१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी भूगोल धडा १०: मानवी वस्ती स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी भूगोल धडा १०: मानवी वस्ती स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी भूगोल धडा १०: मानवी वस्ती स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या भूगोल विषयातील धडा १०: मानवी वस्ती यामध्ये मानवी वस्तीचे प्रकार, केंद्रित व विखुरलेली वस्ती, आणि त्यांचे प्राकृतिक घटकांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे आणि वस्तीचे प्रकार यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना या संकल्पना समजण्यास मदत करते.

प्रश्न १: थोडक्यात उत्तरे लिहा

१) मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा.
१) विकास प्रक्रियेनुसार: वाडी, ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती, शहरी वस्ती.
२) वितरणानुसार: विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती, रेषाकृती वस्ती.
२) केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा.
केंद्रित वस्ती विखुरलेली वस्ती
घरे एकमेकांच्या जवळ असतात. घरे एकमेकांपासून दूर असतात.
पुरेशा सोईसुविधा उपलब्ध असतात. पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नसतात.
लोकसंख्या तुलनेने जास्त असते. लोकसंख्या मर्यादित असते.
३) मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा.
१) हवामान, जमीन/मृदा, भूरचना, शुष्क भूमी, पाणीपुरवठा, नदीकिनारा यांसारखे प्राकृतिक घटक परिणाम करतात.
२) पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन यामुळे वस्त्या विकसित होतात.
३) उदा., राजस्थानच्या वाळवंटात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित आहे.
४) मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा.
१) पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन यामुळे वस्त्या विकसित झाल्या.
२) साधनसंपत्तीवर आधारित व्यवसाय ठरले, ज्यामुळे विशिष्ट समूहांच्या वस्त्या निर्माण झाल्या.
३) उदा., समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी (कोळीवाडा), वनप्रदेशात वनोत्पादन (आदिवासी पाडा), सुपीक जमिनीवर शेती (शेतकरी वस्ती).
५) वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तींमधील फरक स्पष्ट करा.
वाडी ग्रामीण वस्ती
लोकसंख्या मर्यादित असते. लोकसंख्या वाडीच्या तुलनेने अधिक असते.
एकाच प्रकारच्या व्यवसायाचे लोक राहतात. विविध व्यवसाय करणारे लोक राहतात.
उदा., शेतकऱ्यांची वाडी. उदा., शेतकरी, कोळी, कुंभार, व्यापारी, दुकानदार.

प्रश्न २: पुढील विधानांवरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा

१) शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होते.
विखुरलेली वस्ती
२) वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते.
केंद्रित वस्ती
३) रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात.
रेखाकृती वस्ती
४) ही वस्ती समुद्रकिनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आढळते.
रेषाकृती वस्ती
५) प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून लांब असतात.
विखुरलेली वस्ती
६) ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते.
केंद्रित वस्ती
७) घरे दूरदूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते.
विखुरलेली वस्ती
८) घरे एकमेकांस लागून असतात.
केंद्रित वस्ती

प्रश्न ३: आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा

अ) ‘A’ वस्तीमध्ये पाच ते सहा घरे असून गावात इतर सुविधा नाहीत.
विखुरलेली वस्ती
आ) ‘B’ वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहे.
केंद्रित वस्ती / नागरी वस्ती
इ) ‘C’ वस्तीमध्ये घरे, शेती, अनेक दुकाने व छोटे उद्योगधंदे आहेत.
रेषाकृती वस्ती / ग्रामीण वस्ती
ई) ‘D’ वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे. तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत.
केंद्रित वस्ती
* ‘C’ ही रेखाकृती वस्ती आहे. ती तेथे विकसित होण्याची दोन कारणे सांगा.
१) ‘C’ हे ठिकाण प्रदेशाच्या पायथ्याशी कमी उंचीवर आहे.
२) ‘C’ या ठिकाणालगत मुख्य रस्ता आहे.

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी भूगोल धडा १०: मानवी वस्ती स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी भूगोल धडा १० चा स्वाध्याय: मानवी वस्ती यामध्ये मानवी वस्तीचे प्रकार, केंद्रित व विखुरलेली वस्ती, आणि त्यांचे प्राकृतिक घटकांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे आणि वस्तीचे प्रकार यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि भौगोलिक संकल्पनांची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी भूगोल, मानवी वस्ती, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 7वी भूगोल स्वाध्याय, मराठी अभ्यास, केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती, 7वी भूगोल गाइड pdf, Maharashtra board geography

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर भूगोल पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال