेट प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF, बाली बेट, पर्यटन

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال