१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
🔥 NEW
📘 दैनिक पाठ टाचण
इयत्ता १ ली ते ८ वी
नवीन अभ्यासक्रमानुसार • अध्ययन निष्पत्तीनुसार
🚀 टाचण तयार करा
💬 शिक्षक Group Join करा

इयत्ता पाचवी मराठी पाठ 6: माहेर चे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: माहेर स्वाध्याय

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: माहेर स्वाध्याय

प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे?
कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे.
आ) या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता?
चिकणमाती हा नदीकाठच्या मातीचा प्रकार आहे.
इ) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे?
कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे.
ई) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे?
कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन भावाला भेटायला माहेरला जाणार आहे.

प्रश्न २: कोण ते लिहा

अ) ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती कोणती?
चिकणमाती
आ) लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ कोणते?
सोजीचे पीठ
इ) बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन कोणते?
रथ

प्रश्न ३: थोडक्यात उत्तरे लिहा

चिकणमाती बघून कवितेतील माहेरवाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना तुमच्या शब्दांत क्रमाने सांगा.
चिकणमातीचा ओटा तयार करणे – ओट्यावर जातं मांडणे – जात्यावर सोजी दळणे – सोजीच्या पिठापासून लाडू बनवणे – भाऊ रथ घेऊन येईल – रथातून माहेरला जाणे – माहेरी धिंगामस्ती करणे.

माहेर स्वाध्याय - pahavi marathi

इयत्ता पाचवी मराठी पाठ: माहेर यामध्ये माहेरवाशिणीच्या भावनिक आणि सांस्कृतिक कवितेचा समावेश आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, माहेरच्या प्रवासाच्या कल्पना, आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि भावनिक शिक्षण येथे उपलब्ध आहे. ही कविता माहेरच्या प्रेम आणि आपुलकीचे महत्त्व शिकवते.

कीवर्ड्स: माहेर, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, कविता, तापी नदी, भावनिक, सांस्कृतिक

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال