१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता दहावी मराठी धडा 11: गोष्ट अरुणिमाची याचे स्वाध्याय आणि प्रश्नोत्तरे

इयत्ता दहावी मराठी - धडा 11: गोष्ट अरुणिमाची

इयत्ता दहावी मराठी - धडा 11: गोष्ट अरुणिमाची

प्रश्न १: आकृती पूर्ण करा.

अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती

उत्तर: 1.फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली.
2.खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला.

प्रश्न २: खालील कृतींतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.

(अ) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.

उत्तर: भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला - वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर

(आ) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.

उत्तर: चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला - धाडसी वृत्ती

(इ) उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.

उत्तर: उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती - ध्येयवादी

(ई) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.

उत्तर: ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला - व्यवहारी

प्रश्न ३: कोण ते लिहा.

(अ) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला

उत्तर: एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला - बचेंद्री पाल

(आ) सर्वांत मोठा मोटिव्हेटर

उत्तर: सर्वांत मोठा मोटिव्हेटर - स्वतःच

(इ) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे

उत्तर: अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे - भाईसाब

(ई) फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन

उत्तर: फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन - अरुणिमा

प्रश्न ४: अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.

अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये

उत्तर:

  1. ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून-सुलाखून निघत होते.
  2. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत.
  3. मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला.
  4. आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं.
  5. मी अशी नि तशी मरणारच होते; तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते.

प्रश्न ५: अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.

(अ) शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.

उत्तर: समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात. त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार.

(आ) अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.

उत्तर: अरुणिमाने तिकीट काढले नसणार. त्यामुळे टी.सी.च्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते.

प्रश्न ६: पाठातून तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

अरुणिमाची स्वभाववैशिष्ट्ये

उत्तर:

  1. पराकोटीचे धैर्य
  2. अमाप सहनशक्ती असणारी
  3. जबरदस्त आत्मविश्वास असलेली
  4. अन्यायाविरुद्ध लढणारी
  5. ध्येयवादी
  6. जिद्दी

प्रश्न ७: पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा.

(१) नॅशनल

उत्तर: नॅशनल - राष्ट्रीय

(२) स्पॉन्सरशिप

उत्तर: स्पॉन्सरशिप - प्रायोजकत्व

(३) डेस्टिनी

उत्तर: डेस्टिनी - नियती

(४) कॅम्प

उत्तर: कॅम्प - छावणी

(५) डिस्चार्ज

उत्तर: डिस्चार्ज - मोकळीक, पाठवणी

(६) हॉस्पिटल

उत्तर: हॉस्पिटल - रुग्णालय

प्रश्न ८: पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा.

(१) Now or never!

उत्तर: आता नाही तर कधीच नाही!

(२) Fortune favours the braves

उत्तर: शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते.

प्रश्न ९: 'नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा'तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.

खडतर अनुभव

उत्तर:

  1. (अ) अपंगत्व
  2. (आ) अतिशय कठीण प्रशिक्षण
  3. (इ) जीवघेणे आणि कठीण गिर्यारोहण
  4. (ई) मरणप्राय यातना

प्रश्न १०: खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्ये पुन्हा लिहा.

(अ) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच.

उत्तर: प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच, असे नाही.

(आ) सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.

उत्तर: सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.

(इ) खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत.

उत्तर: खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहू नका.

(ई) प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.

उत्तर: प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते.

प्रश्न ११: खालील वाक्यांतील क्रियापदे ओळखा.

(अ) सायरा आज खूप खूश होती.

उत्तर: सायरा आज खूप खूश होती - होती

(आ) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

उत्तर: अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला - टाकला

(इ) मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले.

उत्तर: मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले - आवडले

(ई) जॉनला नवीन कल्पना सुचली.

उत्तर: जॉनला नवीन कल्पना सुचली - सुचली

प्रश्न १२: खालील तक्ता पूर्ण करा.

शब्द, मूळ शब्द, लिंग, वचन, सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय, विभक्ती

शब्द मूळ शब्द लिंग वचन सामान्य रूप विभक्ती प्रत्यय विभक्ती
(१) कागदपत्रांचे कागदपत्र नपुंसक लिंग अनेकवचन कागदपत्रां चे षष्ठी
(२) गळ्यात गळा पुल्लिंग एकवचन गळ्या सप्तमी
(३) प्रसारमाध्यमांनी प्रसारमाध्यमे नपुंसक लिंग अनेकवचन प्रसारमाध्यमे नी तृतीया
(४) गिर्यारोहणाने गिर्यारोहण नपुंसक लिंग एकवचन गिर्यारोहण ने तृतीया

प्रश्न १३: स्वमत.

(अ) 'आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं', या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर:

आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसते, हा अरुणिमाचा संदेश आहे. याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी एडिसनचे उदाहरण उत्तम ठरेल. या एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्याला आपण बल्ब म्हणतो. या बल्बचा शोध लावण्यासाठी त्याने हजारापेक्षा जास्त प्रयोग केले. शेवटी तो यशस्वी झाला. म्हणजे यशस्वी प्रयोगाच्या आधीचे त्याचे हजारापेक्षाही जास्त प्रयोग फसले, वाया गेले, असे म्हटले पाहिजे. पण हे असे म्हणणे चूक आहे. कारण आपण निष्फळ समजतो, त्या प्रयोगांमधून एडिसनला एक भक्कम ज्ञान मिळाले होते. त्या निष्फळ प्रयत्नांच्या पद्धतींनी बल्ब निश्चितपणे तयार करता येत नाही, हे ते ज्ञान होते. हे नीट समजून घेतले, तर भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करता येते आणि यश निश्चितपणे मिळवता येते. म्हणून अपयशाने खचून जाता कामा नये. अपयशाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. अपयश हे भावी यशाचा पाया असते.

दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये अपयश मिळाले की अनेकजण खचून जातात. हे योग्य नाही. निकालानंतर शांत चित्ताने बसून आपल्या परीक्षेतील अपयशाचे विश्लेषण केले पाहिजे. आपल्या कोणत्या चुका झाल्या, अभ्यासातला कोणता भाग आपल्याला कळला नाही, तो आपण नीट समजावून घेतला होता का, समजावून घेताना कोणत्या अडचणी आल्या या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे. हे आपण प्रामाणिकपणे केले, तर भविष्यात आपण कधीही नापास होणार नाही.

(आ) 'प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

उत्तर:

कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सारखी नसते. एखादयाला नृत्य आवडते. एखाद्या खायला आवडते. एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते. तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे, हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरे तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वत:मधला वेगळा गुण ओळखला. स्वत:चे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे.

(इ) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.

उत्तर:

आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करीत असतो, त्या वेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो, हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळत नकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपले आपल्या मनातले ध्येयच खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वांत जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वांत जास्त उंच, सर्वांत जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

प्रश्न १४: उतारा वाचून दिलेल्या कृती करा.

उतारा: वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग घरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार? - राजा मंगळवेढेकर

(१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.

(अ) वृक्ष बहरू लागले आहेत.

उत्तर: वृक्ष-पर्णांनी अंग घरले आहे.

(आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे.

उत्तर: उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे.

(२) स्पष्ट करा.

(अ) पाणी समजूतदार वाटते

उत्तर: उताऱ्यात पाणी समजूतदार वाटते असा उल्लेख आहे, कारण भव्य आणि स्तब्ध पुलाच्या कमानीखालून वाहताना पाणी शहाण्यासारखे वागते. म्हणजेच, तो संथपणे, शांतपणे आणि नियंत्रितपणे वाहतो, जणू काही तो परिस्थिती समजून वागत आहे. या संदर्भात पाण्याचा हा स्वभाव समजूतदारपणाचा आणि संयमाचा आहे, जो स्थिर आणि गंभीर वाटतो.

(आ) पाणी क्रूर वाटते

उत्तर: उताऱ्यात पाणी क्रूर वाटते असा उल्लेख आहे, कारण पुढे जाऊन ते काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करते आणि आपल्याबरोबर घेऊन जाते. म्हणजेच, पाणी जेव्हा बेलगामपणे वाहते, तेव्हा ते निष्कारण विध्वंस करते, ज्यामुळे त्याचा स्वभाव अडाणी आणि उद्दाम वाटतो. या संदर्भात पाणी क्रूर वाटते, कारण तो गरीब आणि असहाय्य लोकांचे नुकसान करतो, त्यांचे जीवन उध्वस्त करतो.

प्रश्न आ: खालील आकृत्या पूर्ण करा.

(१) वर्षाऋतूतील निसर्गाचे रूप

वर्षाऋतूतील निसर्गाचे रूप :

  • आकाश ढगांनी पूर्णपणे झाकून गेलेले असते.
  • संपूर्ण अवकाश पाणावलेला असतो.
  • अधूनमधून पाऊस कोसळत असतो.
  • सगळीकडे हिरवीगार वनराजी पसरलेली असते.
  • नदी नाल्यांतून पाणी ओसंडून वाहत असते.
  • नवे पाणी उसळत, घुसळत व फेसाळत वाहते.

(२) पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया

पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया :

  • उसळत, घुसळत, फेसाळत धावणे.
  • काठ ओलांडून ओसंडून वाहणे.
  • संथपणे, धीरगंभीरपणे वाहणे.
  • बेफाम होऊन सगळे बुडवत धावणे.

प्रश्न इ: तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांतील अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.

वाक्य, अव्यय, अव्ययाचा प्रकार

वाक्य अव्यय अव्ययाचा प्रकार
(१) पाणी कुठे गच्चीवर लोळते. वर शब्दयोगी अव्यय
(२) पाणी येते आणि जाते. आणि उभयान्वयी अव्यय

प्रश्न १५: स्वमत.

उताऱ्यातून कळलेला 'पाण्याचा स्वभाव' तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

उताऱ्यातून पाण्याचा स्वभाव बहुरंगी आणि परस्परविरोधी असल्याचे दिसते. एकीकडे पाणी समजूतदार आणि शहाण्यासारखे वागते, जिथे ते पुलाच्या कमानीखालून संथपणे आणि गंभीरपणे वाहते, परिस्थितीशी जणू जुळवून घेताना दिसते. दुसरीकडे, तोच पाणी काठावरची गरीब खोपटी उद्ध्वस्त करून क्रूर, अडाणी आणि उद्दाम बनतो, जिथे तो विध्वंसकारी स्वरूपात दिसतो. पाणी कधी झाडावर चढते, कधी गच्चीवर लोळते, कधी घाट बुडवते, तर कधी वाट तुडवते, म्हणजेच त्याचा स्वभाव स्वैर आणि अनियंत्रितही आहे. पण त्याच वेळी, पाणी शहाणे आहे; जोपर्यंत कोणी त्याला अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान हसवत नाही, तोपर्यंत तो वाहून जातो. पाण्याला कृतार्थ होऊन जायचे आहे, फुलवत-खुलवत, पिकवत जायचे आहे, म्हणून त्याचा स्वभाव उपयुक्त आणि सर्जनशीलही आहे. अशा प्रकारे, पाण्याचा स्वभाव संयम, क्रूरता, स्वैरपणा आणि सर्जनशीलता यांचे मिश्रण आहे.

वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.

उत्तर:

वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये यासाठी माणसाने अनेक उपाययोजना करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, पावसाचे पाणी साठवण्यासाठी पाणलोट क्षेत्रांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी धरणे, तलाव, आणि विहिरी बांधून पाणी साठवता येईल, जेणेकरून ते पुढील हंगामात शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरता येईल. दुसरे, पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेचा अवलंब करावा. यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल आणि दुष्काळाच्या काळात पाण्याची कमतरता भासणार नाही. तिसरे, शेतमळे, बागा आणि रानांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करून पिके फुलवावीत, ज्यामुळे पाण्याचा कृतार्थ उपयोग होईल. चौथे, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करावी; उदाहरणार्थ, नळ बंद करणे, पाणी जपून वापरणे यासारख्या सवयी लावाव्यात. पाचवे, पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी नद्या, नाले स्वच्छ ठेवावेत, जेणेकरून पाणी वापरासाठी योग्य राहील. अशा प्रकारे, माणसाने पाण्याचा निष्फळ प्रवाह थांबवून त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा, ज्यामुळे पाणी फुलवत-खुलवत, पिकवत जाईल आणि कृतार्थ होईल.

गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय - dahavi marathi

इयत्ता दहावी मराठी धडा 11: गोष्ट अरुणिमाची यामध्ये अरुणिमाचे गुण, स्वभाव वैशिष्ट्ये, खडतर अनुभव आणि सामाजिक आशय यांचा अभ्यास आहे. या स्वाध्यायात आकृती पूर्ण करा, कृतीतून गुण, कोण ते लिहा, स्वमत आणि उतारा वाचून कृती यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य येथे उपलब्ध आहे.

कीवर्ड्स: गोष्ट अरुणिमाची, स्वाध्याय, dahavi marathi, इयत्ता दहावी मराठी, अरुणिमाचे गुण, स्वभाव वैशिष्ट्ये, खडतर अनुभव, मराठी अभ्यास

Previous Post Next Post

نموذج الاتصال