१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोन ७: निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २: निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २: निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग २ मधील "निवारा ते गाव वसाहती" हा पाठ बुद्धिमान मानव, शेती, मासेमारी, हंगामी तळ, आणि नवाश्मयुगीन खेड्यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, आहार पद्धतीतील बदल, आणि खेड्यांची तुलना यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मानवी वसाहतींच्या विकासाची जाणीव करून देण्यास मदत करते.

निवारा ते गाव वसाहती हा स्वाध्याय तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता:

निवारा ते गाव वसाहती इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
निवारा ते गाव वसाहती प्रश्न उत्तर
निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय उत्तरे
Nivara te gav vasahati paachavi swadhyay prashn uttare
Nivara te gav vasahati prashn uttr
5th parisar abhyas swadhyay prashn uttare

प्रश्न १: प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता?
बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरीण, मेंढी, डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता.
आ) नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते?
शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

प्रश्न २: विधानांची कारणे लिहा

अ) मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता.
  1. मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते.
  2. फार मोठ्या प्रमाणवर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यांमुळे मध्याश्मयुगापर्यंत मोठे प्राणी नष्ट होऊ लागले. त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणवर मासेमारी करू लागला होता.
आ) मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला.
  1. भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत.
  2. हवामान बदलानुसार धान्याची कापणी करणे, फळे-कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत.
  3. मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात, अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल यांचे ते निरीक्षण करीत असत.

प्रश्न ३: हंगामी तळाच्या कल्पनाचित्राचे निरीक्षण

मध्याश्मयुगातील हंगामी तळाच्या कल्पनाचित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
अ) चित्रातील घरांची रचना कशी आहे?
चित्रातील घरे गवताने शाकारलेली आहेत आणि ती उतरत्या छपराची आहेत.
आ) चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते?
चित्रातील घरांच्या बांधणीसाठी गवत, लाकूड हे साहित्य वापरलेले आढळते.
इ) हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात?
हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी, शेती, शिकार, छोट्या होड्या तयार करणे, घरबांधणी इत्यादी व्यवसाय करीत असावेत.

प्रश्न ४: उपक्रम

विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो, ते लिहा.

विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो.

  • उन्हाळा: सुती कपडे वापरतो, थंड पदार्थ खातो, थंड जागी राहतो.
  • पावसाळा: लवकर वाळणारे कपडे घालतो, हलका आहार घेतो, उकळलेले पाणी पितो.
  • हिवाळा: लोकरीची उबदार वस्त्रे वापरतो, उष्णता निर्माण करणारे पदार्थ खातो, उबदार जागेत राहतो.

अशा रीतीने विविध ऋतूंमध्ये हवामान बदलाचा परिणाम आपल्या जगण्यावर होतो.

प्रश्न ५: तुलना

नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा.
नवाश्मयुगीन खेडेआधुनिक खेडे
  1. गाव वसाहती स्थापन करण्यास सुरुवात झाली होती.
  2. मानवसमूह प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता.
  3. शेतीची अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती.
  4. पाणी सिंचनाची व्यवस्था, धान्याचे प्रकार मर्यादित होते.
  1. गाव-वसाहती स्थापन होऊन अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत.
  2. शेतीखेरीज अनेक पूरक उद्योगधंदे सुरू झाले आहेत.
  3. प्रगत अवजारे वापरून शेती केली जाते.
  4. पाणी सिंचनाचे व अन्नधान्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २: निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ चा पाठ: निवारा ते गाव वसाहती यामध्ये बुद्धिमान मानव, शेती, मासेमारी, हंगामी तळ, आणि नवाश्मयुगीन खेड्यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, आहार पद्धतीतील बदल, आणि खेड्यांची तुलना यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मानवी वसाहतींच्या विकासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे.

निवारा ते गाव वसाहती हा स्वाध्याय तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता:

निवारा ते गाव वसाहती इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
निवारा ते गाव वसाहती प्रश्न उत्तर
निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय उत्तरे
Nivara te gav vasahati paachavi swadhyay prashn uttare
Nivara te gav vasahati prashn uttr
5th parisar abhyas swadhyay prashn uttare

कीवर्ड्स: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास, निवारा ते गाव वसाहती, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 5वी स्वाध्याय, मराठी अभ्यास, बुद्धिमान मानव, शेती, मासेमारी, नवाश्मयुग, हंगामी तळ

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर परिसर अभ्यास भाग २ पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

FAQ: निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय प्रश्नोत्तरे

१. निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय कोणत्या विषयाचा आहे?

हा स्वाध्याय इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग २ या विषयाचा आहे, ज्यामध्ये बुद्धिमान मानव, शेती, मासेमारी, हंगामी तळ, आणि नवाश्मयुगीन खेडे यांचे वर्णन आहे.

२. बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता?

बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरीण, मेंढी, डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता.

३. मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल का झाला?

मध्याश्मयुगात हवामान उबदार होणे, पर्यावरणातील बदल, आणि मोठ्या प्राण्यांचा नष्ट होणे यामुळे बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल झाला.

४. नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते?

शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال