इयत्ता सातवी भूगोल धडा ३: भरती-ओहोटी स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवीच्या भूगोल विषयातील धडा ३: भरती-ओहोटी यामध्ये भरती, ओहोटी, लाटा, आणि खगोलीय घटनांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, जोड्या, आणि भरती-ओहोटीचे परिणाम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना या संकल्पना समजण्यास मदत करते.
प्रश्न १: जोड्या लावून साखळी बनवा
अ) लाटा
वारा, कंप व ज्वालामुखीमुळेही निर्माण होतात.
आ) केंद्रोत्सारी प्रेरणा
पृथ्वीचे परिवलन, वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते.
इ) गुरुत्वीय बल
चंद्र, सूर्य व पृथ्वी, पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करतो.
ई) उधाणाची भरती
अमावास्या, सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते.
उ) भांगाची भरती
अष्टमी, चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगळ्या दिशेने कार्य करतात.
प्रश्न २: भौगोलिक कारणे सांगा
१) भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
चंद्र सूर्यापेक्षा पृथ्वीच्या जवळ आहे. त्यामुळे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बळ सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बळापेक्षा पृथ्वीवर जास्त परिणाम करते.
२) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.
किनाऱ्यावरील सखल भागात समुद्राच्या भरतीमुळे पाणी येते. पाण्याबरोबर गाळ आणि पाणी सखल भागात साठते. तिवारीची वने वाढतात, त्यामुळे खाजण किंवा दलदल तयार होते.
३) ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.
चंद्रासमोर असलेल्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव केंद्रोत्सारी बलापेक्षा जास्त असतो, त्यामुळे पाणी चंद्राकडे खेचले जाते. रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या भागात पाण्याची पातळी ओसरते, म्हणून विरुद्ध रेखावृत्तावरही ओहोटी येते.
प्रश्न ३: थोडक्यात उत्तरे लिहा
१) जर सकाळी ७.०० वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या, ते लिहा.
पुढील ओहोटी दुपारी १:१२ वाजता आणि पुढील भरती सायंकाळी ७:२४ वाजता येईल.
२) ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल, ते सकारण लिहा.
पश्चिम १०७° रेखावृत्तावर भरती असेल. कारण पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती येते, त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी भरती येते. ७३° पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध पश्चिम १०७° रेखावृत्त आहे.
३) लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा.
वारा हे लाटा निर्मितीचे मुख्य कारण आहे. सागरतळाशी होणारे भूकंप आणि ज्वालामुखी यामुळेही लाटा निर्माण होतात.
प्रश्न ४: पुढील बाबींचा भरती-ओहोटीशी कसा संबंध असेल, ते लिहा
१) पोहणे
पोहण्यासाठी भरती-ओहोटीच्या वेळा माहित असणे गरजेचे आहे, अन्यथा अपघात होऊ शकतो.
२) जहाज चालविणे
भरतीच्या वेळी जहाजे बंदरात आणता किंवा खोल समुद्रात नेणे सोपे होते.
३) मासेमारी
भरतीबरोबर मासे खाडीत येतात, ज्याचा मासेमारीसाठी फायदा होतो.
४) मीठ निर्मिती
भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्यापासून मीठ तयार केले जाते.
५) सागरी किनारी सहलीला जाणे
भरती-ओहोटीचा अंदाज नसल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.
प्रश्न ५: भांगाची भरती-ओहोटी आकृती ३.८ चे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
१) आकृती कोणत्या तिथीची आहे?
ही आकृती अष्टमी तिथीची आहे.
२) चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे?
चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती काटकोनात आहे.
३) या स्थितीचा भरती-ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल?
या स्थितीत सरासरीपेक्षा लहान भरती आणि लहान ओहोटी निर्माण होईल.
प्रश्न ६: फरक स्पष्ट करा
१) भरती व ओहोटी
भरती: सागरजलाच्या पातळीत वाढ, समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळ येते.
ओहोटी: सागरजलाच्या पातळीत घट, समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून दूर जाते.
२) लाट व त्सुनामी लाट
लाट: वाऱ्यामुळे सागरजलावर तरंग निर्माण होतात, विनाशकारी नसतात.
त्सुनामी लाट: भूकंप किंवा ज्वालामुखीमुळे निर्माण होतात, विनाशकारी असतात.
प्रश्न ७: भरती-ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते, ते लिहा
चांगले परिणाम:
१) पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो, समुद्रकिनारा स्वच्छ राहतो.
२) बंदरे गाळाने भरत नाहीत.
३) भरतीच्या वेळी जहाजे बंदरात आणता येतात.
४) भरतीचे पाणी मिठागरात साठवून मीठ तयार केले जाते.
५) भरती-ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते.
६) तिवारीची वने आणि जैवविविधतेचे जतन होते.
वाईट परिणाम:
१) भरती-ओहोटीचा अंदाज नसल्यास पोहणाऱ्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.
FAQ आणि शेअरिंग
मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!
इयत्ता सातवी भूगोल धडा ३: भरती-ओहोटी स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवी भूगोल धडा ३ चा स्वाध्याय: भरती-ओहोटी यामध्ये भरती, ओहोटी, लाटा, आणि खगोलीय घटनांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, जोड्या, आणि परिणाम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि खगोलीय संकल्पनांची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे.
कीवर्ड्स: इयत्ता सातवी भूगोल, भरती ओहोटी, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 7वी भूगोल स्वाध्याय, मराठी अभ्यास, लाटा, त्सुनामी, 7वी भूगोल गाइड pdf, Maharashtra board geography
संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर भूगोल पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: