१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा 5:मूलभूत हक्क भाग २ स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा पाचवा: मूलभूत हक्क भाग २ स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा पाचवा: मूलभूत हक्क भाग २ स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा पाचवा "मूलभूत हक्क भाग २" हा पाठ भारतीय संविधानातील धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, तसेच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे आणि संकल्पना स्पष्टीकरण यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्राची जाणीव करून देण्यास मदत करते.

मूलभूत हक्क भाग २ - प्रश्न १: लिहिते व्हा

प्रश्न १: लिहिते व्हा

१) धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते.
१) धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल म्हणून धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते.
२) संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय?
१) हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हासुद्धा एक मूलभूत हक्क आहे. त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात.

मूलभूत हक्क भाग २ - प्रश्न २: योग्य शब्द लिहा

प्रश्न २: योग्य शब्द लिहा

१) बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण
उत्तर: देहोपरिस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण
२) कोणत्या अधिकाराने ही कृती केली, असा अधिकाऱ्याकडे मागणारा सरकारी न्यायालयाचा आदेश
उत्तर: अधिकारपृच्छा
३) लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश
उत्तर: परमादेश
४) कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश
उत्तर: मनाई हुकूम किंवा प्रतिबंध

मूलभूत हक्क भाग २ - प्रश्न ३: कारण नमूद करा

प्रश्न ३: आपण हे करू शकतो, याचे कारण पुढे नमूद करा

१) सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात.
कारण:
१) सण हे लोकजीवनाच्या संस्कृतीचा एक भाग आहेत.
२) भारतीय संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे.
२) मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते.
कारण:
१) आपल्या संविधानाने नागरिकांना शैक्षणिक अधिकार दिला आहे.
२) या अधिकारानुसार नागरिकाला आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन करता येते.
३) आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात; म्हणून संविधानातील या शैक्षणिक अधिकारानुसार मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते.

मूलभूत हक्क भाग २ - प्रश्न ४: रिकाम्या जागी शब्द

प्रश्न ४: रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे!

१) हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार ................. विचारात घेते.
हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते.
२) शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये ................ शिक्षण सक्तीचे करता येत नाही.
शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही.

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा पाचवा: मूलभूत हक्क भाग २ स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा पाचवा: मूलभूत हक्क भाग २ यामध्ये भारतीय संविधानातील धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, तसेच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे आणि संकल्पना स्पष्टीकरण यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नागरिकशास्त्र अभ्यास साहित्य आणि संविधानाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Nagarikshastra Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी नागरिकशास्त्र स्वाध्याय, मूलभूत हक्क भाग २, धडा पाचवा स्वाध्याय, 7वी नागरिकशास्त्र स्वाध्याय, नागरिकशास्त्र अभ्यास, मूलभूत हक्क प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Nagarikshastra Swadhay, Iyatta Satavi Nagarikshastra guide, स्वाध्याय PDF, Fundamental Rights, Indian Constitution

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال