इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

Answers3

 

दिवाळी अभ्यास 2021-22 

Diwali Abhyas 2021-22 

 दिवाळी अभ्यास Diwali Abyas म्हटल कि आता सुट्टीत पण अभ्यास ; पण मित्रानो या सुट्टीत दिवाळीअभ्यासाची पर्वणीच घेऊन आली आहे Minishala. या सुट्टीमध्ये दिवाळी अभ्यास करून भरपूर सराव करा आणि दिवाळी अभ्यास सोडवून हुशार व्हा.
 

दिवाळी अभ्यास Diwali Abyas मुलांचा आत्मविश्वास वाढविणारा 

Minishala अंतर्गत दिवाळी अभ्यासातून विद्यार्थ्यांच्या basic गोष्टींचा सराव होणार आहे त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. 

दिवाळी अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक 

Minishala अंतर्गत विद्यार्थांना इयत्तेनुसार अगदी योग्य दिवाळी अभ्यास Diwali Abyas देण्यात आला आहे. दिवाळी अभ्यास Diwali Abyas सोडवल्यास विद्यार्थांना अभ्यासाची योग्य दिशा मिळेल.


भगवान बुद्ध आपल्‍या सर्व शिष्‍यांवर फार प्रेम करत असत. एकदा त्‍यांचा वक्‍कली नावाचा शिष्‍य आजारी पडला. काही दिवस इतर भिख्‍खूंनी त्‍याची देखभाल केली परंतु तो ठीक झाला नाही. एक दिवस वक्‍कली आपल्‍या एका भिख्‍खू मित्राला म्‍हणाला,''भगवान बुद्धांचे दर्शन करायचे आहे. त्‍यातून माझ्या मनाला शांतता लाभेल आणि मन सुखी होईल. तसेच शरीरालाही ठीक व्‍हायला वेळ लागणार नाही.'' बुद्धांपर्यंत वक्‍कलीच्‍या अवस्‍थेचा आणि इच्‍छेचा संदेश पोहोचला, तेव्‍हा ते ताबडतोब त्‍याला भेटायला आले. भगवान बुद्ध येत असताना दुरुनच वक्‍कलीने पाहिले आणि त्‍यांच्‍या सन्‍मानार्थ तो पलंगावरून उठण्‍याचा प्रयत्‍न करू लागला. बुद्धांनी त्‍याला उठू न देता प्रेमाने म्‍हटले,'' मला खाली बसण्‍यासाठी आसन आहे, तुम्‍ही उठण्‍याची गरज नाही.'' वक्‍कलीने गहिवरून म्‍हटले,'' मला तुमचे दर्शन करण्‍याची मोठी आस लागून राहिली होती. ती इच्‍छा आज पूर्ण झाली.'' बुद्ध म्‍हणाले,''वक्‍कली, जशी वेगवेगळ्या अशुद्धीने भरलेली तुझा देह आहे, तसाच माझाही देह अशुद्धीने भरलेलाच आहे. देहाकडे लक्ष देऊ नका, धर्माकडे लक्ष द्या. आपण समाजासाठी काय करू शकतो याचा विचार करा'' बुद्धांनी यातून व्‍यक्तिपूजेपेक्षा सिद्धांताला महत्‍व दिले आहे. 

तात्‍पर्य - व्यक्तिपूजनात केवळ व्यक्तिचेच महत्‍व वाढत जाते, विचारांचे नाही. व्‍यक्ति कितीही मोठी असली तरी तिचे आचार, विचारसरणी यांचे अनुकरण व्‍हावयास हवे. व्‍यक्ती ही कालबद्ध असते, तिच्‍या मृत्‍युनंतरही विचार आचरणात आणणे हेच गरजेचे आहे. 

(संग्रहित)

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال