इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

माझे आवडते शिक्षक (निबंध, भाषण) l Maze Avdate Shikshak l My Favourite Teacher

        प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्‍ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्‍त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१ मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते, 
भाषण व निबंध लिंक्स










माझे आवडते शिक्षक (निबंध, भाषण)

                                प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यामध्ये त्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी एका गुरुची गरज असते. सर्वात प्रथम आपले आई वडील हे आपले गुरु आहेत, ते आपल्याला चालायला, बोलायला अशा अनेक गोष्टी शिकवतात. आपणास चांगले वळण लावतात. आपली प्रत्येक गरज पूर्ण करतात. कोणत्याही गोष्टीसाठी नकार देत नाहीत. आई वडिलांन सोबत आपल्या आयुष्यामध्ये दुसरे एक महत्वाचे गुरु असतात ते म्हणजे आपले शिक्षक. शाळेत खूप शिक्षक आहेत. सगळे खूप चांगले आहे, ते खूप चांगले शिकवतात परंतु या सर्वांमध्ये निकम सर माझे आवडते शिक्षक आहे. निकम सर आम्हाला गणित हा विषय शिकवतात ते मला सर्व शिक्षकांमध्ये जास्त आवडतात.निकम सर जरा रागीट आहेत, शिस्तप्रिय आहेत त्यांना खोटे बोललेले अजिबात सहन होत नाही. बाहेरून रागीट पण आतमधून एकदम मऊ कापसासारखे आहेत थोडे रागवतात परंतु थोडया वेळाने शांतपणे समजावून सांगतात. म्हणून ते मला खूप आवडतात.निकम सर गणितातील आकडेवारी, पाढे, बेरीज, वजाबाकी अशा अनेक बाबी सोप्या पद्धतीने कशी सोडवायची ते सांगतात. 
    
                                आम्हांला कोणतीही अडचण आली तरी ते चुटकी सरशी सोडवतात निकम सरांची पहिली जरा भीती वाटायची कारण ते गणिताचे शिक्षक आणि गणित म्हणजे न आवडणारा विषय होता. त्यामध्ये निकम सर जरा रागीट आहेत असे आमच्या अगोदर शाळेत असलेल्या मुलांनी सांगितले होते त्यामुळे जरा मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आम्हांला ते जेव्हा गणित विषयाला शिकवायला आले तेव्हा जरा भीती वाटली परंतु जसजशी त्याची शिकवन्याची पद्धत समजत गेली तसे आम्हांला त्याच्याविषयी वाटणारी भीती कमी होत होती.भीती ऐवजी त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला निकम सर हे माझे आवडते सर झाले त्यांच्यामुळे गणित हा विषय आमच्या आवडीचा नसणारा खूप सोप्पा वाटायला लागला. गणिते पटकन सोडवू लागले, पाढे पाठ झाले. लगेच कोणत्याही प्रश्नाची उत्तरे चुटकी सरशी सोडवता येतात जिथे कळत नसेल तिथे लगेच समजावून सांगतात. त्यांची शिकवन्याची पद्धत खूप सोपी असते लगेच समजते ते ज्यादा तास घेऊन आम्हांला व्यवस्थित आमचा पाया मजबूत करतात. निकम सरांनी आमच्या शाळेतील सर्व मुलांना खूप चांगल्या प्रकारे त्याच्या विषयात तत्पर केले आहे. आम्ही त्याच्या विषयाचा कोणताही क्लास बाहेर लावत नाही ते आम्हांला सोप्या पद्धतीने शिकवतात. प्रत्येक वेळी येणाऱ्या शंकेचे निरसन करतात कोणतीही शंका येऊ देत नाही. 

                             निकम सर हे आम्हांला काही फक्त अभ्यासात गुतवून न ठेवता आमच्या शरीरासाठी आवश्यक असणारे खेळ घेतात. खेळ घेताना ते प्रत्येक मुलाला कोणत्या खेळात आवड आहे हे समजून घेऊन त्या मुलाला त्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. निकम सर हे प्रत्येक मुलाला आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे याची निवड करण्यास सांगतात. त्यांना प्रोत्साहित करतात की त्यांना डॉक्टर, इंजिनियर,वकील ,चांगला खेळाडू इ. बनायचे असेल ते बनू शकता याविषयी योग्य मार्गदर्शन देतात. शिक्षक आपल्याला कळतं नसल्यापासून ते आपण पैसे कमवत नाही तोपर्यंत आपल्याला योग्य मार्ग दाखवतात.निकम सर प्रत्येक कार्यक्रमात भाग घेण्यास प्रवृत्त करतात. सर प्रत्येक मुलाच्या अंगात कोणती कला आहे ती ते लगेच ओळखतात व त्यानुसार त्याला एखाद्या बारीक रोपटे असते त्याला खतपाणी देऊन जसे मोठा वृक्ष बनतो तसेच मुलांना चांगले संस्कार देऊन जगात मोकळे सोडले जाते. ज्याच्या सोबत चांगल्या संस्काराची शिदोरी आहे तो खूप मोठा होतो त्याला संस्काराने सर्व काही मिळते. 

                            पैशा पेक्षा चांगले संस्कार महत्वचे असतात. आम्हांला सरांनी कसे बोलायचे कसे वागायचे हे शिकवले आहे. आम्हाला सरांनी वेगवेगळी भाषणे बोलायला शिकवले समोर काही माणसे असताना स्टेज वर जाऊन आपले मनोगत कसे व्यक्त करायचे हे आम्हांला सर्व मुलांना शिकवले. जसे आम्हांला आमचे आई वडील महत्वाचे वाटतात तसेच सर देखील महत्वाचे आहेत. ते आई वडिलाप्रमाणे सर्व समजून सांगतात. मला अभिमान वाटतो की ते माझे शिक्षक आहेत. असे आहेत माझे आवडते शिक्षक निकम सर.

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال