इयत्ता पाचवी मराठी - पाठ: माळीण गाव: एक घटना स्वाध्याय
प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा
१) वरील बातम्यांची शीर्षके कोणत्या घटनेसंबंधी आहेत?
वरील बातम्यांची शीर्षके ही पुणे जिल्हातील माळीण गावच्या भूस्खलनासंबंधित आहेत.
२) माळीण गावात साधारण किती कुटुंबे राहत होती?
माळीण गावात ४० ते ५० कुटुंबे राहत होती.
३) कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता?
नासा संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता.
४) मदतीची घोषणा कोणी केली? कशा स्वरूपात?
मदतीची घोषणा राज्य सरकारने केली, पैशांच्या स्वरूपात.
५) ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले?
ढिगाऱ्याखालून आठ लोकांना जिवंत काढण्यात आले.
६) ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली?
ढिगाऱ्याखालचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफने प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
७) माळीण गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली?
माळीण गावाबाबतची दुर्घटना पावसाळा ऋतूत ३० जुलै २०१४ या दिवशी घडली.
८) शोधकार्यात कोणकोणत्या गोष्टींमुळे अडथळे आले?
मोबाईल सुविधा आणि वीजपुरवठा नसल्याने शोधकार्यात अडथळे आले.
९) माळीण गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली?
माळीण गावातील लोकांना एन.डी.आर.एफ., डॉक्टरांची पथके, सरकारी यंत्रणा, जागरूक नागरिक या साऱ्यांनी मदत केली.
प्रश्न १०: थोडक्यात उत्तरे लिहा
अ) या घटनेमागे कोणकोणती कारणे असतील, असे तुम्हाला वाटते?
१) नासाच्या इशाऱ्याकडे झालेले दुर्लक्ष, २) पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, ३) सरकारी यंत्रणेची अनास्था, ४) नैसर्गिक संकट.
आ) नासा ही संस्था कोठे आहे, ती काय काम करते, याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा.
नासा ही अमेरिकेतील अवकाश संशोधन केंद्र आहे. ही संस्था भौगोलिक घटनांसंबंधित घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करणारी सर्वात मोठी संस्था आहे.
इ) अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी कोणकोणत्या अडचणी निर्माण होत असतील? विचार करा व लिहा.
अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने, दुर्गम भाग असल्यामुळे इतर यंत्रणेला या घटनांसंबंधित उशिरा माहिती मिळते. दुर्घटनेत दळणवळण सुविधा तसेच संदेशवहन सुविधा बंद पडल्याने दुर्घटनेच्या ठिकाणापर्यंत पोहोचणे आणि मदत करणे कठीण होऊन जाते.
ई) दुर्घटनाग्रस्तांना कोणकोणत्या स्वरूपात मदत करता येईल ते लिहा.
१) दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अन्न, पाणी, तसेच वस्त्र यांचा पुरवठा लोकांना करता येईल. २) घरातील मोठ्या लोकांशी बोलून काही प्रमाणात आर्थिक मदत आपत्तीग्रस्तांना पाठवता येईल.
माळीण गाव: एक घटना स्वाध्याय - pahavi marathi
इयत्ता पाचवी मराठी पाठ: माळीण गाव: एक घटना यामध्ये पुणे जिल्ह्यातील भूस्खलन दुर्घटनेचे वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, आपत्तीमागील कारणे, आणि मदत कार्य यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि सामाजिक जबाबदारी शिकण्याची संधी येथे उपलब्ध आहे. हा पाठ आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व शिकवतो.
कीवर्ड्स: माळीण गाव, एक घटना, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, भूस्खलन, आपत्ती, मदत कार्य, नासा
संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: