१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
🔥 NEW
📘 दैनिक पाठ टाचण
इयत्ता १ ली ते ८ वी
नवीन अभ्यासक्रमानुसार • अध्ययन निष्पत्तीनुसार
🚀 टाचण तयार करा
💬 शिक्षक Group Join करा

इयत्ता पाचवी मराठी पाठ 9: जनाई चे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: जनाई स्वाध्याय

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: जनाई स्वाध्याय

प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) जनाई उसाच्या फडात कोणते काम करत होती?
जनाई उसाच्या फडात दारे मोडण्याचे म्हणजेच उसाला पाणी लावण्याचे काम करत होती.
आ) शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले?
शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला विमान आल्यासारखे वाटले.
इ) जनाई का घाबरून गेली?
वावरात चार वाव साप अंगावर धावून आल्यामुळे जनाई घाबरून गेली.
ई) जनाईला शेतात का जावे लागणार होते?
शेतात काम केल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते; म्हणून जनाईला शेतात जावे लागणार होते.

प्रश्न २: वाक्यात उपयोग करा

अ) रात्रंदिवस घाम गाळणे
पोटाची खळगी भरण्यासाठी तुकोबा रात्रंदिवस शेतात घाम गाळतो.
आ) धाबे दणाणणे
समोर साप पाहून रामरावांचे धाबे दणाणले.
इ) पोटात घाबरा पडणे
उंच कड्यावरून खाली बघताच राजूच्या पोटात घाबरा पडला.
ई) पायाखालची जमीन हादरणे
समोर घडलेला अपघात पाहून रामरावांच्या पायाखालची जमीनच हादरली.

प्रश्न ३: जोड्या जुळवा

पाठात आलेल्या गोष्टींचे लेखकाने विशिष्ट शब्दांत वर्णन केले आहे.
(१) शेंगांचे वावर - हिरवागार शालू
(२) शेंगांना आलेली पिवळी फुले - हिरव्या-पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल
(३) साप - काळ्या ठिपक्यांची चार वाव तुळी
(४) जेवण करून पोट भरले - डर्रकन दोन ढेकर आले
(५) जाड धाट - मनगटासारखी धाट

प्रश्न ४: प्र. ४. तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा.

अ) पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग
कापसाचे मोठ मोठे ढग आकाशात तरंगत आहेत.
आ) पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी
पहिले की वाटत, जणू पाखरांची शाळाच भरली आहे.
इ) फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे
रंगीबेरंगी पोशाख घालून एखाद्या समारंभाला एकत्र जमल्यासारखी दिसत होती.
ई) गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरांत लिहिलेल्या ओळी
पांढरेशुभ्र मोती हारात गुंफून कोणी हार तयार करावा अशी दिसत होती.

प्रश्न ५: थोडक्यात उत्तरे लिहा

तुम्हाला आवडलेल्या पाठातील दोन ओळी लिहा.
‘का बाबा, आमची पाठ घेतलीयस? कशापायी भ्या दावाय लागलाईस? आमच्या रानात वस्तीला ऱ्हाईलाईस, तर आमची राखण करशील का, भ्या दावशील? तूच राखण कराय पायजेस.’

प्रश्न ६: योग्य पर्याय निवडा

अ) जनाईचे अंग भगभगत होते, कारण ___
जनाईचे अंग भगभगत होते, कारण उसाच्या पाल्यानं तिचे अंग कापले होते.
आ) जनाई वावरातून पळत सुटली, कारण ___
जनाई वावरातून पळत सुटली, कारण तिच्या अंगावर साप धावून आला.

जनाई स्वाध्याय - pahavi marathi

इयत्ता पाचवी मराठी पाठ: जनाई यामध्ये शेतातील मेहनत आणि साहसाची कथा आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, वाक्प्रचारांचा उपयोग, आणि निरीक्षणावर आधारित वर्णन यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मेहनतीचे महत्त्व शिकण्याची संधी येथे उपलब्ध आहे. ही कथा शेतकऱ्यांच्या कष्टांचे चित्रण करते.

कीवर्ड्स: जनाई, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, शेत, मेहनत, साहस, वाक्प्रचार

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال