१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा ५: अन्नपदार्थांची सुरक्षा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा ५: अन्नपदार्थांची सुरक्षा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा ५: अन्नपदार्थांची सुरक्षा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या सामान्य विज्ञानातील "अन्नपदार्थांची सुरक्षा" हा धडा अन्न परिरक्षण, भेसळ, आणि अन्न सुरक्षा यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, अन्न टिकवण्याच्या पद्धती, आणि भेसळीचे परिणाम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षा समजण्यास मदत करते.

प्रश्न १: योग्य पर्याय निवडा

अ. शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला ................... असे म्हणतात.
निर्जलीकरण
आ. दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला ................ असे म्हणतात.
पाश्चरीकरण
इ. मीठ हे ................ आहे.
नैसर्गिक परिरक्षक
ई. व्हिनेगर हे ................. आहे.
रासायनिक परिरक्षक

प्रश्न २: खालील प्रश्नांची उत्तरे

अ. दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात?
१. दूध 80°C तापमानाला 15 मिनिटे तापवले जाते.
२. नंतर ताबडतोब ते थंड केले जाते.
३. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते.
आ. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत?
१. भेसळयुक्त अन्नामुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते.
२. दीर्घकाळ भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात.
३. कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो.
इ. घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आईबाबा काय काळजी घेतात?
१. अन्नपदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे.
२. यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही, आणि अन्न सुरक्षित राहते.
ई. अन्नबिघाड कसा होतो? अन्नबिघाड करणारे विविध घटक कोणते?
१. अयोग्य हाताळणी, साठवण, वाहतूक यामुळे अन्न खराब होते.
२. दूध, मांस यांसारखे आम्लारी पदार्थ बिघडतात.
३. धातूशी संपर्कामुळे रासायनिक प्रक्रियांनी अन्न बिघडते.
४. हवा, पाणी, जमिनीतील सूक्ष्मजीव किंवा कीटकांमुळे अन्न बिघडते.
उ. अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल?
१. गोठणीकरण
२. नैसर्गिक परिरक्षकांचा वापर
३. पाश्चरीकरण
४. अन्न हवाबंद डब्यात ठेवणे

प्रश्न ३: काय करावे बरे?

अ. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात.
१. उघड्यावर ठेवलेली मिठाई खाऊ नये.
२. उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यास पोटाचे आजार होऊ शकतात.
३. अन्नसुरक्षितता कायद्याअनुसार दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते.
आ. पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे.
१. त्याला अस्वच्छतेची चूक समजावून सांगावी.
२. अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या आजारांची माहिती द्यावी.
३. अशा ठिकाणी पाणीपुरी खाणे टाळावे.
इ. बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत.
१. भाजीपाला आणि फळे स्वच्छ धुवून कोरडी करावीत.
२. रेफ्रिजरेटरमध्ये साठवावीत.
३. रेफ्रिजरेटर नसल्यास टोपली किंवा कापडी पिशवीत झाकून ठेवावेत.
ई. उंदीर, झुरळ, पाल यांपासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे.
१. अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावेत.
२. रेफ्रिजरेटर किंवा फडताळात ठेवावेत.
३. अन्न साठवण्यासाठी स्वच्छ जागा निवडावी.

प्रश्न ४: वेगळा कोण?

अ. मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडिअम बेन्झोएट
मीठ
आ. लाखीची डाळ, विटांची भुकटी, मेटॅनिल यलो, हळद पावडर
हळद पावडर
इ. केळी, सफरचंद, पेरू, बदाम
बदाम
ई. साठवणे, गोठवणे, निवळणे, सुकवणे
साठवणे

प्रश्न ५: तक्ता पूर्ण करा

क्र. | पदार्थ | भेसळ
१. हळद पावडर | मेटॅनिल यलो
२. मिरी | पपईच्या बिया
३. रवा | लोहकीस
४. मध | गुळाचे पाणी

प्रश्न ६: असे का घडते?

अ. गुणात्मक अन्ननासाडी होत आहे.
कारण: अन्नसुरक्षेच्या चुकीच्या पद्धती, परिरक्षकांचा अतिरेक, अति शिजवणे, भाज्या चिरून धुणे, वेळेचा अंदाज चुकणे.
उपाय: योग्य परिरक्षण पद्धती, परिरक्षकांचा मर्यादित वापर, अति शिजवणे टाळणे, योग्य वेळेत अन्न पोहोचवणे.
आ. शिजवलेला भात कच्चा लागत आहे.
कारण: भात शिजवताना पुरेसे पाणी न टाकणे.
उपाय: भाताला वाफ देऊन पाणी टाकून पुन्हा शिजवावे.
इ. बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे.
कारण: अयोग्य साठवण, वितरण, हाताळणी.
उपाय: गहू कडक उन्हात वाळवून कोरड्या हवाबंद डब्यात ठेवावे.
ई. दह्याची चव आंबट/कडवट लागत आहे.
कारण: खराब विरजण, जास्त काळ साठवण, अयोग्य तापमान.
उपाय: कडवट दही फेकावे, आंबट दही तापवून किंवा साखर घालून वापरावे.
उ. खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे.
कारण: रासायनिक प्रक्रिया.
उपाय: फळे कापून जास्त काळ ठेवू नयेत, हवाबंद डब्यात ठेवावीत, मिठाचा किंवा साखरेचा थर द्यावा.

प्रश्न ७: कारणे लिहा

१. 5°C तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.
कमी तापमानाला जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो, त्यामुळे अन्न दीर्घकाळ टिकते.
२. सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.
१. पारंपारिक पंगतीत आग्रहाने अन्ननासाडी होते.
२. बुफे पद्धतीत हवे तितके जेवण घेतल्याने नासाडी कमी होते.

FAQ आणि शेअरिंग

हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा ५: अन्नपदार्थांची सुरक्षा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा ५ चा स्वाध्याय: अन्नपदार्थांची सुरक्षा यामध्ये अन्न परिरक्षण, भेसळ, आणि सुरक्षा यांचे शैक्षणिक वर्णन आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि अन्न सुरक्षेची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी सामान्य विज्ञान, अन्नपदार्थांची सुरक्षा, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 7वी स्वाध्याय, मराठी अभ्यास, अन्न परिरक्षण, भेसळ, पाश्चरीकरण, निर्जलीकरण

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर सामान्य विज्ञान पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال