१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता आठवी मराठी पाठ १९: गे मायभू स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवी मराठी पाठ १९: गे मायभू स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवी मराठी पाठ १९: गे मायभू स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवीच्या मराठी विषयातील पाठ १९ "गे मायभू" ही कविता मातृभूमीविषयी कवीची भक्ती, कृतज्ञता आणि तिचे पांग फेडण्याची इच्छा व्यक्त करते. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, कृती, आणि कवितेचे विश्लेषण यांचा समावेश आहे. (Iyatta 8vi Marathi Ge Maybhu Swadhyay)

प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो?
कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो.
आ) मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती?
सूर्य, चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत.
इ) कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला?
मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला.

प्रश्न २: खालील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा

अ) आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
मातृभूमी हे कवींचे दैवत आहे. या महान देवतेची पूजा सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य, तेजस्वी व अलौकिक साधने हवीत असे कवींना वाटते. म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्य, चंद्र व तारे आणणार आहेत.
आ) आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा
कवी मातृभूमीला माउली संबोधतात व स्वत: लहान बाळ समजतात. आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते. मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई, तुझ्यामुळे मी तुझे तान्हे लेकरू आहे.

प्रश्न ३: हे केव्हा घडते ते लिहा

अ) कवीची ललाटरेषा प्रयाग काशी बनते...
जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात, तेव्हा कवींची ललाटरेषा प्रयाग काशी बनते.
आ) कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो...
जेव्हा कवींची वाणी मातृभूमीरूप आईच्या दुधाने भिजून जाते, तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात.

प्रश्न ४: खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा

अ) माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आ) शब्दसामर्थ्य, प्रतिभासामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईन
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी.

प्रश्न ५: कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यांत उपयोग करा

  1. पांग फेडणे: ज्या आईवडिलांनी आपले पालनपोषण केले, त्यांचे पांग फेडायला हवे.
  2. पायधूळ घेणे: परीक्षेला जाताना आपल्या आईची पायधूळ घ्यावी.

प्रश्न ६: कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा

  • सारे - तारे
  • कशाला - आला
  • गाणी - वाणी
  • जराशी - काशी
  • तान्हा - पान्हा

प्रश्न ७: स्वमत

अ) कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे, ते स्पष्ट करा
कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे. मातेमुळे माझ्या शब्दांत सामर्थ्य आले आहे. त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे मोठे भाग्य आहे. तिची पायधूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते. पायधूळ म्हणजे मातृभूमीचा चरणस्पर्श होय. तिच्या चरणांशी लीन होऊन, तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायधूळ कपाळाला लावणे असे म्हटले आहे.
आ) ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे’ या ओळीचा सरळ अर्थ लिहा
मातृभूमी ही माता आहे, आणि मी तिचे तान्हे बाळ आहे. मातृभूमीने माझे लालन, पालन व पोषण केले आहे. तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे. अशा माउलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्य नाही. तरीही विनम्रभावाने कवी म्हणतात की, तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे. म्हणून चंद्र, सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे.
इ) कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा
कवी मातृभूमीला माता मानतो आणि तिच्याप्रती अपार भक्ती व कृतज्ञता व्यक्त करतो. तो म्हणतो की, मातृभूमीच्या आशीर्वादाने त्याचा जन्म सार्थकी लागला आहे. तिची पायधूळ कपाळी लावणे हे प्रयाग-काशीच्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहे. तिच्या दुधाने त्याची वाणी समृद्ध झाली आहे, ज्यामुळे तो तिची गौरवगीते गातो. सूर्य, चंद्र आणि तारे आणून तो मातृभूमीची आरती करतो आणि तिचे पांग फेडण्याची इच्छा व्यक्त करतो.

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
हा स्वाध्याय WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. आवडल्यास खाली कमेंट करा! (Share Iyatta 8vi Marathi Ge Maybhu Swadhyay)
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास कमेंट करा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता आठवी मराठी पाठ १९: गे मायभू स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता आठवी मराठी पाठ १९: गे मायभू यामध्ये मातृभूमीविषयी कवीची भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त आहे. Vidyarthyansathi upyukt Marathi abhyas sahitya ani prernadayi katha. (Iyatta 8vi Marathi Ge Maybhu)

कीवर्ड्स: इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय, गे मायभू, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, Iyatta 8vi Marathi, Ge Maybhu, matrubhumi, Marathi abhyas, 8vi swadhyay

संबंधित स्वाध्याय: इयत्ता आठवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

FAQ: इयत्ता आठवी मराठी पाठ १९ गे मायभू स्वाध्याय प्रश्नोत्तरे

१. गे मायभू स्वाध्याय कोणत्या विषयाचा आहे?

हा स्वाध्याय इयत्ता आठवीच्या मराठी विषयाचा आहे, ज्यामध्ये मातृभूमीविषयी कवीची भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

२. कवी मातृभूमीची आरती कशी करू इच्छितो?

कवी सूर्य, चंद्र आणि तारे आणून मातृभूमीची तेजोमय आरती करू इच्छितो.

३. मातृभूमीविषयी कवीची भावना काय आहे?

कवी मातृभूमीला माता मानतो, तिची पायधूळ कपाळी लावतो आणि तिचे पांग फेडण्यासाठी गौरवगीते गातो.

४. कवीच्या जन्माला अर्थ कशामुळे प्राप्त झाला?

मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला.

Previous Post Next Post

نموذج الاتصال