१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
🔥 NEW
📘 दैनिक पाठ टाचण
इयत्ता १ ली ते ८ वी
नवीन अभ्यासक्रमानुसार • अध्ययन निष्पत्तीनुसार
🚀 टाचण तयार करा
💬 शिक्षक Group Join करा

इयत्ता पाचवी मराठी पाठ 16: स्वच्छतेचा प्रकाश चे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: स्वच्छतेचा प्रकाश स्वाध्याय

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: स्वच्छतेचा प्रकाश स्वाध्याय

प्रश्न १: थोडक्यात उत्तरे लिहा

अ) सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले?
‘जगामध्ये कोणतेही काम हे हलक्या दर्जाचे नसते. आपल्या देशाची स्वच्छता करणे ही देखील एक देशसेवाच आहे.’ असे सेनापती बापट यांचे मत होते.
आ) ‘भारत माझा देश आहे’ या वाक्यात ‘माझा’ हा शब्द का वापरला आहे?
जेव्हा एखादी वस्तू आपण माझी असे म्हणतो तेव्हा आपण त्या वस्तूची खूप काळजी घेतो, पण जेव्हा तीच वस्तू आपली म्हटल्यावर आपण त्या वस्तूची तितकीशी चांगली काळजी घेत नाही.
इ) तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला?
गावातील गावकरी सफाईच्या कामाला हलके काम समजत होते. सेनापती बापट यांनी सफाईच्या कामाची सुरुवात स्वतःपासून केली आणि हे काम आयुष्यभर चालवले.
ई) थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात?
थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात. त्याप्रमाणे स्वतः कृती करतात.

प्रश्न २: थोडक्यात उत्तरे लिहा

अ) तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता?
महात्मा गांधी जयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, शिक्षक दिन, शाळेचा पहिला दिवस तसेच शाळेत साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वच्छता मोहीम राबवली जाते.
आ) जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता, तेव्हा कशाकशाची सफाई करता? का?
शाळेत स्वच्छता मोहीम राबवली जाते तेव्हा, शाळेतील वर्गखोल्यांची, शाळेतील व्हरांड्याची, क्रीडांगणाची, बागेची, प्रयोगशाळेची सफाई केली जाते. सफाई केल्याने सर्व परिसर प्रसन्न होतो.
इ) तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही. तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून द्याल?
ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी आरोग्य आणि सुख समृद्धी असते. जर स्वच्छता ठेवली नाही तर त्या ठिकाणी रोगराईचा प्रसार होऊन आरोग्याला धोका निर्माण होतो.
ई) आपल्या देशातील तुम्हाला ‘स्वतःच्या’ वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा.
आपल्या देशातील मला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टी: माझे गाव, माझा तालुका, माझा जिल्हा, माझे राज्य, माझा देश, माझी रेल्वे, बसेस, नद्या, डोंगर, किल्ले, पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे इ.

स्वच्छतेचा प्रकाश स्वाध्याय - pahavi marathi

इयत्ता पाचवी मराठी पाठ: स्वच्छतेचा प्रकाश यामध्ये स्वच्छतेचे महत्त्व आणि सेनापती बापट यांचे देशसेवेचे योगदान सांगितले आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, स्वच्छता मोहिमेचे उपक्रम, आणि सामाजिक जागरूकता यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि स्वच्छतेचे महत्त्व शिकण्याची संधी येथे उपलब्ध आहे. हा पाठ स्वच्छतेची जबाबदारी शिकवतो.

कीवर्ड्स: स्वच्छतेचा प्रकाश, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, स्वच्छता, सेनापती बापट, देशसेवा

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال