१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास एक १२: सर्वांसाठी अन्न स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास एक १२: सर्वांसाठी अन्न स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास एक १२: सर्वांसाठी अन्न स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग १ मधील "सर्वांसाठी अन्न" हा पाठ शेती, सुधारित बियाणे, सिंचन पद्धती, आणि धान्य साठवणी यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, आणि पिकांचे संरक्षण यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना शेती आणि अन्नसुरक्षेची जाणीव करून देण्यास मदत करते.

सर्वांसाठी अन्न - प्रश्न १: काय करावे बरे?

प्रश्न १: काय करावे बरे?

कुंडीतील रोप वाढत नाही.
  • कुंडीतील रोपाला पोषक सेंद्रिय खते घालावीत.
  • रोज पुरेशा प्रमाणात पाणी घालावे.
  • पुरेशा सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी कुंडी ठेवावी.
  • कीड किंवा परजीवी नाही याची खात्री करावी.

सर्वांसाठी अन्न - प्रश्न २: जरा डोके चालवा

प्रश्न २: जरा डोके चालवा

घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो?
पूर, अवर्षण, वादळे, गारपीट यांमुळे शेतीचे नुकसान होऊन अन्नधान्याची कमतरता जाणवते. ठराविक कालावधीत मिळणारी अन्नधान्ये पुढील हंगामापर्यंत पुरवावी लागतात, आणि गरजेच्या वेळी उपलब्ध व्हावी म्हणून साठा केला जातो.

सर्वांसाठी अन्न - प्रश्न ३: चूक की बरोबर

प्रश्न ३: चूक की बरोबर ते सांगा

अ) शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे.
चूक. शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत.
आ) आपला भारत देश शेतीप्रधान आहे.
बरोबर.
इ) सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही.
चूक. सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढते.

सर्वांसाठी अन्न - प्रश्न ४: उत्तरे लिहा

प्रश्न ४: खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

अ) सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणते फायदे होतात?
  • अधिक पिक घेणे शक्य होते.
  • पिके किडींना बळी पडत नाहीत.
  • पिकांची वाढ जोमाने आणि झपाट्याने होते.
  • काही बियाणे कमी पाण्यातही भरगोस पिक देतात.
आ) सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या, त्यांचे फायदे कोणते?
ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सुधारित पद्धती आहेत. फायदे: पिकांच्या मुळांशी आवश्यक पाणी जाते, पाण्याचा अपव्यय टळतो, उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो.
इ) ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा.
ठिबक सिंचन पद्धतीत छिद्रे असलेल्या नलिकांद्वारे पिकांच्या मुळांशी आवश्यक पाणी थेंबाथेंब दिले जाते, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो.
ई) कोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते?
  • किडींच्या प्रादुर्भावामुळे.
  • रोग पडल्याने.
  • योग्य पाणी आणि खत न मिळाल्याने.
उ) पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात?
कीटकनाशके फवारणे, बियाण्यांवर औषधे चोळणे.
ऊ) जमिनीचा कस कशामुळे कमी होतो?
  • तेच पिक वारंवार घेतल्याने.
  • रासायनिक खतांचा बेसुमार वापरामुळे.
  • पाण्याच्या अतिवापरामुळे जमीन क्षारपड होते.
ए) आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले?
  • सुधारित बियाण्यांचा वापर.
  • ठिबक आणि तुषार सिंचन पद्धती.
  • कीटकनाशकांचा वापर.
ऐ) कोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते?
  • उन्हात वाळवून पोत्यात भरणे.
  • औषधे फवारणे.
  • कडूलिंबाचा पाला घालणे.
  • संरक्षक औषधांचा वापर.
  • कोरडी आणि हवेशीर जागा ठेवणे.
ओ) शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते?
पाऊस, नदी, तलाव, विहिरी, आणि धरणांद्वारे पाणी उपलब्ध केले जाते.

सर्वांसाठी अन्न - प्रश्न ५: जोड्या जुळवा

प्रश्न ५: जोड्या जुळवा

'अ' गट'ब' गट
१) दमट हवेतीलइ) बुरशी लागणे
२) कोरड्या हवेतील धान्यसाठाअ) धान्याला बुरशी न लागणे
३) धान्यसाठ्यात औषधे ठेवणेआ) कीड-मुंगी न लागणे

सर्वांसाठी अन्न - FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास एक १२: सर्वांसाठी अन्न स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग १ चा पाठ: सर्वांसाठी अन्न यामध्ये शेती, सुधारित बियाणे, सिंचन पद्धती, आणि धान्य साठवणी यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, आणि पिकांचे संरक्षण यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि अन्नसुरक्षेची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे.

कीवर्ड्स: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास, सर्वांसाठी अन्न, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 5वी स्वाध्याय, मराठी अभ्यास, सर्वांसाठी अन्न प्रश्न आणि उत्तरे, शेती, ठिबक सिंचन, धान्य साठवण

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर परिसर अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

FAQ: सर्वांसाठी अन्न स्वाध्याय प्रश्नोत्तरे

१. सर्वांसाठी अन्न स्वाध्याय कोणत्या विषयाचा आहे?

हा स्वाध्याय इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग १ या विषयाचा आहे, ज्यामध्ये शेती आणि धान्य साठवणीचे वर्णन आहे.

२. ठिबक सिंचन पद्धती काय आहे?

ठिबक सिंचन पद्धतीत छिद्रे असलेल्या नलिकांद्वारे पिकांच्या मुळांशी आवश्यक पाणी थेंबाथेंब दिले जाते.

३. धान्य साठवणीसाठी कडूलिंबाचा पाला का वापरतात?

कडूलिंबाचा पाला कीटकांचा नायनाट करतो, ज्यामुळे धान्य सुरक्षित राहते.

४. सुधारित बियाणांचा फायदा काय?

सुधारित बियाणे अधिक उत्पादन देते आणि किडींना प्रतिकार करते.

Previous Post Next Post

نموذج الاتصال