१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा 8:आदर्श राज्यकर्ता स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा आठवा: आदर्श राज्यकर्ता स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा आठवा: आदर्श राज्यकर्ता स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा आठवा "आदर्श राज्यकर्ता" हा पाठ शिवाजी महाराजांचे प्रजाहितदक्ष धोरण, धार्मिक सहिष्णुता, लष्कर व्यवस्था, आणि जोखमीचे प्रसंग यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि ऐतिहासिक घटनांचे वर्णन यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यास मदत करते.

आदर्श राज्यकर्ता - प्रश्न १: पाठात शोधून लिहा

प्रश्न १: पाठात शोधून लिहा

१) शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते?
अफजलखान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शायिस्ताखानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे होते.
२) शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण?
शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे होते.
३) रोहिडखोऱ्या च्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली?
१) शायिस्ताखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिडखोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली.
२) त्यांनी त्या देशमुखास गावोगाव हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले.
३) या कार्यास ‘एका घडीचा दिरंग न करणे’ असे त्यास बजावले.
४) ‘जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल.’ अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी रोहिडखोऱ्या च्या देशमुखास दिली.
४) शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील?
शिवाजी महाराजांनी केलेले स्वराज्यकार्य आणि स्वराज्याचे सुराज्यात केलेले रूपांतर यांची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत आदर्श राहील.

आदर्श राज्यकर्ता - प्रश्न २: लिहिते व्हा

प्रश्न २: लिहिते व्हा

१) रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली?
१) शेतकऱ्याच्या शेतातील भाजीदेखील जबरदस्तीने घेता कामा नये.
२) सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येता कामा नयेत.
३) शेतातील उभी पिके कापू नयेत.
४) शेतकऱ्याची घरे लुटू नयेत.
२) शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते, हे कोणत्या बाबीवरून दिसून येते?
१) इस्लामी सत्तांशी संघर्ष करताना मात्र महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले.
२) शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता, तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोई-सवलती ते तशाच चालू ठेवत असत.
३) मोहिमेवर असताना मशिदींना धक्का लागू नये, कुराणाची प्रत हाती पडल्यास, ती सन्मानाने मुसलमान व्यक्तीच्या ताब्यात द्यावी असा सैनिकांसाठी सक्त नियम केला होता.
४) महाराजांनी आपल्या लष्करात अनेक मुसलमान सहभागी करून घेतले होते.
३) शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा.
१) महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती.
२) शिवाजी महाराजांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली.
३) मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा मानसन्मान केला जाई.
४) लढाईमध्ये जे सैनिक मृत्यू पावत, त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत.
५) लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत असत.

आदर्श राज्यकर्ता - प्रश्न ३: एका शब्दात लिहा

प्रश्न ३: एका शब्दात लिहा

१) स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी
उत्तर: दौलतखान
२) शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी
उत्तर: सुब्रमण्यम भारती
३) बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा
उत्तर: छत्रसाल
४) पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे
उत्तर: महात्मा जोतीराव फुले

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा आठवा: आदर्श राज्यकर्ता स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा आठवा: आदर्श राज्यकर्ता यामध्ये शिवाजी महाराजांचे प्रजाहितदक्ष धोरण, धार्मिक सहिष्णुता, लष्कर व्यवस्था, आणि जोखमीचे प्रसंग यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि ऐतिहासिक घटनांचे वर्णन यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इतिहास अभ्यास साहित्य आणि इतिहासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी इतिहास स्वाध्याय, आदर्श राज्यकर्ता, धडा आठवा स्वाध्याय, 7वी इतिहास स्वाध्याय, इतिहास अभ्यास, आदर्श राज्यकर्ता प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Swadhay, Iyatta Satavi Itihas guide, स्वाध्याय PDF, Shivaji Maharaj, ideal ruler, Maratha history

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال