१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता सहावी मराठी - पाठ: पण थोडा उशीर झाला... स्वाध्याय | प्रश्नउत्तरे

इयत्ता सहावी मराठी - पाठ: पण थोडा उशीर झाला...

इयत्ता सहावी मराठी - पाठ: पण थोडा उशीर झाला... स्वाध्याय

प्रश्न १: दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा

१.१) लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते?
अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे, हे सैनिकाच्या आयुष्यातील अवघड काम असते. अतिशय थंड हवामानात व सतत धगधगनारी तणावपूर्ण सीमा या प्रतिकूल स्थितीत ही सेवा करायची असते म्हणून हे काम अवघड वाटते.
१.२) पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड का उडत असे?
बटालियनमध्ये आठ पंधरा दिवसांतून एकदा पोस्टमन येत असे आणि सैनिकांना गावाकडून आलेलं पत्र आठवणींना उजाळा देत असे, पुन्हा जोशात कामावर उभे राहण्यासाठी बळ देत असे. म्हणून पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड उडत असे.
१.३) गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली?
गावाकडून सुखदेवने सांगितलेला आईच्या आजारपणाचा सांगावा ऐकून लेखकाचे मन ढसाढसा रडत होते, डोळ्यांत अश्रू ओघळत होते, आणि जीव घाबराघुबरा होऊन मन सैरभैर झाले.

प्रश्न २: का ते लिहा

२.१) कारगीलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो.
उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरवाईने नटून जातात, जणू वसुंधरेने हिरवागार शालू परिधान केला आहे, म्हणून कारगीलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो.
२.२) लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे.
पत्नीच्या पत्रात काहीच मजकूर नव्हता, फक्त आसवांच्या सुकलेल्या डागांमधून आईची खालावलेली तब्येत कळली, म्हणून लेखकाने त्या मजकुराविना खूप काही बोलणाऱ्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे.
२.३) गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते.
आईच्या आजारपणाची बातमी कळताच लेखक गावाला निघाला, पण आठ-दहा दिवसांच्या प्रवासात आईला कधी एकदा पाहीन अशी त्याची अस्वस्थता होती, म्हणून रस्ता कटता कटत नव्हता असे त्याला वाटले.
२.४) पण थोडा उशीर झाला... असे लेखकाने म्हटले आहे.
लेखक आजारी आईला भेटण्यासाठी गावात पोहोचला, पण तिने त्याला न भेटताच जगाचा निरोप घेतला होता, म्हणून पण थोडा उशीर झाला... असे लेखकाने म्हटले आहे.

प्रश्न ३: पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होतो ते माहीत करून घ्या

पोस्टातील पत्राचा प्रवास प्रथम पत्र पाठवणाऱ्याने टपाल पेटीत टाकण्यापासून सुरू होतो. टपाल पेटीतून पत्र स्थानिक टपाल कार्यालयात गोळा केले जाते, जिथे ते गंतव्यस्थानानुसार वर्गीकृत केले जाते. नंतर पत्र ट्रक, रेल्वे किंवा विमानाद्वारे संबंधित शहर किंवा गावाच्या मुख्य टपाल कार्यालयात पाठवले जाते. तिथून ते स्थानिक टपाल कार्यालयात आणि शेवटी पोस्टमनद्वारे गंतव्य पत्त्यावर पोहोचवले जाते. कारगीलसारख्या दुर्गम ठिकाणी, पत्रे सैन्याच्या विशेष व्यवस्थेद्वारे बटालियनपर्यंत पोहोचतात, ज्यासाठी काहीवेळा आठवड्यांचा कालावधी लागतो.

प्रश्न ४: वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हांला आवडलेली वाक्ये पाठातून शोधून लिहा

वसुंधरा: उन्हाळ्यात फडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्याकंचा रंगाने नटून जातात; जणू वसुंधरेने हिरवागार शालू परिधान केला आहे.
सैनिकाचे मन: रमणीय निसर्ग आमचे मन उल्हासित करायचा. आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकांचं मन चंद्रमाण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं, ते समजायचं नाही. गावाकडच्या आठवणीना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो.

प्रश्न ५: तुम्हांला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी प्रश्न तयार करा

१) तुम्हाला सैनिक व्हावे असे का वाटले?
२) सैनिक होण्यासाठी तुम्ही कोणती मेहनत घेतली?
३) घरातील माणसांच्या प्रतिक्रिया काय होत्या?
४) तुमच्या कामगिरीचा एखादा रोमहर्षक क्षण सांगा?
५) तुम्ही नव्या युवा पिढीला कोणता संदेश द्याल?

प्रश्न ६: सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसे तुम्हांला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते?

१) देशाचा सुजाण नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडणे.
२) राष्ट्रीय एकात्मता टिकवणे.
३) राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे.

प्रश्न ७: कारगील या ठिकाणचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा

कारगील:
- दुर्गम प्रदेश
- अतिशय खडतर हवामान
- अतिशय थंड हवामान
- सतत धगधगती तणावपूर्ण सीमा

खेळूया शब्दांशी

१) ‘मन’ शब्द असलेले पाठातील वाक्प्रचार लिहा
- मन उल्हासित होणे
- मन चंद्रमाण्यांसारखे पाझरणे
- जीव तीळतीळ तुटणे
- अभिमानाने फुलून येणे
- अंतरंगाचा ठाव घेणे
- जीव घाबराघुबरा होणे
- मन हेलावणे
- मन आतुरणे
२) ‘पाव्हणेरावळे’ यासारखे तुम्हांला माहीत असलेले जोडशब्द लिहा. त्या जोडशब्दांचा वाक्यांत उपयोग करा
१. सणवार
श्रावण महिन्यामध्ये अनेक सणवार साजरे केले जातात.
२. घाबराघुबरा
समोर वाघ पाहून माझा जीव घाबराघुबरा झाला.
३. कावराबावरा
अचानक जमलेली गर्दी पाहून मी कावराबावरा झालो.
३) खालील कोडी सोडवा
१. हात आहेत; पण हालवत नाही.
खुर्ची
२. पाय आहेत; पण चालत नाही.
टेबल
३. दात आहेत; पण चावत नाही.
फणी
४. नाक आहे; पण श्वास घेत नाही.
सुई
५. केस आहेत; पण कधी विंचरत नाही.
ब्रश

पण थोडा उशीर झाला... स्वाध्याय सारांश

इयत्ता सहावी मराठी पाठ ६: पण थोडा उशीर झाला... यामध्ये कारगीलमधील सैनिकाच्या जीवनाचे आणि त्याच्या कुटुंबीयांच्या आठवणींचे मार्मिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, कारगीलचे वर्णन, सैनिकाच्या मनाच्या भावना, आणि मराठी वाक्प्रचार, जोडशब्द यांचा अभ्यास आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि प्रेरणादायी माहिती येथे उपलब्ध आहे.

कीवर्ड्स: पण थोडा उशीर झाला, इयत्ता सहावी मराठी, स्वाध्याय, कारगील, सैनिक, मराठी अभ्यास

Previous Post Next Post

نموذج الاتصال