१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
test

इयत्ता सातवी मराठी पाठ 5:भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी पाठ: भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय

इयत्ता सातवी मराठी पाठ: भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील पाठ "भांड्यांच्या दुनियेत" हे भांड्यांचे मानवी जीवनातील महत्त्व, त्यांची निर्मिती, आणि संस्कृतीतील स्थान यांचे वर्णन करते. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, शब्दवर्गीकरण, आणि माहिती संकलन यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्य आणि संस्कृतीची जाणीव करून देण्यास मदत करते.

भांड्यांच्या दुनियेत - प्रश्न १: कारणे लिहा

प्रश्न १: खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा

अ) शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.
अन्न शिजवण्यासाठी आणि अन्न साठवण्यासाठी माणसाला भांडी आवश्यक वाटू लागली. म्हणून शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.
आ) पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.
पूर्वी लोखंड, तांबे, पितळ यांसारख्या धातूंचा मोठ्या प्रमाणवर शोध लागला नव्हता. आणि त्या काळी उपलब्ध असलेली धातूची भांडी विकत घेणे परवडणारे नव्हते. केळीची पाने हे निसर्गतः मिळत असल्याने तसेच ती मुबलक प्रमाणात असल्याने पूर्वी मोठ्या प्रमाणवर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.
इ) आज घरोघरी मिक्सर वापरतात.
आज घरोघरी मिक्सर वापरतात कारण मिक्सरमुळे कमी वेळात व कमी मेहनतीमध्ये जास्त काम करता येते.
ई) मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
मातीपासून बनलेल्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ बराच काल टिकतात. तसेच मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणत मिळतात. आणि ती पर्यावरणासाठी हानिकारक ठरत नाहीत म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

भांड्यांच्या दुनियेत - प्रश्न २: आकृती पूर्ण करा

प्रश्न २: खालील आकृती पूर्ण करा. मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक

१) माती
२) लाकूड
३) पान
४) दगड
५) चामडे

भांड्यांच्या दुनियेत - प्रश्न ३: मत स्पष्ट करा

प्रश्न ३: ‘भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा

अन्न ही मानवाची मुलभूत गरज आहे. हे अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला प्राचीन कालपासूनच भांड्यांची गरज निर्माण झाली. माणसाच्या अन्न साठवण्याच्या गरजांनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली. ज्या ज्या ठिकाणी मानवी समाज आहे त्या त्या ठिकाणी भांडी ही असणारच म्हणून, भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.

भांड्यांच्या दुनियेत - प्रश्न ४: निरुपयोगी वस्तू

प्रश्न ४: तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल, ते सांगा

घरातील निरुपयोगी वस्तूचा शक्य असल्यास पुनर्वापर करू. निरुपयोगी वस्तूंपासून टाकून न देता त्यांच्यापासून दुसऱ्या टिकाऊ वस्तू तयार करू. त्या वस्तूंचा पुनर्वापर करणे शक्य नसल्यास त्या वस्तू फेकून न देता पुनर्चक्रीकरण करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये देऊ.

भांड्यांच्या दुनियेत - प्रश्न ५: उदाहरणे लिहा

प्रश्न ५: दोन-दोन उदाहरणे लिहा

प्रकारउदाहरणे
मातीची भांडी१) मडके २) रांजण
चामड्यापासून बनवलेली भांडी१) बुधले २) पखाली
लाकडी भांडी१) उखळी २) काठवठ
तांब्याची भांडी१) हंडा २) बादली
चिनी मातीची भांडी१) कप २) सुरई
नॉनस्टिकची भांडी१) तवा २) कढई
काचेची भांडी१) ग्लास २) कप

भांड्यांच्या दुनियेत - प्रश्न ६: नावे सांगा

प्रश्न ६: यांना काय म्हणतात?

अ) जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट.
पत्रावळ
आ) जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे.
तस्त
इ) दुधासाठीचे भांडे.
चरवी
ई) ताकासाठीचे भांडे.
कावळा
उ) पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे.
घंगाळ

शब्दांचे वर्गीकरण

कंसातील शब्द व शब्दसमूह यांमध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा (अविभाज्य अंग, नित्योपयोगी, विराजमान होणे, सगेसोयरे)

अ) संत तुकारामांनी वृक्षांना .............. संबोधून त्यांचा गौरव केला.
संत तुकारामांनी वृक्षांना सगेसोयरे संबोधून त्यांचा गौरव केला.
आ) .............. वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात.
नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात.
इ) आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर .............. .
आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले.
ई) कुटुंब हे मानवी जीवनाचे .............. आहे.
कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे.

माहिती मिळवूया

माहिती मिळवूया

पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात?
पत्रावळी तयार करण्यासाठी फणस, मोह, पळस इत्यादी झाडांची पाने वापरतात.
पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या साहाय्याने जोडली जातात?
पत्रावळीची पाने एकमेकांना नारळाच्या झावळ्यांच्या कड्यांच्या सहाय्याने जोडली जातात.
पूर्वी वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळींमध्ये कोणते बदल झाले आहेत?
पूर्वी झाडांची पाने काट्यांच्या सहाय्याने एकत्र जोडून पत्रावळी तयार केल्या जात असत. आत्ता या पत्रावळी बनवण्यासाठी कागद, प्लास्टिक यांचा वापर केला जातो. पूर्वीच्या पत्रावळ्या पर्यावरणास अनुकूल होत्या. आत्ता वापरत असलेल्या पत्रावळी पर्यावरणासाठी हानिकारक ठरत आहेत.

क्रियाविशेषणांचे वर्गीकरण

खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार वर्गीकरण करा

प्रकारशब्द
कालवाचक क्रियाविशेषण अव्ययेदररोज, परवा, क्षणोक्षणी, सतत
रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययेसावकाश, मुळीच, कसे, झटकन
परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययेअतिशय, पूर्ण, जरा, थोडा
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययेतिथे, तिकडे, वर

शब्दकोडे सोडवूया

शब्दकोडे सोडवूया

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषणे लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषणे तयार करा व दिलेल्या जागेत लिहा.
१. हळू
२. आज
३. जरा
४. अनेक
५. थोडासा
६. तसा
७. जिकडे
८. तिकडे
९. वर
१०. खाली
११. तर
१२. कदाचित
१३. काही
१४. जसा
१५. मोजके

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी मराठी पाठ: भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी विषयाचा पाठ: भांड्यांच्या दुनियेत यामध्ये भांड्यांचे मानवी जीवनातील महत्त्व, त्यांची निर्मिती, आणि संस्कृतीतील स्थान यांचे वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, शब्दवर्गीकरण, आणि माहिती संकलन यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, भांड्यांच्या दुनियेत, पाठ पाचवा स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, भांड्यांच्या दुनियेत प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF, मानवी संस्कृती

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال