१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26)

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा २: वनस्पती - रचना व कार्य स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा २: वनस्पती - रचना व कार्य स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा २: वनस्पती - रचना व कार्य स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या सामान्य विज्ञानातील "वनस्पती: रचना व कार्य" हा धडा वनस्पतींची रचना, कार्य, आणि प्रकार यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, वनस्पतींचे अवयव, आणि त्यांची कार्ये यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना वनस्पतींची संरचना समजण्यास मदत करते.

प्रश्न १: वनस्पतींची तीन उदाहरणे

अ. काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या
एरंड, धोतरा, फणस
आ. खोडावर काटे असणाऱ्या
गुलाब, निवडुंग, करवंद
इ. लाल फुले असणाऱ्या
गुलाब, जास्वंद, पांगारा
ई. पिवळी फुले असणाऱ्या
भेंड, गुलाब, सोनचाफा
उ. रात्री पाने मिटणाऱ्या
आवळा, गुलमोहर, पर्जन्यवृक्ष
ऊ. एकच बी असणारी फळे असणाऱ्या
आंबा, बोर, काजू
ए. फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या
फणस, पेरू, कलिंगड

प्रश्न २: कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण

कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा. त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहून आकृती काढा.
जास्वंदीचे फूल
फुलाचे निरीक्षण: फुलाला लांब किंवा आखूड देठ (Pedicel) असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते, तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार (Receptacle) असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात.
निदलपुंज (Calyx): कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.
दलपुंज (Corolla): दलपुंज पाकळ्यांनी (Petals) बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर या फुलांच्या दलपुंजांचे आकार, गंध व रंग हे विविध प्रकारचे असतात.
पुमंग (Androecium): फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा (Stamen) बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात.
जायांग (Gynoecium): फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय असते.
[आकृती: विद्यार्थ्यांनी स्वतः काढावी.]

प्रश्न ३: काय सारखे? काय वेगळे?

अ. ज्वारी आणि मूग
साम्य: ज्वारी व मूग या सपुष्प वनस्पती आहेत. दोन्हीही खाण्यायोग्य असतात.
भेद: ज्वारीच्या खोडाला फांद्या नसतात, मूगाच्या खोडाला फांद्या असतात. ज्वारीला एकदल बी असते, मूगाला द्विदल बी असते. ज्वारीची पाने समांतर शिराविन्यास दर्शवतात, मूगाची पाने जाळीदार शिराविन्यास दर्शवतात.
आ. कांदा आणि कोथिंबीर
साम्य: कांदा व कोथिंबीर या सपुष्प वनस्पती आहेत (फुले येणाऱ्या).
भेद: कांद्याच्या खोडाला फांद्या नसतात, कोथिंबीरीच्या खोडाला फांद्या असतात. कांद्याचे बी हे एकदल असते तर कोथिंबीरीचे बी हे द्विदल असते. कांद्याची पाने समांतर शिराविन्यास दर्शवितात तर कोथिंबीरिची पाने जाळीदार शिराविन्यास दर्शवितात.
इ. केळीचे पान व आंब्याचे पान
साम्य: केळ व आंबा या दोन्ही पानांना मध्यशीर असते. दोन्ही पानांना देठ असतो.
भेद: केळीचे पान समांतर शिराविन्यास दर्शवते. आंब्याचे पान जाळीदार शिराविन्यास दर्शवते.
ई. नारळाचे झाड व ज्वारीचे ताट
साम्य: नारळ व ज्वारी दोन्हींची बी ही एकदल प्रकारातील असते. नारळ व ज्वारी यांची मुळे तंतुमय असतात.
भेद: नारळ हे झाड आहे तर, ज्वारी हे झुडूप आहे. नारळाचे खोड हे काष्ठमय असते, ज्वारीला मऊ देठ असतात.

प्रश्न ४: चित्रांविषयीचे स्पष्टीकरण

खालील चित्रांविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.
१) ‘अ’ हे चित्र मक्याच्या बीचे आहे. ही एकदल या प्रकारातली बी आहे.
२) ‘आ’ हे चित्र घेवड्याच्या बीचे आहे. ही द्विदल प्रकारातील बी आहे.
३) दोन्ही चित्रांमध्ये अखंड बी आणि त्याचा उभा छेद दाखवला आहे.
४) ‘अ’ या चित्रातील बीमध्ये आदिमुळ आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थाच्या बाजूला आवरणात असतात.
५) ‘आ’ चित्रातील बीमध्ये आदिमुळ आणि अंकुर हे दलाच्या वरच्या भागात दिसत आहेत.

प्रश्न ५: वनस्पतींच्या अवयवांची कार्ये

वनस्पतींच्या अवयवांची कार्ये स्पष्ट करा.
खोड, पाने, फुले, फळे, मूळ हे वनस्पतींचे विविध अवयव आहेत.
१) मूळ: वनस्पतीला मातीत घट्ट रोवून आधार देणे. जमिनीतून पाणी, खनिजे आणि क्षार शोषून घेणे आणि वनस्पतीला पुरवणे. काही मुळे रूपांतरीत होतात व श्वसन, अन्न साठवण यांसारखी विविध कार्ये करतात.
२) खोड: मुळांनी जमिनीतून शोषून घेतलेली अन्नद्रव्ये झाडाच्या इतर भागापर्यंत पोहचवणे. पानांनी तयार केलेले अन्न इतर अवयवांपर्यंत पोहचवणे. रूपांतरीत खोडे प्रजनन, अन्नसंचयन आणि वनस्पतीला आधार देण्याचे कार्य करतात.
३) पाने: पाने प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे अन्ननिर्मिती करतात.
४) फुले: प्रजनन किंवा पुनरुत्पादन करण्याचे कार्य फुले करतात.
५) फळे: फळे अन्नसंचय करतात. फळ परिपक्व झाल्यावर बिया फळातून बाहेर येतात आणि नवीन वनस्पती उगवण्यास मदत होते.

प्रश्न ६: पानांचे गुणधर्म

गुळगुळीत पृष्ठभाग
केळ: केळीच्या पानांचा पृष्ठभाग हा गुळगुळीत असतो. केळ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव मुसा पेंराडिसीएका असे आहे. ही वनस्पती मुसासीड (कर्दळी) या कुळातील आहे. केळ हे मऊ खोडाचे झाड, कंदापासून लागण, मांसल मुळे, उष्णदेशीय वनस्पती आहे. केळ ही जगातील सर्वात मोठी मांसल खोड असलेली सपुष्प वनस्पती आहे. केळीच्या झाडाला येणाऱ्या फुलाला केळफूल असे म्हटले जाते.
खडबडीत पृष्ठभाग
पारिजातक: पारिजात हे एक भारतात उगवणारे औषधी झाड आहे. पारिजातकाची फुले ही सुगंधित आणि मनमोहक असतात. पारिजातकाच्या फुलांना खरपत्रक, हरसिंगार, शेफानलिका, नालकुंकुमा अशी अनेक नावे आहेत. या झाडाची फुले रात्री गळत असल्यामुळे या झाडाला ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही नाव आहे. पारिजातकाचे शास्त्रीय नाव ‘निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस’ आहे. पारिजातकाचा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो तसेच इतरत्रही नैसर्गिकरीत्या उगवतो. पारिजातकाच्या फांद्या पाच-सात मीटर उंच, चौकोनी आणि खरखरीत असतात. त्यावर समोरासमोर येणारी तळव्या एवढी मोठी, काळपट हिरवी, दंतूर कडांची पानेही खरखरीत असतात.
मांसल पर्णपत्र
जलपर्णी: जलपर्णीची पाने मांसल असतात. जलपर्णीचे खोड हे फुगीर आणि हिरवे असते. जलपर्णी ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. जलपर्णीची एक वनस्पती एका वर्षात तीन हजारांहून अधिक बियांची निर्मिती करते त्यामुळे तिचा प्रसार झपाट्याने होतो. जलपर्णीची वाढ मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पाण्यावर तिचा थर जमा झाल्याने सूर्यकिरण जलचरांपर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण होतो.
पर्णपत्रावर काटे
केवडा: केवड्याचे झुडूप हे सुमारे ३ मी. इतके उंच वाढते. अनेक जाड आधार मुळांनी केवड्याचे खोड उभे सावरून धरलेले असते. केवड्याच्या फांद्या जाडजूड असतात तर याची पाने टोकाकडे गर्दीने आलेली दिसतात. पाने समुद्रवर्णी, साधी, आणि हिरव्या रंगाची असतात. केवड्याच्या पानांची लांबी ही ९०-१५० सेंमी इतकी असते. केवड्याची पाने ही लांब, खड्गाकृती, टोकदार, एकांतरित, असतात. केवड्याच्या पानांच्या कडा आणि मध्यशिरा काटेरी असतात.

प्रश्न ७: वनस्पतींच्या भागांची नावे

तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा.
१) अंकुर २) कुक्षी ३) मुकुल ४) देठ ५) अंडाशय ६) खोड ७) जायांग ८) पर्णतल ९) पर्णाग्र १०) बीजांड ११) मूळ १२) फूल १३) सोटमूळ १४) मूलरोम १५) एकदल १६) कांडे

FAQ आणि शेअरिंग

हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा २: वनस्पती - रचना व कार्य स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा २ चा स्वाध्याय: वनस्पती - रचना व कार्य यामध्ये वनस्पतींची रचना, कार्य, आणि प्रकार यांचे शैक्षणिक वर्णन आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि वनस्पतींची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी सामान्य विज्ञान, वनस्पती रचना व कार्य, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 7वी स्वाध्याय, मराठी अभ्यास, वनस्पतींची रचना, फुले, मुळे, खोड, पाने

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर सामान्य विज्ञान पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال