१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता पाचवी मराठी पाठ 13: सण एक दिन चे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: सण एक दिन स्वाध्याय

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: सण एक दिन स्वाध्याय

प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे?
बैलांच्या कपाळावर बाशिंग बांधले आहे.
आ) अवखळ कोण आहे?
तरुण बैल अवखळ आहे.
इ) बैलांच्या गळ्यात काय आहे?
बैलांच्या गळ्यात घुंगुरांच्या माळा आहेत.
ई) झुलीखाली काय असेल असे कवीला वाटते?
झुलीखाली चाबकांचे वळ असतील असे कवीला वाटते.
उ) वर्षभर बैल काय करतात?
वर्षभर बैल मालकासाठी ओझी वाहतात.

प्रश्न २: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा

अ) या सणाला बैलांना कसे सजवतात?
या सणाला बैलांची शिंगे विविध रंगांनी रंगली जातात. त्यांच्या कपाळावर बाशिंगे बांधली जातात. पाठीवर झुली चढवतात.
आ) बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कसे मिरवत नेतात?
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवले जाते. वाद्य वाजवत लेझीम खेळत बैलांना मिरवत नेतात.
इ) बैलाला वेसण का घातलेली असते?
बैलाने मान झटकू नये. त्याने योग्य मार्गाने जावे.
ई) ‘सण एक दिन’ असे कवी का म्हणतो?
वर्षभर राबणाऱ्या बैलाचे फक्त वर्षातून एक दिवस बैलपोळ्याच्या दिवशी कौतुक केले जाते. बाकी वर्षाचे इतर दिवस चाबकाचे फटके सोसत धान्यासाठी राबराब राबावे लागते.

प्रश्न ३: थोडक्यात उत्तरे लिहा

अ) गणेशोत्सव सणाच्या सजावटीला कोणकोणत्या वस्तू वापरतात?
गणेशोत्सव सणाला सजावटीसाठी विविध रंगांचे दिवे लावले जातात, सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात, गणेश मूर्तीच्या स्थापनेसाठी देवघर सजवले जाते.
आ) दिवाळी सणाच्या सजावटीला कोणकोणत्या वस्तू वापरतात?
विजेच्या दिव्यांची रोषणाई केली जाते, तेलाचे दिवे अंगणात लावले जातात. दिवाळीच्या दिवसांत रांगोळ्या काढल्या जातात, घरासमोर आकाशकंदील लावला जातो.
इ) ख्रिसमस सणाच्या सजावटीला कोणकोणत्या वस्तू वापरतात?
ख्रिसमसच्या झाडावर दिव्यांची रोषणाई केली जाते. चांदणीसारखा चमकदार दिवा लावला जातो.

प्रश्न ४: जोड्या जुळवा

खालील जोड्या जुळवा:
(अ) रंगवलेली शिंगे - शिंगे
(आ) शोभिवंत गोंडे - गोंडे
(इ) दुलदुलणारी वाशिंडे - वशिंडे
(ई) अवखळ खोंडे - खोंडे

प्रश्न ५: थोडक्यात उत्तरे लिहा

बैलपोळ्याच्या सणाचा दिवस संपल्यावर बैलाला काय वाटत असेल, याविषयी कल्पना करून थोडक्यात लिहा.
बैलपोळ्याच्या दिवशी मी खूप खुश असतो कारण त्या दिवशी माझे खूप कौतुक केले जाते. वर्षातून येणारा तो एक दिवस माझा सगळा क्षीण नाहीसा करून टाकतो. परंतु बैलपोळ्याचा दिवस संपल्यावर पुन्हा माझ्या रोजच्या दिनक्रमाला सुरुवात होते.

सण एक दिन स्वाध्याय - pahavi marathi

इयत्ता पाचवी मराठी पाठ: सण एक दिन यामध्ये बैलपोळा सणाचे सांस्कृतिक महत्त्व आणि बैलांचे कष्ट यांचे वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, सणाच्या सजावटी, आणि जोड्या जुळवणे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि सांस्कृतिक शिक्षण येथे उपलब्ध आहे. हा पाठ ग्रामीण जीवन आणि सणांचे महत्त्व शिकवतो.

कीवर्ड्स: सण एक दिन, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, बैलपोळा, सण, सांस्कृतिक, बैल

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال