१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सहावी सामान्य विज्ञान ११: कार्य आणि ऊर्जा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सहावी सामान्य विज्ञान ११: कार्य आणि ऊर्जा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सहावी सामान्य विज्ञान ११: कार्य आणि ऊर्जा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सहावीच्या सामान्य विज्ञानातील "कार्य आणि ऊर्जा" हा पाठ कार्य, ऊर्जा, ऊर्जेचे प्रकार, आणि ऊर्जा स्रोत यांचाचं वर्णन करतो. या स्वाध्यायात यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, रासायनिक, विद्युत, आणि अणू ऊर्जा यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना ऊर्जेचे रूपांतरण आणि बचत समजण्यास मदत करते.

कार्य आणि ऊर्जा - प्रश्न १: रिकाम्या जागी योग्य शब्द

प्रश्न १: रिकाम्या जागी योग्य शब्द भरा

अ) विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे. त्यासाठी ................. लावले असता ................. घडेल. कारण पाण्याचे ................. होणार आहे.
बल, कार्य, विस्थापन.
आ) घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला ................. प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल, म्हणजेच ................. ऊर्जेचे रूपांतरण ................. ऊर्जेत होईल.
गती, स्थितिज, गतिज.
इ) दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल. ................. ऊर्जेचे रूपांतरण ................. ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण होय.
रासायनिक, प्रकाश.
ई) सौर चूल हे सूर्याच्या ................. ऊर्जेचे उपयोजन आहे, तर सौर विद्युतघट व सौर दिवे हे सूर्याच्या ................. ऊर्जेचे उपयोजन आहे.
उष्णता, प्रकाश.
उ) एका मजुराने चार पाट्या खडी १०० मीटर अंतरावर वाहून नेली. जर त्याने दोन पाट्या खडी २०० मीटर अंतरावर वाहून नेली, तर ................. कार्य घडेल.
समान.
ऊ) पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ................. होय.
ऊर्जा.

कार्य आणि ऊर्जा - प्रश्न २: जोडी लावा

प्रश्न २: खालील गोष्टी आणि त्यांचे ऊर्जा प्रकार यांची जोडी लावा

अ) घरंगळणारा पदार्थ.
गतिज ऊर्जा.
आ) अन्न.
रासायनिक ऊर्जा.
इ) ताणलेले धनुष्य.
स्थितिज ऊर्जा.
ई) सूर्यप्रकाश.
उष्णता ऊर्जा.
उ) युरेनिअम.
अणू ऊर्जा.

कार्य आणि ऊर्जा - प्रश्न ३: उत्तरे लिहा

प्रश्न ३: खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

अ) विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल?
विस्थापन झाले असे तेव्हा म्हणता येईल जेव्हा एखादी वस्तू तिची मूळ जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जाते. उदाहरणार्थ, एक पेटी १० मीटर ओढल्यास तिचे विस्थापन होते, कारण ती मूळ स्थानापासून हलते.
आ) कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल?
कार्य मोजण्यासाठी दोन गोष्टींचा विचार करावा लागतो: १) वस्तूवर लावलेले बल आणि २) त्या बलामुळे झालेले विस्थापन. कार्य = बल × विस्थापन. उदाहरणार्थ, जास्त बल किंवा जास्त विस्थापन असल्यास कार्य अधिक होते.
इ) ऊर्जेची विविध रूपे कोणती?
ऊर्जेची विविध रूपे: १) यांत्रिक ऊर्जा (स्थितिज आणि गतिज), २) उष्णता ऊर्जा, ३) प्रकाश ऊर्जा, ४) ध्वनी ऊर्जा, ५) रासायनिक ऊर्जा, ६) विद्युत ऊर्जा, ७) अणू ऊर्जा.
ई) निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा.
सूर्याच्या उष्णता ऊर्जेमुळे समुद्राचे पाणी वाफ बनते. वाफेचे ढग होतात, ज्यापासून पाऊस पडतो. हे पाणी धरणात साठते, ज्यामुळे स्थितिज ऊर्जा निर्माण होते. धरणाचे पाणी खाली येताना गतिज ऊर्जेत रूपांतरित होते, जे जनित्राच्या पात्यांना फिरवते आणि विद्युत ऊर्जा निर्माण करते. ही विद्युत ऊर्जा पंख्यामुळे गतिज ऊर्जेत, बल्बमुळे प्रकाश ऊर्जेत, किंवा ओव्हनमुळे उष्णता ऊर्जेत रूपांतरित होते.
उ) ऊर्जा बचत का करावी?
ऊर्जा बचत गरजेची आहे कारण: १) पारंपरिक ऊर्जा स्रोत मर्यादित आहेत. २) पर्यावरणाचे रक्षण होते. ३) जागतिक तापमानवाढ कमी होते. ४) विजेची बचत पैशांची बचत करते.
ऊ) हरित ऊर्जा कशाला म्हणतात?
हरित ऊर्जा म्हणजे कार्बन किंवा प्रदूषक न निर्माण करणारे ऊर्जा स्रोत, जसे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, आणि जलविद्युत ऊर्जा.
ए) अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात?
अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे नवीकरणीय आणि अक्षय स्रोत, जसे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्याल ऊर्जा, सागरी ऊर्जा, आणि अणू ऊर्जा.
ऐ) सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो?
सौर ऊर्जा उपकरणांमध्ये उष्णता आणि प्रकाश ऊर्जेचा वापर. सौर चूल उष्णता ऊर्जा वापरते, तर सौर विद्युतघट आणि सौर दिवे प्रकाश ऊर्जा वापरतात.
ओ) अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे?
कारण: १) पारंपरिक स्रोत संपण्याचा धोका. २) अपारंपरिक स्रोत नवीकरणीय आणि पर्यावरणपूरक. ३) प्रदूषण कमी होते. ४) ऊर्जा स्वावलंबन वाढते.

कार्य आणि ऊर्जा - प्रश्न ४: वेगळे कोण?

प्रश्न ४: खालील गटांमधील वेगळे कोण?

अ) डीझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, बाहता पारा.
बाहता पारा.
आ) धावणारी मोटार, ओंडका वाहून नेणे, टेबलावर ठेवलेले पुस्तक, दप्तर उचलणे.
टेबलावर ठेवलेले पुस्तक.
इ) सूर्यप्रकाश, बारा, लाटा, पेट्रोल.
पेट्रोल.
ई) बंद खोलीत पंखा चालू ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे, थंडीत ए.सी. चालू करणे, घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे.
घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे.

कार्य आणि ऊर्जा - प्रश्न ५: ऊर्जेचे प्रकार

प्रश्न ५: खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधा

कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधा.
उष्णता, ध्वनी, प्रकाश, रासायनिक, विद्युत.

कार्य आणि ऊर्जा - FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सहावी सामान्य विज्ञान ११: कार्य आणि ऊर्जा स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सहावीच्या सामान्य विज्ञानातील "कार्य आणि ऊर्जा" हा पाठ कार्य, ऊर्जा, ऊर्जेचे प्रकार, आणि ऊर्जा स्रोत यांचे वर्णन करतो. या स्वाध्यायात यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, रासायनिक, विद्युत, आणि अणू ऊर्जा यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि ऊर्जा जागरूकता वाढवण्याची संधी येथे उपलब्ध आहे.

कीवर्ड्स: इयत्ता सहावी सामान्य विज्ञान, कार्य आणि ऊर्जा, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 6वी स्वाध्याय, मराठी अभ्यास, यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, सौर ऊर्जा, हरित ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा स्रोत

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सहावीच्या इतर सामान्य विज्ञान पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال