इयत्ता सहावी मराठी - पाठ: डॉ. कलाम यांचे बालपण स्वाध्याय
प्रश्न १: चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा
अ) लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत?
लेखकाच्या लहानपणी सुशिक्षित लोक आपली वाचनाची आवड पूर्ण करण्यासाठी वर्तमानपत्रे वाचत असत. स्वातंत्र्य चळवळीतील घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी ग्रामस्थ वर्तमानपत्रांचा आधार घेत. काही लोक सोन्या-चांदीचे भाव किंवा भविष्य जाणून घेण्यासाठी वाचन करत, तर काहीजण महात्मा गांधी आणि हिटलर यांच्यासारख्या व्यक्तींच्या चर्चेसाठी वर्तमानपत्रांचा वापर करत.
आ) लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली?
रामेश्वरमला रेल्वेगाडी थांबत नसल्याने चालत्या गाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे फेकले जात. हे गठ्ठे उचलण्यासाठी शामसुद्दिनला मदतनीसाची गरज होती. त्याने लेखकाला या कामासाठी निवडले, आणि अशा प्रकारे डॉ. अब्दुल कलाम यांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली. या कामातून त्यांना मेहनतीचे महत्त्व समजले.
इ) डॉ. अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले?
डॉ. अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना त्यांचे वडील म्हणाले, “अबुल, मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर पडावे लागेल. सीगल पक्ष्याप्रमाणे घरटे सोडून नवे क्षितिज शोधावे लागते. रामेश्वरमच्या मातीचा आणि स्मृतींचा मोह सोडून तुझ्या स्वप्नांना गवसणी घाल. आम्ही आमच्या प्रेमाने किंवा गरजांनी तुझा मार्ग अडवणार नाही.”
ई) रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता?
रामनाथपुरमची गजबज आणि वैविध्य रामेश्वरमच्या साध्या, एकजिनसी वातावरणापेक्षा वेगळे होते, त्यामुळे लेखकाला तिथे रमता येत नव्हते. त्यांना घराची आणि विशेषतः आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ लागत असे. रामेश्वरमच्या शांत आणि परिचित वातावरणाची तुलना रामनाथपुरमशी होत असल्याने त्यांचे मन तिथे अस्वस्थ राहत असे.
प्रश्न २: तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा
१) तुम्हांला आई, वडील, बहीण, भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते?
आई: माया, ममता, सुसंस्कार आणि प्रेमळपणा.
वडील: मेहनत, धैर्य आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा.
बहीण: प्रेम, समजूतदारपणा आणि आपुलकी.
भाऊ: सहकार्य, मैत्री आणि एकमेकांना साथ देणे.
शेजारी: शेजारधर्म आणि गरज पडल्यास मदत करण्याची वृत्ती.
शिक्षक: ज्ञान, शिस्त आणि जीवनातील योग्य मार्ग दाखवणे.
वडील: मेहनत, धैर्य आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा.
बहीण: प्रेम, समजूतदारपणा आणि आपुलकी.
भाऊ: सहकार्य, मैत्री आणि एकमेकांना साथ देणे.
शेजारी: शेजारधर्म आणि गरज पडल्यास मदत करण्याची वृत्ती.
शिक्षक: ज्ञान, शिस्त आणि जीवनातील योग्य मार्ग दाखवणे.
२) तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता? वर्तमानपत्रांतील कोणता भाग तुम्हांला वाचायला अधिक आवडतो? तो भाग का आवडतो?
मी सकाळ आणि रत्नागिरी टाइम्स ही वर्तमानपत्रे नियमित वाचतो. मला वर्तमानपत्रातील क्रीडा विभाग वाचायला सर्वात जास्त आवडतो. खेळांबद्दल नवीन माहिती मिळणे आणि खेळाडूंच्या यशोगाथा वाचणे मला प्रेरणादायी वाटते. तसेच, मी खेळाडूंची छायाचित्रे आणि बातम्यांची कात्रणे जमा करतो, ज्यामुळे माझी खेळांबद्दलची आवड वाढते.
३) आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हांला तिची आठवण येते?
आई परगावी गेल्यावर जेवण बनवताना, घरातील कामे करताना आणि कपडे धुताना तिची आठवण येते. आजारी पडल्यावर तिच्या प्रेमळ काळजीची उणीव भासते. अभ्यास करताना तिच्या मार्गदर्शनाची आणि प्रोत्साहनाची आठवण होते. रोजच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये तिच्या सान्निध्याची जाणीव होते.
४) तुमच्या आई-वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते? ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
माझ्या आई-वडिलांना माझे शिक्षक होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी मी नियमित आणि मन लावून अभ्यास करेन. शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करेन आणि त्यासंबंधीची पुस्तके वाचेन. तसेच, शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन आणि त्यांचे गुण आत्मसात करून माझे ध्येय साध्य करेन.
खेळूया शब्दांशी
१) खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा
१. परवानगी
पर, रवा, रवानगी, वार, नर, नवा
२. हजारभर
हर, हजार, रजा, भर
३. एकजिनसी
एक
२) खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा
१. वितरक
राजू हा वर्तमानपत्रांचा वितरक आहे.
२. गि-हाईक
आमच्या कपड्याच्या दुकानात खूप गि-हाईक येतात.
३. वर्तमानपत्र
माझे बाबा रोज सकाळी वर्तमानपत्र वाचतात.
४. एकखांबी तंबू
श्यामचा धंदा म्हणजे एकखांबी तंबू आहे.
डॉ. कलाम यांचे बालपण - स्वाध्याय सारांश
इयत्ता सहावी मराठी पाठ ३: डॉ. कलाम यांचे बालपण यामध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या लहानपणातील आठवणी, रामेश्वरममधील जीवन, आणि त्यांच्या पहिल्या कमाईची संधी यांचे वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, वर्तमानपत्रांचे महत्त्व, आणि शब्दांशी खेळ यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य आणि प्रेरणादायी माहिती येथे उपलब्ध आहे.
कीवर्ड्स: डॉ. कलाम यांचे बालपण, इयत्ता सहावी मराठी, स्वाध्याय, अब्दुल कलाम, रामेश्वरम, वर्तमानपत्र, शिक्षण, मराठी अभ्यास