१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ

इयत्ता दहावी मराठी धडा 14: काळे केस याचे स्वाध्याय आणि प्रश्नोत्तरे

इयत्ता दहावी मराठी - धडा 14: काळे केस

इयत्ता दहावी मराठी - धडा 14: काळे केस

प्रश्न १: आकृती पूर्ण करा.

(अ) तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्ये

महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार

उत्तर:

(उत्तर उपलब्ध नाही; प्रश्नाला आकृती पूर्ण करण्यासाठी जागा आहे.)

(आ) लेखक सर्वकाळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी

महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार

उत्तर:

  1. नव्या नव्या कल्पना
  2. अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द

प्रश्न २: कारणे शोधा.

(अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण

उत्तर:

लेखकांना स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही; कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.

(आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण

उत्तर:

लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; कारण तो माणूस स्वत:च्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.

प्रश्न ३: खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

(अ) केसभर विषयांतर

उत्तर:

केसभर विषयांतर - अगदी थोडेसुद्धा विषयांतर.

(आ) केसांत पांढरं पडण्याची लागण

उत्तर:

केसांत पांढरं पडण्याची लागण - केस पांढरे होणे

(इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड

उत्तर:

प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड - प्रकाशामुळे चमकणारे झाड

प्रश्न ४: खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

(अ) गुडघे टेकणे

उत्तर:

गुडघे टेकणे: अर्थ - शरण येणे.
वाक्य: गुरुजींनी शेखरच्या अज्ञानापुढे गुडघे टेकले.

(आ) खनपटीला बसणे

उत्तर:

खनपटीला बसणे: अर्थ - सारखे विचारत राहणे.
वाक्य: सासू घरात आलेल्या नवीन सुनेच्या खनपटीला बसली.

(इ) तगादा लावणे

उत्तर:

तगादा लावणे: अर्थ - पुन्हा पुन्हा विचारणे.
वाक्य: सहलीला जाण्यासाठी जुईने आईकडे तगादा लावला.

(ई) निकाल लावणे

उत्तर:

निकाल लावणे: अर्थ - संपवणे.
वाक्य: बरीच वर्षे चाललेल्या खटल्याचा आज निकाल लागला.

(उ) पिच्छा पुरवणे

उत्तर:

पिच्छा पुरवणे: अर्थ - एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे.
वाक्य: चांगल्या गोष्टींसाठी शासन व्यवस्थेचा पिच्छा पुरवणे गरजेचे आहे.

प्रश्न ५: खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

(अ) निष्णात

उत्तर:

माधुरी सतार वाजवण्यात निष्णात आहे.

(आ) झिलई

उत्तर:

झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात.

(इ) नित्यनेम

उत्तर:

मधू नित्यनेमाने व्यायाम करतो.

(ई) लहरी

उत्तर:

आपण कधी लहरी वागू नये.

(उ) तगादा

उत्तर:

'खाऊ दे' असा छोट्या मनूने आईकडे तगादा लावला.

प्रश्न ६: खालील वाक्यातील अलंकार ओळखा.

(अ) नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात

उत्तर:

नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात - उपमा अलंकार
स्पष्टीकरण: नवीन कल्पना जणूकाही कारंजे आहेत, म्हणजेच कल्पनेला कारंज्याची उपमा लेखकांनी येथे दिलेली आहे.

(आ) तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो

उत्तर:

तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो - चेतनगुणोक्ती अलंकार
स्पष्टीकरण: देखावा सुद्धा बोलू शकतो हे लेखकांनी चेतनगुणोक्ती अलंकाराच्या मदतीने सांगितले आहे.

(इ) कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते

उत्तर:

कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - उपमा अलंकार
स्पष्टीकरण: मानवी कल्पनेला लक्ष्मीची उपमा येथे लेखकांनी दिलेली आहे.

प्रश्न ७: खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा.

(अ) मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात.
(आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते.
(इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी.
(ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.

उत्तर:

(अ) सुख - दुःख
(आ) गर्भित - उघड
(इ) स्तुती - निंदा
(ई) प्रश्न - उत्तर

परस्परविरोधी शब्द असलेल्या आणखी वाक्यरचना:

  1. परीक्षेत मुलं पास-नापास होणारच.
  2. खेळात हार-जीत आलीच.
  3. मोठी मुलं लहान मुलांना समजावून सांगत होती.

प्रश्न ८: विरुद्धार्थी शब्द लिहा.

(अ) अवरोह ×

उत्तर:

अवरोह × आरोह

(आ) अल्पायुषी ×

उत्तर:

अल्पायुषी × दीर्घायुषी

(इ) सजातीय ×

उत्तर:

सजातीय × विजातीय

(ई) दुमत ×

उत्तर:

दुमत × संमत

(उ) नापीक ×

उत्तर:

नापीक × सुपीक

प्रश्न ९: स्वमत.

(अ) लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.

उत्तर:

खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी, आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत, हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात. वास्तविक, दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो, याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट, आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील.

(आ) परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे. तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळले-बागडलेले लोक भेटायचे. जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची. कोण कोण काय काय करतो ही माहिती दिली-घेतली जायची. लेखकांकडे आकर्षक बाब होती. त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात. पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. कलपामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकांच्या एका स्नेह्याची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे, लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी, याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला. लेखकांनी थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली.

(इ) प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.

उत्तर:

प्रत्येकाची विचार करण्याची सवय व वेळ स्वतंत्र असते, यात शंकाच नाही. कोणाला कोणत्या वेळेला नवनवीन विचार सुचतील किंवा नवनवीन कल्पना स्फुरतील, हे सांगता येणे तसे कठीणच आहे. आमच्या कॉलनीत एक कवी राहतो. त्याला कॉलनीमध्ये चांगला मान आहे. अनेक जण त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रसंगांसाठी कविता लिहून घेतात. तोसुद्धा अतिशय आनंदाने लिहून देतो. या आमच्या कार्टून कॉलनीच्या टोकाला एक रस्ता आहे. तो रस्ता तिथेच संपतो. त्यामुळे तेथे वर्दळ नसते. हा कवी रोज सकाळी तिथे येरझारा घालत फिरत राहतो. असे चालता चालता त्याला कवितेच्या ओळी सुचतात. माझ्या वर्गात माझा एक मित्र आहे. तो अभ्यास करताना मोबाईलवर चित्रपट गीते लावून ठेवतो. त्याच्या मते, गाणी चालू असताना उत्तरे सुचतात, निबंध चांगला लिहिता येतो, गणित सहज सोडवता येतात. तो सांगतो की, गाणी चालू असताना त्याचे मन एकाग्र होते. 'काळे केस' या पाठाचे लेखक ना. सी. फडके यांना दाढी करता करता लेखन सुचत असे. या बाबतीत काही नियम सांगता येणे केवळ अशक्य आहे. प्रत्येकाची सवय वेगळी असते. स्वतःचे मन मुक्त आणि आनंदी होण्याची वेळसुद्धा वेगवेगळी असते. मन मुक्त आणि आनंदी असते तेव्हा विचार सुचतात, कल्पना सुचते. मनाची ही अवस्था कोणाला कधी लाभेल हे काहीही सांगता येत नाही.

भाषाभ्यास प्रश्न १: खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यांतील विभक्ती ओळखा.

सामासिक शब्द, विग्रह, विभक्ती

उत्तर:

सामासिक शब्द विग्रह विभक्ती
(अ) सभागृह सभेसाठी गृह चतुर्थी
(आ) कलाकुशल कलेत कुशल सप्तमी
(इ) ग्रंथालय ग्रंथांचे आलय षष्ठी
(ई) कष्टसाध्य कष्टाने साध्य तृतीया
(उ) रोगमुक्त रोगापासून मुक्त पंचमी

भाषाभ्यास प्रश्न २: खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

(अ) आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.

उत्तर:

सूर्यप्रकाश - सूर्याचा प्रकाश

(आ) सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा.

उत्तर:

देशार्पण - देशाला अर्पण

(इ) प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.

उत्तर:

ऋणमुक्त - ऋणापासून मुक्त

(ई) पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत.

उत्तर:

तोंडपाठ - तोंडाने पाठ

काळे केस स्वाध्याय - dahavi marathi

इयत्ता दहावी मराठी धडा 14: काळे केस यामध्ये लेखकाचे अनुभव, शब्दसौंदर्य आणि अलंकार यांचा अभ्यास आहे. या स्वाध्यायात आकृती पूर्ण करा, शब्दसमूहाचा अर्थ, अलंकार, समास आणि स्वमत यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य येथे उपलब्ध आहे.

कीवर्ड्स: काळे केस, स्वाध्याय, dahavi marathi, इयत्ता दहावी मराठी, लेखकाचे अनुभव, शब्दसौंदर्य, अलंकार, मराठी अभ्यास

Previous Post Next Post

نموذج الاتصال