इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

Wild Animals 2


बोधकथा वाचा.           
        दूरच्या मोठ्या जंगलात एक हरिणीचे सुंदर पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. सुंदर पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून निघून पळून गेले. मात्र चित्ता त्या  जाळीत अडकून बसला. त्याच वेळी एक दयाळू शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने दयाळू शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. पण शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा आहे ! तुला सोडल्यावर बाहेर येऊन  तू मलाच खावून टाकशील." चित्ता म्हणाला मी तसे काही करणार नाही. दयाळू शेतकऱ्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने मात्र आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाऊन टाकण्याची भाषा सुरु केली.दयाळू शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. त्या चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, " हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू." हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, " अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल !

तात्पर्य - जे नेहमी असे राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.

(वर्तमानपत्रातून संग्रहित)

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال