इयत्ता सातवी मराठी पाठ: अनाम वीरा स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील पाठ "अनाम वीरा" ही कविता अज्ञात सैनिकांच्या देशासाठी बलिदान आणि त्यांच्या अनाम राहण्याच्या भावनांवर आधारित आहे। या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, आकृती पूर्ण करणे, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लावण्यास आणि भाषिक कौशल्य वाढवण्यास मदत करते।
अनाम वीरा - प्रश्न १: कारण लिहा
प्रश्न १: कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते?
देशाचे रक्षण करण्यासाठी प्राण देणारे सैनिक लोकांना अपरिचित असतात, लोकांना प्रत्येकाची नावेसुद्धा माहिती नसतात. म्हणून कवी म्हणतात देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी, जिथे प्राण सोडले, तिथे त्यांचे कुणी स्मारक उभारले नाही की स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही।
सैनिकांचे जीवन असे असते की, लढाई सुरु झाल्यावर त्याला त्याच्या घरातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कर्तव्यास हजर रहावेच लागते। शिवाय पुन्हा परत घरी कधी परतणार याचीही शाश्वती नसते, म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जाळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस, असे कवींनी म्हटले आहे।
कवी म्हणतात की, या सैनिकाला प्रसिद्धीची गरज नसतेच। देशासाठी लढणे व लढता लढता वीरमरण पत्करणे हेच सैनिकाचे व्रत आहे म्हणून तुझे हे बलिदान सफलच आहे, असे कवींनी म्हटले आहे।
अनाम वीरा - प्रश्न २: आकृती पूर्ण करा
प्रश्न २: खालील आकृती पूर्ण करा
· अनाम वीराचे कुणी स्मारक उभारले नाही।
· त्याच्या स्मरणार्थ कुणी दिवा लावला नाही।
· जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही।
· रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही।
· कुणा शाहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायिली नाही।
अनाम वीरा - प्रश्न ३: जोड्या जुळवा
प्रश्न ३: खालील जोड्या जुळवा
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| धगधगतां समराच्या ज्वाला | महाभयंकर युद्ध |
| मरणामध्येविलीन | शांतपणे मरण स्वीकारणे |
| ना भय ना आशा | निर्भयपणे, मनात कोणतीही आसक्ती न ठेवता |
| नच उधाणले भाव | भावना व्यक्त न करणे |
अनाम वीरा - प्रश्न ४: शब्दांचा अर्थ
प्रश्न ४: खालील शब्दांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा
| शब्द | अर्थ |
|---|---|
| अनाम वीरा | ज्या वीराच्या कर्तबगारीची कोणीही दाखल घेतली नाही। अज्ञात वीर। |
| जीवनान्त | जीवनाचा शेवट, म्हणजेच मृत्यू। |
| संध्येच्या रेषा | संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो। तशी क्षितीजरेषा धूसर होत जाते, त्यास संध्येच्या रेषा म्हणतात। |
| मृत्युंजय वीर | मृत्यूवर विजय मिळवलेला वीर। |
लिहिते होऊया
लिहिते होऊया
बालपणापासूनच मला वाचनाची व लेखनाची आवड आहे। डॉक्टर फक्त रुग्णाचे शरीर निरोगी ठेवतो। पण लेखन समाजचे मन निरोगी ठेवते। शिवाय आपला संसारही सांभाळता येतो आणि लेखनही करता येते। असे असूनही लेखकच अजरामर होतात। त्यांच्या मृत्युनंतर कितीही वर्षे लोटली तरी पुढच्या पिढी स्मरणात ठेवतात। उदा. पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज या पुस्तकातील पाठांचे लेखक आजही आम्ही अभ्यासत आहोत। मी लेखक होणार! हे कुटुंबातील सदस्यांना सांगितले तर त्यांना खूप आनंद झाला। लेखक होण्यासाठी मी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखकाचे साहित्य वाचून काढणार आहे। त्यांच्या विविध अनुभवांचा अभ्यास करून त्यांची शैलीही आत्मसात करणार आहे। मी लेखक झाल्यावर संपूर्ण जगभर प्रवास करीन। देववादी व दैववादी रूढींवर प्रखर हल्ले चढवून समाजातील अंधश्रद्धा दूर करीन। हे करताना कितीही संकटे कोसळली तरी डगमगणार नाही, प्रलोभनाला बळी पडणार नाही, लाचारी पत्करणार नाही। मला लेखक म्हणून एक पारितोषिक मिळावे हे माझे स्वप्न आहे।
म्हणी ओळखूया
म्हणी ओळखूया
१) गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांचा राबता होता। जसे ते सेवानिवृत्त झाले, तसा माणसांचा वावर कमी झाला आहे, म्हणतात ना ....... - असतील शिते तर जमतील भुते।
२) रेहानाची कंपासपेटी हरवली, तिने ती घरभर शोधली। शेजारीपाजारीही जाऊन पाहिले; पण कंपासपेटी कोठेच नव्हती। शेवटी ती रेहानाच्याच दप्तरातच सापडली, म्हणतात ना ....... - काखेत कळसा आणि गावाला वळसा।
३) पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला, की घर बांधायचे। पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला। पुन्हा पावसाळा आला। पावसात भिजताना त्याला आठवले, की आपण घर बांधायचे ठरवले होते, म्हणतात ना ....... - शेकली तेव्हा टेकली।
४) फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते। त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले। गावातले सगळे म्हणू लागले, ....... - बाळाचे पाय पाळण्यात दिसतात।
विरामचिन्हांचा वापर
खालील उतारा वाचा। विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा।
मुलांनो, शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात। तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत। कोण बरे आहेत हे मित्र? असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल। आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्गहाच आपला खरा मित्र आहे!
FAQ आणि शेअरिंग
FAQ आणि शेअरिंग
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा। स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल। खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!
इयत्ता सातवी मराठी पाठ: अनाम वीरा स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवी मराठी विषयाचा पाठ: अनाम वीरा यामध्ये अज्ञात सैनिकांचे देशासाठी बलिदान आणि त्यांच्या अनाम राहण्याचे वर्णन आहे। या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, आकृती पूर्ण करणे, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे। विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे। Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा।
कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, अनाम वीरा, पाठ तेरावा स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, अनाम वीरा प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF, सैनिक, बलिदान
संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: