इयत्ता पाचवी मराठी - पाठ: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वाध्याय
प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली?
'यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही' अशी शपथ शिकारीला गेलेल्या राजाने घेतली.
आ) तुकडोजीमहाराज कोणकोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत?
तुकडोजीमहाराज हिंदी, उर्दू आणि मराठी या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत.
इ) तुकडोजीमहाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
तुकडोजी महाराज यांनी ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ लिहिला.
प्रश्न २: का ते सांगा
अ) राजाने शिकार करण्याचे का सोडले?
प्राण्यांची शिकार करणाऱ्या राजाला तुकडोजी महाराजांनी त्याची चूक लक्षात आणून दिली. राजाला स्वतःची चूक कळून आली. आणि त्याने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली आणि शिकार करण्याचे सोडले.
आ) चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजीमहाराजांना 'देवबाबा' का म्हणत?
तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू आणि मराठी भाषेतील स्वतःचीच कवणे खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासंतास डोलत असत.म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना 'देवबाबा' म्हणत.
इ) राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजीमहाराजांचा 'राष्ट्रसंत' पदवीने का गौरव केला?
तुकडोजीमहाराजांनी भूदान चळवळीत सहभाग घेऊन जमीन मिळवून दिली, स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले आणि सामाजिक सुधारणांचे कार्य केले, म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना 'राष्ट्रसंत' पदवीने सन्मानित केले.
प्रश्न ३: थोडक्यात उत्तरे लिहा
अ) श्री गुरुदेव सेवामंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले?
श्री गुरुदेव सेवामंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह,चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे. त्याद्वारे
त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण,ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम
राबवले. महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला.
आ) सानेगुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांनी काय केले?
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी तुकडोजीमहाराजांनी अनेक लोकांच्या सह्या गोळा करून त्यांच्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले.
इ) राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले?
जपानमधील 'विश्वशांती परिषद' आणि 'जागतिक धर्मपरिषद' यांच्या उद्घाटनासाठी तुकडोजीमहाराजांना निमंत्रित करण्यात आले. त्यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्त्वांची माहिती देऊन परिषदेचे उद्घाटन केले आणि अठरा देशांच्या जागतिक धर्मसंघटनेचे सल्लागार म्हणून उत्कृष्ट कार्य केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वाध्याय - pahavi marathi
इयत्ता पाचवी मराठी पाठ: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यामध्ये तुकडोजी महाराजांचे सामाजिक कार्य, ग्रामगीता ग्रंथ, आणि राष्ट्रसंत म्हणून योगदान यांचे वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, सामाजिक उपक्रम, आणि त्यांचे कार्य यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि सामाजिक जागरूकता शिकण्याची संधी येथे उपलब्ध आहे. हा पाठ समाजसेवेचे महत्त्व शिकवतो.
कीवर्ड्स: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, सामाजिक कार्य, ग्रामगीता, राष्ट्रसंत
संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: