१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा 11:राष्ट्ररक्षक मराठे स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा अकरा: राष्ट्ररक्षक मराठे स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा अकरा: राष्ट्ररक्षक मराठे स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा अकरा "राष्ट्ररक्षक मराठे" हा पाठ मराठ्यांचा उत्तर भारतातील विस्तार, पानिपतची तिसरी लढाई, आणि त्याचे परिणाम यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि ऐतिहासिक घटनांचा कालानुक्रम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यास मदत करते.

राष्ट्ररक्षक मराठे - प्रश्न १: कोण बरे?

प्रश्न १: कोण बरे?

१) अफगाणिस्तानातून आलेले
उत्तर: पठाण
२) हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले
उत्तर: रोहिले
३) नानासाहेब पेशव्यांचा भाऊ
उत्तर: रघुनाथराव
४) मथुरेच्या जाटांचा प्रमुख
उत्तर: सुरजमल
५) पैठणजवळ राक्षसभुवन येथे निजामाला पराभूत करणारे
उत्तर: माधवराव

राष्ट्ररक्षक मराठे - प्रश्न २: थोडक्यात लिहा

प्रश्न २: थोडक्यात लिहा

१) अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला
१) मराठ्यांचे उत्तरेत असलेले वर्चस्व रोहिल्यांचा सरदार नजीबखान याला सहन होत नव्हते. म्हणून त्याच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानच्या अब्दालीने पाचव्या वेळी दिल्ली जिंकली.
२) रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले व त्यांनी दिल्ली जिंकली.
३) अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पुन्हा पंजाब जिंकून घेतला.
४) त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत इ.स. १७५८ मध्ये अटकेपर्यंत पोहोचले. अशा रीतीने मराठ्यांनी अटकेवर आपला ध्वज फडकवला.
२) अफगाणांशी संघर्ष
१) अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. इ.स. १७५१ मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले.
२) मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती. म्हणून आपल्या संरक्षणासाठी त्यांनी मराठ्यांशी करार केला.
३) या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे-होळकरांना फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या. ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला.
४) पुढे रघुनाथराव अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी उत्तरेत गेला. मराठ्यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून दिल्ली व पंजाब जिंकून अटकेपर्यंत धडक मारली.
५) पुढे अब्दाली व सदाशिवरावभाऊ यांची पानिपतावर गाठ पडली. ही पानिपतची तिसरी लढाई होती. या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला.
३) पानिपतच्या लढाईचे परिणाम
इ.स. १७६१ साली झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या लढाईचे परिणाम पुढीलप्रमाणे झाले:
१) महाराष्ट्रातील एक तरुण पिढी मारली गेली.
२) मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री नष्ट झाल्याने मराठ्यांचे खूप मोठे नुकसान झाले.
३) मराठ्यांचे उत्तरेतील प्रभुत्व कमी झाले.
४) अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला.
५) मराठ्यांचा प्रभाव कमी झाल्याने निजाम, हैदरआली या जुन्या शत्रूंनी मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण करणे सुरू केले.

राष्ट्ररक्षक मराठे - प्रश्न ३: घटनाक्रम लावा

प्रश्न ३: घटनाक्रम लावा

१) राक्षसभुवनची लढाई
२) टिपू सुलतानचा मृत्यू
३) माधवराव पेशव्यांचा मृत्यू
४) पानिपतची लढाई
५) बुराडी घाटची लढाई
१) बुराडी घाटची लढाई (१७५१)
२) पानिपतची लढाई (१७६१)
३) राक्षसभुवनची लढाई (१७६३)
४) माधवराव पेशव्यांचा मृत्यू (१७७२)
५) टिपू सुलतानचा मृत्यू (१७९९)

राष्ट्ररक्षक मराठे - प्रश्न ४: व्यक्तींची नावे शोधा

प्रश्न ४: पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा

१) जानकोजी
२) महादजी
३) जयप्पा
४) बाळाजी विश्वनाथ
५) माधवराव
६) नानासाहेब
७) सदाशिवराव भाऊ
८) मल्हारराव

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा अकरा: राष्ट्ररक्षक मराठे स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा अकरा: राष्ट्ररक्षक मराठे यामध्ये मराठ्यांचा उत्तर भारतातील विस्तार, पानिपतची तिसरी लढाई, आणि त्याचे परिणाम यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि ऐतिहासिक घटनांचा कालानुक्रम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इतिहास अभ्यास साहित्य आणि इतिहासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी इतिहास स्वाध्याय, राष्ट्ररक्षक मराठे, धडा अकरा स्वाध्याय, 7वी इतिहास स्वाध्याय, इतिहास अभ्यास, राष्ट्ररक्षक मराठे प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Swadhay, Iyatta Satavi Itihas guide, स्वाध्याय PDF, Maratha history, Panipat battle, Peshwas

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال