१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता पाचवी मराठी पाठ 8: प्रिय बाई चे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: प्रिय बाई स्वाध्याय

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: प्रिय बाई स्वाध्याय

प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे?
पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला आहे.
आ) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले?
पत्रातील दिलेल्या पत्त्यावरून व पत्राच्या उजव्या कोपऱ्यातील मजकुरावरून पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव ओळखले.
इ) उर्मिला आनंदाने का उडाली?
टीव्हीवरील बातमीत आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्या त्यामुळे ती आनंदाने उडाली.
ई) उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे?
उर्मिला सध्या पाचवीच्या वर्गात शिकत आहे.
उ) उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत?
उर्मिलाने तिसरीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत.
ऊ) उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे-जाणे होते, हे कोणत्या वाक्यावरून कळते?
‘तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आत्ता किती मोठा झालाय?’ या पत्रातील वाक्यावरून उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे-जाणे होते, हे कळते.

प्रश्न २: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा

अ) उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला? का दिला?
उर्मिलाच्या बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला; म्हणून उर्मिला अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती. पण मोबाईल ‘कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर’ ची टेप वाजत होती. तेव्हा आजोबांनी उर्मिलाला सांगितले की फोनचे काही खरे नाही.
आ) पाचवीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टींत बदल झाला?
पाचवीत आल्यापासून उर्मिला एकटी शाळेत जाऊ लागली, अभ्यास खूप करू लागली, खेळते सुद्धा जास्त, ती दररोज संध्याकाळी जवळजवळ दोन तास मैदानावर खेळते. आपण मोठे झाले आहोत असे तिला वाटू लागले आहे.
इ) उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे?
उर्मिलाने पत्रात, बाईंनी शिकवलेल्या कविता, स्नेहसंमेलनामध्ये बसवलेले नाटक, सहलीच्या वेळी बाईंनी घेतलेले भन्नाट खेळ, बाईंच्या घराबाहेर असलेले गुलमोहराचे झाड. पाचवीत आल्यापासून उर्मिलामध्ये झालेले बदल इत्यादी गोष्टींचा उल्लेख केला आहे.

प्रश्न ३: थोडक्यात उत्तरे लिहा

अ) तुम्ही टीव्हीवरचे कोणकोणते कार्यक्रम बघता?
मी टीव्हीवरचे बातम्यांचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, तसेच प्रेरणादायक कार्यक्रम बघतो.
आ) टीव्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हांला बघायला आवडतात? का आवडतात?
मी टीव्हीवरचे बातम्यांचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, तसेच प्रेरणादायक कार्यक्रम बघतो. कारण मला त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजन तर होतेच पण त्यातून काही नवीन शिकायला मिळते.

प्रिय बाई स्वाध्याय - pahavi marathi

इयत्ता पाचवी मराठी पाठ: प्रिय बाई यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील भावनिक नात्याचे चित्रण आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, पत्रलेखन, आणि टीव्हीवरील कार्यक्रमांबद्दल प्रश्न यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि शिक्षकांबद्दल आदर शिकण्याची संधी येथे उपलब्ध आहे. हे पत्र शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व शिकवते.

कीवर्ड्स: प्रिय बाई, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, शिक्षक, पत्रलेखन, भावनिक नाते

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال