१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता पाचवी परिसर अभ्यासएक ५: कुटुंबातील मुल्ये स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास १: कुटुंबातील मुल्ये स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास १: कुटुंबातील मुल्ये स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग १ मधील "कुटुंबातील मुल्ये" हा पाठ कुटुंब आणि समाजातील मूल्ये जसे प्रामाणिकपणा, सहिष्णुता, आणि स्त्री-पुरुष समानता यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे आणि निर्णयप्रक्रियेत सहभाग यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्यांची जाणीव वाढवण्यास मदत करते.

कुटुंबातील मुल्ये - प्रश्न १: रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

प्रश्न १: रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

अ) प्रामाणिकपणा ही आपली ............... असते.
ताकद
आ) सामाजिक जीवनात सर्वांना ............... गरज असते.
सहकार्याची
इ) आपल्या देशात ............... वृत्तीला विशेष महत्त्व आहे.
सहिष्णू
ई) समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना ............... करता येते.
प्रगती

कुटुंबातील मुल्ये - प्रश्न २: पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा

प्रश्न २: पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात?
परिसरातील बदलांविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घायचे असतात.
आ) सहिष्णुता म्हणजे काय?
आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय.
इ) स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय?
मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता त्या दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री-पुरुष समानता होय.
ई) स्त्री-पुरुषांच्या समान गरजा कोणत्या?
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या स्त्री-पुरुषांच्या समान गरजा आहेत.

कुटुंबातील मुल्ये - प्रश्न ३: पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा

प्रश्न ३: पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा

अ) कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो?
कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. विचार आणि मतेही भिन्न असू शकतात. आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो. असे असले, तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरवत असताना एकमेकांना विचारतो. परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो.
आ) सहिष्णूतेची भावना कशी निर्माण होते?
आपले मत सर्वोत्तम न मानता इतरांच्या मतांचा देखील आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पायरी असल्याने ती आपल्याला इतरांचा देखील विचार करायला भाग पाडते. यातूनच सहिष्णूतेची भावना निर्माण होते.

कुटुंबातील मुल्ये - FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास १: कुटुंबातील मुल्ये स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग १ चा पाठ: कुटुंबातील मुल्ये यामध्ये प्रामाणिकपणा, सहिष्णुता, आणि स्त्री-पुरुष समानता यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, निर्णयप्रक्रिया, आणि सामाजिक मूल्ये यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि सामाजिक जागरूकता वाढवण्याची संधी येथे उपलब्ध आहे. हा पाठ कुटुंब आणि समाजातील मूल्यांची प्रेरणा देतो.

कीवर्ड्स: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास, कुटुंबातील मुल्ये, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 5वी स्वाध्याय, मराठी अभ्यास, कुटुंबातील मुल्ये प्रश्न आणि उत्तरे, प्रामाणिकपणा, सहिष्णुता, स्त्री-पुरुष समानता

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर परिसर अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

FAQ: कुटुंबातील मुल्ये स्वाध्याय प्रश्नोत्तरे

१. कुटुंबातील मुल्ये स्वाध्याय कोणत्या विषयाचा आहे?

हा स्वाध्याय इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग १ या विषयाचा आहे, ज्यामध्ये कुटुंब आणि समाजातील मूल्यांचे वर्णन आहे.

२. सहिष्णुता म्हणजे काय?

आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय.

३. स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय?

मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता त्या दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री-पुरुष समानता होय.

४. कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत सहभाग कसा घ्यावा?

कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी एकमेकांच्या मतांचा आदर करून, परस्परांशी चर्चा करून सर्वांना पटेल असे निर्णय घ्यावेत.

Previous Post Next Post

نموذج الاتصال