इयत्ता पाचवी मराठी - पाठ: सावरपाडा एक्सप्रेस: कविता राऊत स्वाध्याय
प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला?
कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला.
आ) कविताला कशामुळे दिलासा मिळाला?
चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक हुकले; त्या प्रसंगी आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला.
इ) कविताचे पाय कशामुळे कणखर बनले?
कविताचे पाय कष्टप्रद अनुभवांमुळे कणखर बनले.
ई) कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले?
कविताने जेव्हा नाशिक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, तेव्हा विजेंद्र सिंग यांनी कविताचे वेगळेपण ओळखले.
उ) कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही?
आईला उगीच वाईट वाटू नये म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही.
ऊ) कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते?
कविता पी.टी.उषा या धावपटूला आदर्श मानते.
ए) कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते?
कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
प्रश्न २: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा
अ) कविता राऊतला 'सावरपाडा एक्सप्रेस' का म्हणतात?
कविताने राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य पदके पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये तिने भारताचे नाव उंच केले म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात.
आ) कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली?
नाशिक येथे सराव आणि हरसूल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची होणारी ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा प्रश्न तिच्या आईवडिलांना पडला, त्यामुळे ओढाताण कमी व्हावी म्हणून शिक्षण व सराव यासाठी कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली.
इ) हरसूल, सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो?
एकापाठोपाठ एक विक्रम कविताच्या नावावर झळकू लागले. कविताच्या या यशामुळे हरसूल, सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. म्हणून संपूर्ण हरसूल, सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो.
ई) आपली लेक खूप मोठी झाली आहे, असे सुमित्राबाईंना का वाटते?
नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकली. स्पर्धेत विजय मिळाल्यानंतर ती आपल्या गावी येणार, म्हणून सकाळपासून सर्वजन स्वागताच्या तयारीत गुंतले होते. तिचे कौतुक करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहिले होते.
उ) कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात?
आपली मुलगी इतकी पुढे जाईल असं तिच्या आईवडिलांना कधीच वाटल नव्हतं. कविताच्या प्रतिकूल परिस्थितीत प्रशिक्षक विजेंद्र सिंग हे कविताला मदत मिळावी म्हणून कमीपणा वाटून न घेता जो भेटला त्या प्रत्येकास विनंती करायचे. जर त्यांनी कमीपणा वाटून घेतला असता तर कविता आज इथपर्यंत पोहचू शकली नसती म्हणून कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना देतात.
ऊ) कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल?
आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेणे, प्रामाणिकपणे यशासाठी मेहनत घेणे, अपयश आले तरीही खचून न जाता यशासाठी प्रयत्न करत राहणे ही प्रेरणा मी कविताकडून घेईन.
प्रश्न ३: प्रत्यय लावून किंवा उपसर्ग लावून शब्द
अ) पण
वेगळेपण, मोठेपण
आ) दार
चमकदार, रुबाबदार
इ) पणा
कमीपणा, खोटेपणा
ई) इक
आर्थिक, औद्योगिक
उ) पणी
लहानपणी, मोठेपणी
ऊ) इत
अखंडित, सदोदित
प्रश्न ४: वाक्यात उपयोग करा
अ) दिलासा मिळणे
परीक्षेतील अपयशामुळे खचलेल्या राजूची आईने समजूत काढल्यावर राजूला दिलासा मिळाला.
आ) गराडा घालणे
गावात जादुगार येताच त्याच्याभोवती लहान मुलांनी गराडा घातला.
इ) कणखर बनणे
कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले.
ई) ओढाताण होणे
घरातील कामे व शेतातील कामे यांमुळे आईची फार ओढाताण होते.
उ) नात्यातील वीण गहिरी असणे
माझी व माझ्या भावाच्या नात्यातील वीण गहिरी आहे.
ऊ) वणवण सहन करणे
चार पैसे कमावण्यासाठी संतोषला वणवण सहन करावी लागते.
प्रश्न ५: समान अर्थ शब्द
अ) माय
आई, जननी
आ) लेक
मुलगी
इ) बळ
सामर्थ्य, शक्ती
ई) गहिरे
खोल
उ) क्रीडा
खेळ
ऊ) वडील
बाप
प्रश्न ६: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा
तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो? तो का आवडतो?
मला बॅडमिंटन खेळायला आवडते, कारण हा खेळ खेळताना खूप मजा येते आणि शारीरिक तंदुरुस्ती राहते.
प्रश्न ७: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा
तुम्हाला मैदानी खेळ आवडतात, की बैठे खेळ? की दोन्ही? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा.
मला मैदानी खेळ आवडतात, कारण ते खेळताना मोकळ्या हवेत खेळायला मिळते आणि शारीरिक व्यायाम होतो.
प्रश्न ८: थोडक्यात उत्तरे लिहा
अ) तुमची गल्ली / गाव कशाने वेढलेले आहे?
याचा अर्थ तुमचे गाव किंवा गल्ली कोणत्या गोष्टींनी (उदा. झाडे, डोंगर, नदी) वेढलेली आहे.
आ) आपल्या राज्यातली अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत.
याचा अर्थ राज्यातील शहरे प्रदूषण आणि धुरामुळे घेरलेली आहेत.
इ) अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत.
याचा अर्थ मोठ्या शहरांमध्ये इमारती आणि बांधकामे इतकी वाढली आहेत की ती जंगलासारखी दिसतात.
ई) कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात.
याचा अर्थ अनिताबाईंच्या आजूबाजूला नेहमी कामाच्या फायलींचा ढीग असतो.
प्रश्न १०: दिलेल्या शब्दावरून गोष्ट तयार करा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 'क्रीडामहोत्सव' या विषयावर आठ ते दहा वाक्ये लिहा.
आमच्या शाळेत डिसेंबर महिन्यात क्रीडामहोत्सव आयोजित करण्यात आला होता. हा महोत्सव तालुका पातळीवर शाळेच्या मैदानावर पार पडला. खो-खो, कबड्डी, धावणे असे खेळ आयोजित केले गेले. मला खो-खो हा खेळ सर्वात जास्त आवडला, कारण त्यात संघकार्य आणि चपळता दिसून येते. स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. बक्षीस वितरण समारंभात विजेत्यांचा उत्साह पाहून मला खूप आनंद झाला आणि मी पुढील वर्षी सहभागी होण्याचा निश्चय केला.
सावरपाडा एक्सप्रेस: कविता राऊत स्वाध्याय - pahavi marathi
इयत्ता पाचवी मराठी पाठ: सावरपाडा एक्सप्रेस: कविता राऊत यामध्ये धावपटू कविता राऊतच्या यशस्वी प्रवासाची प्रेरणादायी कहाणी आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, समानार्थी शब्द, शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग, आणि खेळांबद्दल प्रश्न यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि प्रेरणादायी शिक्षण येथे उपलब्ध आहे. कविताची मेहनत आणि यश विद्यार्थ्यांना ध्येयासाठी प्रेरणा देते.
कीवर्ड्स: सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, खेळाडू, प्रेरणा, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा
संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: